Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
(याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख सौरभ पांडे यांनी लिहिला आहे)
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात असून त्यात दावा केलाय की ‘न किसी की आँख का नूर हूँ’ ही गझल केनियाच्या गायकाने गायली आहे.
(मूळ दावा : हा आफ्रिकन गायक केनियाचा आहे. तो ब्लॅक केनियन आहे. तुमचे डोळे मिटा आणि आवाज ऐका. अतिशय उत्तम) (न किसी की आँख का नूर हूँ..!)
भारतात संगीताला फक्त कलेच्याच नव्हे तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील मोठे स्थान आहे. देशात संगीतप्रेमींची संख्या मोठी असल्याने विविध भाषांमधील गाणी तसेच त्यांच्या रचनांचा उल्लेख केला जातो. संगीताची रचना आणि श्रोत्यांचा समूह या दोन्हीमधील वैविध्यतेमुळे भारतीय संगीत हे अन्य देशांमध्ये देखील ऐकले जाते.
त्यातच सोशल मीडिया आणि व्हाट्स ॲप समूहात एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केला जातोय की, ‘न किसी की आँख का नूर हूँ’ ही गझल केनियाच्या गायकाने गायली आहे. न्यूजचेकरच्या (+९१-९९९९४९९०४४) या व्हाट्स अॅप नंबरवर हा दावा तथ्य पडताळणीसाठी पाठवला आहे.
Fact Check / Verification
‘न किसी की आँख का नूर हूँ’ ही गझल केनियाच्या गायकाने गायल्याच्या नावाने शेअर केला जाणारा या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही तो कीवर्ड यु ट्यूबवर टाकून शोधला. तेव्हा आम्हांला anurranga jaisalmer नावाच्या यु ट्यूब वाहिनीवर अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला.
अपलोड केलेल्या त्या व्हिडिओच्या प्रतिक्रियांमध्ये काही युजरने असं लिहिलं होतं की, व्हिडिओत दिसणारा गायक संजय सावंत आहे.
व्हिडिओच्या प्रतिक्रियांवरून आम्ही ‘jagruti video film bhuj’ हा कीवर्ड टाकून यु ट्यूबवर शोधला. त्यानंतर आम्ही जागृती फिल्म्स या यु ट्यूब वाहिनीवर ‘na kisi ki aankh ka noor’ हा कीवर्ड टाकला. तेव्हा आम्हांला व्हायरल झालेल्या व्हिडिओचा मूळ व्हिडिओ मिळाला.
जागृती फिल्म्स यांनी त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देत सांगितले की, व्हिडिओत संजय सावंत नावाचा गायक गात आहे.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की ‘न किसी की आँख का नूर हूँ’ ही गझल केनियाच्या गायकाने गायल्याच्या नावाने शेअर केला जाणारा व्हिडिओ भ्रामक आहे. व्हिडिओत गझल गाणारे गायक संजय सावंत आहे, केनियाचे गायक नाही.
Result : Partly False
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.