schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या केंद्र सरकारवर टीका केली आहे.
नितीन गडकरी एका व्हिडिओमध्ये मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मोदी सरकार ने 10 वर्ष में क्या किया- सुन लीजिए नितिन गडकरी से.” वीडियो में नितिन गडकरी कह रहे हैं कि ”आज गांव, गरीब, मज़दूर और किसान दुखी हैं। इसका कारण यह है कि जल, जमीन, जंगल और जानवर – रूरल, एग्रीकल्चर और ट्राइबल की जो इकॉनमी है: यहाँ अच्छे रोड नहीं हैं। पीने के लिए शुद्ध पानी नहीं है। अच्छे अस्पताल नहीं हैं। अच्छे स्कूल नहीं हैं। किसान की फसल को अच्छे भाव नहीं हैं।”
ही क्लिप काँग्रेस पक्षाच्या अधिकृत X हँडलनेही शेअर केली आहे.
व्हिडिओ नीट पाहिल्यास लल्लनटॉपचा लोगो आणि ‘जामघाट’ असे लिहिलेले दिसत आहे. दाव्याची चौकशी करण्यासाठी, सर्वप्रथम आम्ही लल्लनटॉप, जामघाट आणि नितीन गडकरी हे कीवर्ड शोधले, ज्याचा परिणाम म्हणून आम्हाला ‘द लल्लनटॉप’ च्या यूट्यूब चॅनेलवर 29 फेब्रुवारी 2024 रोजी नितीन गडकरींचा मुलाखतीचा व्हिडिओ मिळाला.‘नितिन गडकरी इंटरव्यू में पीएम मोदी से खटास, अगले पीएम पर सौरभ द्विवेदी से क्या बोले?’ अशा कॅप्शनसह शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये व्हायरल क्लिपचा भाग 18:20 मिनिटांनी पाहता येतो.
व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला आढळले की व्हायरल व्हिडिओ क्लिप केलेला आहे. नितीन गडकरी मुलाखतीत बोलत होते की, ‘.. जब गांधी थे तब 90 प्रतिशत आबादी गाँवों में रहती थी.. और धीरे-धीरे 30 प्रतिशत का माइग्रेशन (पलायन) क्यों हुआ?’ ते पुढे म्हणतात, ”इसका कारण.. आज गांव, गरीब, मज़दूर और किसान दुखी हैं। इसका कारण यह है कि जल, जमीन, जंगल और जानवर – रूरल, एग्रीकल्चर और ट्राइबल की जो इकॉनमी है : यहाँ अच्छे रोड नहीं हैं। पीने के लिए शुद्ध पानी नहीं है। अच्छे अस्पताल नहीं हैं। अच्छे स्कूल नहीं हैं। किसान की फसल को अच्छे भाव नहीं हैं।” याच क्रमाने ते पुढे म्हणतात, ”हमारी सरकार आने पर हम इस दिशा में बहुत काम कर रहे हैं।” यानंतर त्यांनी आपल्या सरकारच्या अनेक चांगल्या कृतीही सांगितल्या. यावरून त्यांचा अपूर्ण व्हिडिओ शेअर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नितीन गडकरी यांनीही त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून हा दावा फेटाळला आहे. या क्लिपबाबत नितीन गडकरी यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीसही पाठवली आहे.
अशाप्रकारे, नितीन गडकरींचा अपूर्ण व्हिडिओ दिशाभूल करीत शेअर केला जात असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Sources
Video Interview shared by Lallantop on 29th February 2024.
Post from the official X handle Nitin Gadkari.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
|