schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
IPL 2023 फायनलच्या नंतर, अहमदाबाद, गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर CSK समर्थकांची प्रचंड गर्दी, जिथे CSK ने गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव केला.
ट्विटची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.
हाच संदेश व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
न्यूजचेकरने प्रथम सॅमसंग एलसीडी टीव्हीची जाहिरात व्हायरल चित्रात पाहिली, जी सूचित करते की हे चित्र पूर्वीच्या इव्हेंटचे आहे.
फोटोच्या रिव्हर्स इमेज सर्चमुळे आम्हाला तोच फोटो शेअर करत 26 नोव्हेंबर 2017 रोजी केलेल्या या ट्विटकडे नेले. “The Great Ethiopian Run – 2017 – Addis Ababa, #Ethiopia! Beautiful Scenes!,” असे ती पोस्ट सांगते.
त्यानंतर आम्हाला हा CNN चा दिनांक 4 ऑगस्ट, 2017 रोजीचा लेख मिळाला. ज्यामध्ये भव्य रन चा एक समान फोटो आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अदिस अबाबामधील वार्षिक ग्रेट इथिओपियन रन पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे”, याचे श्रेय इथिओपिया पर्यटन संस्थेला दिले आहे.
पुढील शोधामुळे आम्हाला UN च्या MDG Achievement Fund च्या संकेतस्थळावरील व्हायरल प्रतिमेच्या अधिक स्पष्ट आवृत्तीकडे नेले, ज्यामध्ये “Haile Gebreselassie kick off the Great Ethiopian Run या घोषवाक्याखाली 2015 पर्यंत गरीबी संपवू””. असे शीर्षक आढळले.
एका संबंधित कीवर्डने आम्हाला एकाहून अधिक लेखांकडे नेले. ते येथे आणि येथे पाहता येतील. तसेच व्हायरल प्रतिमा “द ग्रेट इथिओपियन रन” ची आहे जी 2010 मध्ये MDG अचिव्हमेंट फंडाच्या समर्थनाने आयोजित केली गेली होती. याची पुष्टी करणारा व्हिडिओ सोबत पाहता येईल.
Sources
Write-up, UN’s MDG achievement fund
CNN article, August 4, 2017
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
|