schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
सध्या सुरू असलेल्या ICC 2023 विश्वचषकाच्या “गैरव्यवस्थापन” बद्दल भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी BCCI वर टीका केली.
न्यूजचेकरने प्रथम “Sunil Gavaskar BCC criticism World Cup” साठी कीवर्ड शोध घेतला, ज्याने माजी क्रिकेटपटूच्या अशा विधानाचे कोणतेही विश्वसनीय वृत्त दिले नाही.
त्यानंतर आम्ही गावस्करचा स्टार स्पोर्ट्ससाठीचा वर्ल्ड कप दरम्यानचा सर्वात अलीकडील व्हिडिओ पाहिला, जो येथे पाहता येईल. तेथेही आमच्या निदर्शनास आले की, त्यांनी असे कोणतेही विधान केले नाही.
आणखी एका शोधामुळे आम्हाला Aaj Tak/Sports Tak चे व्यवस्थापकीय संपादक विक्रांत गुप्ता यांनी केलेल्या ट्विटकडे नेले, ज्यांनी गावस्करांच्या नावाने व्हायरल विधान खोटे असल्याचे सांगितले. व्हायरल कोट बनावट असल्याची पुष्टी करणारे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे असेच ट्विट येथे पाहिले जाऊ शकते.
गेल्या महिन्यात आशिया चषकादरम्यान भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यानंतर बीसीसीआयवर टीका केली असे सांगत गावसकर यांच्या नावे बनावट दावा झाला होता. न्यूजचेकरने हा दावा खोडून काढला होता.
Sources
Tweet, Vikrant Gupta, October 7, 2023
Tweet, Rajdeep Sardesai, October 8, 2023
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी कुशल एच. एम. यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
|