schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
पुण्यातील एका हुक्का बारवर छापेमारी करत ३० जणांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले, त्यापैकी एकूण १५ मुली हिंदू आणि सर्व मुले मुस्लिम असल्याचा दावा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करीत केला जात आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
व्हायरल दाव्यातील व्हिडिओची पाहणी करता हा दावा मध्य प्रदेशातील हुक्का बारवर छापेमारी करताना आक्षेपार्ह अवस्थेत पकडलेल्या ३० जणांच्या नावाने शेअर करण्यात आला होता. हे आमच्या लक्षात आले. त्यामध्येही, सर्व १५ मुली हिंदू आणि सर्व १५ मुले मुस्लिम आहेत असेच म्हटले गेले होते. याची तपासणी ३१ ऑगस्ट २०२२ रोजी इंग्रजी भाषेत न्यूजचेकरने केली होती. आमच्या तपासानुसार, ऑगस्ट २०२२ मध्ये दैनिक भास्कर आणि दैनिक जागरणने प्रकाशित केलेल्या लेखांमध्ये माहिती देण्यात आली आहे की व्हायरल व्हिडिओ मध्य प्रदेशातील नसून आग्रा येथील आहे. महत्वाचे म्हणजे दोन्ही लेखांमध्ये या प्रकरणामध्ये सांप्रदायिक अँगल असल्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
याशिवाय क्राईम तक, ईटीव्ही भारत आणि आज तक यांनी प्रकाशित केलेल्या लेखांमध्येही आग्रा येथे घडलेल्या या घटनेचा तत्सम तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या लेखांमध्येही या प्रकरणातील कोणत्याही सांप्रदायिक अँगल बद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
व्हायरल दाव्याबद्दल अधिक माहितीसाठी, न्यूजचेकरने हरिपर्वत पोलिस स्टेशनचे क्षेत्र प्रभारी अरविंद कुमार यांच्याशी संपर्क साधला. या प्रकरणात कोणताही जातीय कोन नसल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. सर्व एकाच धर्माचे आहेत आणि प्रौढ आहेत.
अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, पुण्यातील हुक्का बारवर छापेमारी दरम्यान आक्षेपार्ह अवस्थेत पकडलेल्या ३० जणांच्या नावाने शेअर करण्यात आलेला दावा हा दिशाभूल करणारा आहे. आग्रा येथे घडलेल्या घटनेचा व्हिडीओ प्रारंभी मध्यप्रदेश येथील असे सांगत आणि आता पुण्याचा म्हणून व्हायरल होत असून सर्व १५ मुली हिंदू आणि सर्व १५ मुले मुस्लिम होती, हे खोटे आहे. खरे तर या प्रकरणाला कोणताही सांप्रदायिक कोन नाही.
Our Sources
Report By Dainik Bhaskar, Dated August 10, 2022
Report By Jagran, Dated August 11, 2022
Telephonic Conversation With Hariparwat SHO On August 31, 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
|