schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Marathi
लता मंगेशकरांचे अंत्यदर्शन घेताना शाहरुख खान थुंकला असल्याच्या दावयाने व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भारतरत्न जगविख्यात गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. यात अभिनेता शाहरुख खान देखील होता. तो अंत्यदर्शनादरम्यान लतादीदींचया शवाकडे थुंकला असा दावा केला जात आहे.
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये दिसून येते की, शाहरुख लतादीदींच्या पार्थिवाजवळ दुवा मागत उभा आहे, काही वेळात तो मास्क काढून थोडे खाली वाकतो व थुंकल्यासारखे करतो. व परत मास्क लावतो. त्याच्यासमवेत असलेली महिला मात्र त्याच्याकडे पाहत देखील नाही.
आता याच व्हिडिओ क्लिपवरुन शाहरुख खानने आपले खरे जिहादी रुप दाखवल्याचा दावा करणा-या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे.
लता मंगेशकरांचे अंत्यदर्शन घेताना शाहरुख खान थुंकला असल्याच्या दाव्याने व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपची आम्ही पडताळणी सुरु केली मात्र मुक्य प्रवाहातील माध्यमांत शाहरुख खान थुंकल्याची बातमी आढळून आली नाही मात्र सोशल मीडियावर काही लोक शाहरुखच्या या कृत्याचा निषेध करत होेत तर काही जण ्त्याचे मसर्थन करत त्याने मुस्लिम रितीरिवाजांनुसार केले असल्याचे म्हटले आहे. अभिनेऑत्री उर्मिला मातोंडकरने शाहरुखचे समर्थन करत एका ट्विटला प्रत्युतर देताना म्हटले आहे की, आहे की, “याला थुंकणे नाही तर दुआ फुकणे म्हटले जाते याच सभ्यता, संस्कृतीला भारत म्हटले जाते.”
याशिवाय आम्हाला बीबीसी मराठीची बातमी आढळून आली, ज्यात मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांची प्रतिक्रिया घेण्यात आलेली आहे. लता मंगेशकरांचे अंत्यदर्शन घेताना शाहरुख खान थुंकला या व्हायरल व्हिडिओविषयी ते म्हणतात की, “ही पारंपारिक पद्धत आहे. शाहरुख खानने त्याच्या धर्माच्या पद्धतीने दुवा केली आहे. या दुवामध्ये अल्लाकडे प्रार्थना केली जाते की, चांगल्या माणसाला जन्नत (स्वर्ग) हासिल व्हावी. मरणोत्तर त्यांच जीवन चांगल असावं. अशी ती प्रार्थना असते. तीच भावना शाहरुख खानने व्यक्त केली आहे. फुंकर मारणे म्हणजे आपल्या आवाज पोहचवणं, त्याच्याशी एकरुप होणे हा भाव अनेक त्याच्यात आहे. बरेच कट्टरवादी मुस्लिम बिगर मुस्लिमांसाठी अशी दुवा मागणे इस्लामविरोधी मानतात. उदारमतवादी मुस्लिमांना याबाबत काही वाटत नाही. शाहरुख खानने जे काही केले आहे ते मानवताादी दृष्टिकोनातून केले आहे. यातून गैरअर्थ काढणे योग्य नाही.”
लता मंगेशकरांचे अंत्यदर्शन घेताना शाहरुख खान थुंकला या दाव्याच्या अधिक माहितीसाठी आम्ही मुस्लिम समाजाचे अभ्यासक व Deccan Quest- मराठी चे संपादक सरफराज अहमद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “मुस्लिम धर्मात फातेहा (प्रार्थना) पढल्यानंतर ती दुआ इच्छित व्यक्तीला मिळण्यासाठी वर फुंकर मारली जाते असे समजले यास दम असे म्हणतात. अनेक हिंदू महिला मशिदींच्या बाहेर नमाजच्या वेळी आपल्या लहान मुलांना घेतात. नमाजींकडून फुंकर मारुन आपल्या बाळासाठी दुवा मिळवतात. यात थुंकले नाही तर फुंकर मारली जाते. ही पंरपरा वर्षानुवर्षेच सुुरु आहे”.
अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, लता मंगेशकरांचे अंत्यदर्शन घेताना शाहरुख खान थुंकला असल्याचा दावा चुकीचा आहे. मुस्लिम रितीरिवाजप्रमाणे व्यक्तीला मरणोत्तर सुख मिळावे यासाठी फुंकर मारली जाते. ते शाहरुख खानने मानवतेच्या दृष्टिकोनातून केले.
Result: Misleading/Partly False
Sarfraj Ahemad
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा
|