schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
व्हिडिओमध्ये तलवारबाजी करताना दिसणारी महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आहेत.
Fact
हा दावा खोटा आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी नसून गुजरातची निकिताबा राठौर आहे.
एका महिलेचा तलवारबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तलवारबाजी करणारी ही महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी असल्याचा दावा पोस्टच्या माध्यमातून केला जात आहे.
फेसबुकवरही हा दावा आम्हाला पाहायला मिळाला.
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही Google वर काही कीवर्ड शोधले, परंतु कोणतेही मीडिया रिपोर्ट सापडले नाहीत. व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सचा Google रिव्हर्स इमेज सर्च करूनही आम्हाला व्हिडिओशी संबंधित कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही.
पुढील तपासात, आम्ही राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांचे अधिकृत सोशल मीडिया खाते शोधले, परंतु तेथेही त्यांनी तलवारबाजीचे प्रदर्शन केल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये महिलेचा पूर्ण चेहरा दिसत नसला तरी ड्रेस आणि उंचीवरून महिला आणि दिया कुमारीमध्ये काही साम्य आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पर्सनल सेक्रेटरीशी फोनवर बोललो. फोनवरील संभाषणात त्यांनी राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांचा तलवारबाजीचा दावा खोटा असल्याची पुष्टी केली. त्यांनी पुढे सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला दीया कुमारी नाही.
तपासादरम्यान असे आढळून आले की, एका पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये काही लोक व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेला निकिताबा राठोड म्हणून संबोधत होते.
त्यानंतर आम्ही निकिताबा राठौरशी संबंधित माहिती शोधली. आम्हाला आढळले की हा व्हिडिओ 22 जानेवारी रोजी त्यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर शेअर करण्यात आला होता, ज्याचे सुमारे 55 हजार फॉलोअर्स आहेत.
त्यांच्या प्रोफाईलवर पाहिल्यावर असे लक्षात येते की याआधीही त्याच्या प्रोफाईलवर असे अनेक तलवारबाजीचे व्हिडिओ शेअर केले गेले आहेत.
निकिताबा राठोडच्या प्रोफाईलवर पोस्ट करण्यात आलेला व्हिडीओ हा व्हायरल झालेल्या दाव्याशी तुलना करता अधिक स्पष्ट आहे. तलवारबाजीच्या व्हिडिओशिवाय, त्यांनी 22 जानेवारी रोजी इतर अनेक पोस्ट देखील केल्या आहेत, ज्यामध्ये चेहरा दिसत आहे. या पोस्ट्स इथे, इथे आणि इथे पाहता येतील. म्हणून, आम्ही या पोस्टमधून स्पष्ट की-फ्रेम काढल्या आणि त्यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्या फोटोशी तुलना केली. ज्यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये तलवारबाजी करणारी महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी नाहीत.
त्यामुळे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी महिला दीया कुमारी नसून गुजरातमधील निकिताबा राठोड असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Sources
Social media handle of Rajasthan’s Deputy CM Diya Kumari.
Conversation with personal secretary of Rajasthan’s Deputy CM Diya Kumari.
Instagram account of Nikitabaa Rathore.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
|