schema:text
| - Fact Check: AIB शो वर आमिर खान च्या जुन्या टिप्पणी ला ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादा सोबत जोडून वायरल केले जात आहे
विश्वास न्यूजने आपल्या पडताळणीमध्ये जाणून घेतले की हा व्हिडिओ 2015 चा आहे, ज्यावेळी आमिर खान ‘यूथ फॉर गवर्नेंस 2015’ कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी यादरम्यान एआईबी (AIB) नॉकआउट शो ला घेऊन या सर्व गोष्टी बोलल्या होत्या. याच व्हिडिओला आता काही लोक अलीकडचा व्हिडिओ म्हणून 'इंडियाज गॉट लेटेंट’ सोबत जोडून वायरल करत आहेत. या व्हिडिओचा सध्याच्या काळातील कोणत्याही घटनेची कोणताही संबंध नाही.
By: Jyoti Kumari
-
Published: Feb 21, 2025 at 06:34 PM
-
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). युट्युब शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये केल्या गेलेल्या आपत्ती जनक टिप्पणी वरून सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान अभिनेता आमिर खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अमीर खान शोच्या दरम्यान केल्या गेलेल्या अयोग्य टिप्पणीला विरोध करताना दिसून येत आहे. युजर्स या व्हिडिओला शेअर करून दावा करत आहे की या व्हिडिओमध्ये अमीर खान ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये रणवीर इलाहाबादिया कडून केल्या गेलेल्या आपत्ती जनक टिप्पणी वरून आपली नाराजी व्यक्त करत आहे. या व्हिडिओला अलीकडचा ताजा व्हिडिओ म्हणून शेअर केला जात आहे.
विश्वास न्यूजने आपल्या पडताळणीमध्ये जाणून घेतले की हा व्हिडिओ 2015 चा आहे, ज्यावेळी आमिर खान ‘यूथ फॉर गवर्नेंस 2015’ कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी यादरम्यान एआईबी (AIB) नॉकआउट शो ला घेऊन या सर्व गोष्टी बोलल्या होत्या. याच व्हिडिओला आता काही लोक अलीकडचा व्हिडिओ म्हणून ‘इंडियाज गॉट लेटेंट’ सोबत जोडून वायरल करत आहेत. या व्हिडिओचा सध्याच्या काळातील कोणत्याही घटनेची कोणताही संबंध नाही.
का होत आहे व्हायरल?
इंस्टाग्राम पेज theindianadda ने 13 फेब्रुवारी 2025 ला हा व्हायरल व्हिडिओ शेअर केला होता आणि कॅप्शन मध्ये लिहिले होते, ” अमीर खानने अप्रत्यक्षरीत्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ शो आणि #ranveerallahbadia च्या बाबतीमध्ये मत प्रदर्शित केले”
पोस्ट ची आर्काइव लिंक येथे पहा.
तपास
वायरल व्हिडिओची तपासणी करण्यासाठी आम्ही व्हिडिओचे स्क्रीन शॉट काढले आणि गुगल लेन्स द्वारे त्याला सर्च केलं. आम्हाला हा व्हिडिओ Movie Talkies एका अधिकृत यूट्यूब चैनल वर मिळाला. 11 फेब्रुवारी 2015 ला अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सोबत दिलेल्या माहितीनुसार, अमीर खान व्हिडिओमध्ये एआईबी रोस्ट शो बद्दल बोलत आहेत.
आम्हाला व्हिडिओ सोबत असलेली बातमी ndtv.com च्या वेबसाइट मिळाली. या रिपोर्टला 11 फेब्रुवारी 2015 ला प्रकाशित केले गेले आहे. दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान आमिर खानने एआईबी शो बद्दल चर्चा केली आणि म्हटले, आतापर्यंत त्यांनी हे रोस्ट पाहिलेले नाही. परंतु त्यांनी काही क्लिप पाहिल्या आहेत आणि आपला मित्र करण जौहर आणि अर्जुन कपूर कडून या शोबद्दल ऐकले आहे. त्यांना हे अजिबात आवडले नव्हते. त्यांनी अशा पद्धतीने केलेल्या अभद्र भाषेच्या वापराला हिंसक म्हटले आहे.
सर्च च्या दरम्यान आम्हाला व्हायरल व्हिडिओ संदर्भात असलेली बातमी दैनिक जागरण च्या वेबसाइट वेबसाईटवर सुद्धा मिळाली. एक जुलै 2021 ला प्रकाशित झालेल्या बातमीमध्ये सांगितले गेले की, अमीर खान 2015 मध्ये एआईबी नॉकआउट शो बद्दल खूप नाराज होते. त्यांनी या शो ला हिंसक म्हटले होते. अमीर खानने म्हटले की त्यांनी करण जोहर आणि अर्जुन कपूर यांना फटकारले होते आणि म्हटले, मी या सर्व गोष्टींमुळे इम्प्रेस होत नाही.” संपूर्ण बातमी येथे वाचा.
अमर उजाला मध्ये 11 फेब्रुवारी 2025 ला प्रकाशित झालेल्या बातमी मध्ये सांगितले गेले की, इंडियाज गॉट लेटेंट शो वर वाईट टिप्पण्या केल्यामुळे सर्व लोक हैराण झाले होते. यानंतर अनेक तक्रारी दिल्या गेल्या आणि यानंतर युट्युब वरून हे व्हिडिओज हटवले गेले होते.
व्हायरल व्हिडिओ सोबत जोडल्या गेलेल्या अन्य रिपोर्ट्स ना येथे पाहिले जाऊ शकते.
आम्ही हे व्हिडिओ दैनिक जागरण साठी एंटरटेनमेंट बीट कव्हर करणाऱ्या प्रिन्सिपल कॉरस्पॉडंट स्मिता श्रीवास्तव यांच्यासोबत शेअर केले. त्यांनी आम्हाला सांगितले की ही क्लिप खूप जुनी आहे. यामध्ये अमीर खान कोणत्यातरी इतर शो बद्दल बोलत आहेत.
सोशल मीडियावर ‘ इंडियाज गॉट लेटेंग’ वादा सोबत जोडून अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. ज्यांच्या FACT CHECK रिपोर्टला येथे वाचले जाऊ शकते.
सर्वात शेवटी आम्ही हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजर अकाउंट ला स्कॅन केले. सदर युजर जास्त करून एंटरटेन संबंधित असलेल्या पोस्ट शेअर करतो.
निष्कर्ष: विश्वास न्यूजने आपल्या पडताळणीमध्ये जाणले की व्हायरल व्हिडिओमध्ये अमीर खान ‘इंडियाज गॉट लेटेंट’ बद्दल चालू असलेल्या वादावर बोलत नसून, सदर व्हिडिओ हा वर्ष 2015 चा आहे, ज्यामध्ये अमीर खान एआईबी शो बद्दल बोलत आहेत. या व्हिडिओला अलीकडचा व्हिडिओ सांगून काल्पनिक दाव्याने शेअर केले जात आहे.
Claim Review : अमीर खान ने '‘इंडियाज गॉट लेटेंट' वरून भाष्य केले
-
Claimed By : इन्स्टा युजर- theindianadda_
-
Fact Check : Misleading
-
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
|