schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
अयोध्येतील राममूर्ती निर्मितीचे काम मुस्लिम कुटुंबीयांकडे देण्यात आले आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. राममूर्ती निर्मितीचे काम गणेश भट्ट, अरुण योगीराज आणि सत्यनारायण पांडे करत आहेत.
अयोध्येतील राममूर्ती निर्मितीचे काम मुस्लिम कुटुंबीयांकडे देण्यात आले आहे. असा दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. १५२७-१५२८ दरम्यान परकीय आक्रमक बाबरने अयोध्येतील रामजन्मभूमीवरील राम मंदिर पाडून मशिद उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बाबरी मशिदीचा पाडाव आणि अनेक वर्षे न्यायालयीन वाद सुरु होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत सध्या भव्य राम मंदिर बांधले जात आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अभिषेक आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. सर्वांचे लक्ष श्रीरामाच्या मूर्तीवर केंद्रित आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर काही जण राम लल्लाची मूर्ती मुस्लिम बनवत असल्याचे सांगत आहेत.
मराठीतील प्रसिद्ध माध्यम असलेल्या लोकसत्ता ने यासंदर्भात १४ डिसेंबर रोजी एक बातमी प्रसिद्ध केली. या बातमीचा स्क्रिनशॉट व्हायरल करीत अनेक युजर्स असा दावा करीत आहेत.
या बातमीचे संग्रहण येथे पाहता येईल.
न्यूजचेकर ला आमची व्हाट्सअप टिपलाइन (9999499044) वर समान दावे प्राप्त झाले असून सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
आमच्या संशोधनाच्या सुरुवातीला, आम्ही प्रथम Google वर या प्रकरणाशी संबंधित एक कीवर्ड शोध घेतला आणि आम्हाला अनेक मीडिया रिपोर्ट सापडले. The New Indian Express आणि Aaj Tak मध्ये प्रसिद्ध झालेल्या या रिपोर्टनुसार, “राम मंदिरात अभिषेक करण्यासाठी तीन मूर्ती तयार केल्या जात आहेत. या तीनपैकी केवळ एकच मूर्ती अयोध्या मंदिरात बसवण्यात येणार आहे.” अशी माहिती आम्हाला मिळाली.
Aaj Tak ने २६ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले आहे की, “अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला अंतिम स्वरूप दिले जात आहे. येथील मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम लल्लाच्या तीन मूर्ती जवळपास तयार झाल्या आहेत. डिसेंबर महिन्यात तीनपैकी एक मूर्तीची निवड होणार आहे.” आम्हाला येथे कोठेही मुस्लिम कारागीर कुटुंबीयांचा उल्लेख आढळला नाही.
The New Indian Express ने १० डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीतही तीन मूर्तींची निर्मिती सुरु असून त्यापैकी एका मूर्तीची निवड केली जाणार आहे. अशी माहिती मिळाली.
मुस्लिम कारागीर राम मूर्तींची निर्मिती करीत आहेत, या दाव्याला अधिकृत पुष्टी न मिळाल्याने आम्ही पुन्हा त्या अनुषंगाने शोध घेतला. आम्हाला पुन्हा The New Indian Express ने ९ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केलेली एक बातमी मिळाली.
“विशेष म्हणजे मूर्तींना आकार देणारे तिन्ही शिल्पकार आपापल्या पराक्रमाने प्रसिद्ध आहेत. कर्नाटकातील गणेश भट्ट नेल्लीकरू खडकांपासून (काळे दगड) मूर्ती कोरत आहेत, ज्याला श्याम शिला किंवा कृष्ण शिला म्हणूनही ओळखले जाते, तर दुसरी मूर्ती म्हैसूरमध्ये कर्नाटकातून आलेल्या दुसर्या खडकातून आकार घेत आहे. दुसरी मूर्ती म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज बनवीत आहेत. योगीराज यांनी केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांची १२ फूट उंचीची मूर्ती कोरली होती, ज्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी केले होते. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये, मूर्ती कोरण्याची जबाबदारी सत्य नारायण पांडे यांच्यावर आहे, जे पांढर्या मकराना संगमरवरी दगडांपासून मूर्ती बनविण्यात व्यग्र आहेत.” अशी माहिती आम्हाला मिळाली.
The Print ने प्रसिद्ध केलेल्या बातमीतही आम्हाला अशीच माहिती वाचायला मिळाली.
पुढील तपासात, आम्हाला श्री रामजन्मभूमी ट्रस्टच्या वेबसाइटवर संपर्क क्रमांक मिळाला. आम्ही त्यावर संपर्क साधला आणि तेथील संपर्कप्रमुख आदित्य यांच्याशी बोललो. “हिंदू समाजातील लोकच रामलल्लाची मूर्ती घडवत असल्याचे त्यांनी सांगितले. या तिनपैकी सर्वोत्तम एक मूर्तीची निवड केली जाईल. सोशल मीडियावर जे व्हायरल होत आहे ते खोटे आहे. असे त्यांनी सांगितले.”
ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या X खात्यावर त्यांनी केलेली एक पोस्ट आमच्या पाहणीत आली.
“समाजातील काही लोकांचे काम केवळ गैरसमज पसरवणे आहे. भ्रम हे त्यांचे खाद्य आहे.” अशा कॅप्शनखाली प्रतिक्रिया देताना त्यांनी व्हायरल दाव्यांचे खंडन केले आहे. “राम लल्ला ची नवी प्रतिमा तिघे बनवीत आहेत. आपण याबद्दल अनेकदा बोललेलो आहे. याबद्दल सारखे बोलणे आवश्यक नाही. मूर्ती तोच बनवेल जो सक्षम असेल आणि ज्याने आधी मूर्ती बनवण्याचे काम केले असेल. तांत्रिक काम तोच करतो ज्याला तंत्रज्ञानाचे ज्ञान आहे… ज्यांना माझे काही म्हणणे नाही. समाजात गैरसमज पसरवत आहेत… विचारणाऱ्याला विद्वान आणि विद्वानांची नावे माहीत नसतील… काही लोक फक्त गैरसमज पसरवतात…” असे त्यांनी म्हटले आहे. त्यांची ही प्रतिक्रिया @ANINewsUP ने आपल्या अधिकृत खात्यावरून प्रसारित केली असून ती येथे पाहता येईल.
आमच्या तपासात हे स्पष्ट होते की अयोध्येतील राममूर्ती निर्मितीचे काम मुस्लिम कुटुंबीयांकडे देण्यात आले आहे हा व्हायरल दावा खोटा आहे. राममूर्ती निर्मितीचे काम गणेश भट्ट, अरुण योगीराज आणि सत्यनारायण पांडे हे तीन मूर्तिकार करत आहेत.
Our Sources
News published by The New Indian Express on December 9, 2023
News published by The New Indian Express on December 10, 2023
News published by AajTak on November 26, 2023
Official website of Shri Ramjanmabhoomi Teerth Kshetra
Converastion with PRO of Shri Ramjanmabhoomi Teerth Kshetra
Tweet made by Champat Rai on December 16, 2023
Tweet made by ANINewsUP on December 15, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 3, 2024
Prasad Prabhu
January 29, 2024
Prasad Prabhu
January 27, 2024
|