Coronavirus
बाॅयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडला का ? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य
@drharshvardhan बाॅयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सांपडले आहे. तरी सर्वांना सूचित करण्यात येते की, बाॅयलर चिकन खाऊ नये.(मुस्लिम कम्युनिटी खार मुंबई.) Is this message true please confirm
— Devendra Nikumbh (@devendranikumbh) February 4, 2020
रानडे यांनी चिकनमध्ये कोरोना व्हायरस आढळल्याची अफवा पसरल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियात जे कोंबड्यांच्या आजाराचे किंवा चिकनचे फोटो व्हायरल होत आहे ते राणीखेत आजाराचे आहेत त्याचा कोरोना व्हायरसची संबंध नाही. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसू) येणाऱ्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने कोरोना विषाणूसंदर्भात पसरवल्या जाणाऱ्या
अफवांना शास्त्रीय माहितीद्वारे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याचे डॉ. रानडे यांनी सांगितले. “भारतामध्ये मांसाहाराची पद्धत सर्वाधिक सुरक्षित आहेत. चिकन व मटण उकळवून शिजवून घेतले जातात. पाणी हे 100 डिग्री तापमानाशिवाय उकळले जात नाही. एव्हढया तापमानात कुठलाही विषाणू जिवंत राहू शकत नाही. कारण कुठलाही विषाणू साधारण 27 ते 45 डिग्री पेक्षा अधिक तापमानात
जगत नाहीत. शिवाय, भारतात मांसाहारी पदार्थ शिजवताना आले, हळद आदी औषधी गुणधर्माचे मसाले वापरले जातात. त्यामुळे आजपर्यंत चिकन-मटणातून एखाद्या विषाणूजन्य रोगाची बाधा झाल्याच्या भारतात नोंदी नाहीत,” असे डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले.
Newschecker Team
March 25, 2020
Newschecker Team
May 2, 2020
Newschecker Team
April 23, 2020