About: http://data.cimple.eu/claim-review/8802d3924f751062b96e5a8911a8dc8018a1bffcbbb877670894f6dd     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Fact Check भाजप नेते आशिष शेलार यांना खजूर भरविणारा याकूब मेमन चा भाऊ नाही भाजप नेते आणि मुंबई भाजप चे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या बद्दल मागील तीन महिन्यांपासून एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका फोटोत आशिष शेलार बसलेले असून त्यांना एक व्यक्ती खजूर भरवीत आहे. या फोटोवर “आशिष शेलार यांना हिंदुत्वाचा घास भरविताना याकूब मेमन चा भाऊ” अशी कॅप्शन घालण्यात आली आहे. व्हाट्सअप आणि फेसबुक च्या माध्यमातून ही पोस्ट मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली आहे. समान मथळा आणि समान कॅप्शन सह फेसबुक वर अनेक युजर्सनी ही पोस्ट घातल्याचे दिसून आले आहे. न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. Fact check/ Verification न्यूजचेकर ने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी व्हायरल पोस्ट मधील फोटोचा रिव्हर्स इमेज सर्च केला. यावेळी आम्हाला hyderazamofficial या इंस्टाग्राम खात्याकडे नेले. आम्हाला या खात्यावर व्हायरल पोस्ट मधील फोटो सापडला. १५ एप्रिल २०२२ रोजी पोस्ट करण्यात आलेल्या या फोटो सोबत “Pleasure to Host my Brother @advocateashishshelar ji at my home for Iftaar !” म्हणजेच माझे बंधू आशिष शेलार यांना माझ्या घरी इफ्तार साठी बोलावून आतिथ्य करताना आनंदित झालो. अशा अर्थाची कॅप्शन पाहायला मिळाली. याचा अर्थ पोस्ट करणारी व्यक्ती हैदर आझम असून तीच आशिष शेलारांबद्दल बोलत असल्याचे यावरून दिसून आले. आम्ही हैदर आझम नेमके कोण? हे शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना गुगल सर्च आणि इतर समाज माध्यमांवर शोधले असता, हैदर आझम यांचे ट्विटर हॅन्डल सापडले. ही व्यक्ती भाजप महाराष्ट्राची सेक्रेटरी असल्याचे तसेच भाजप च्या मुस्लिम सेल चे सक्रिय सदस्य असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही त्यांचे अधिकृत हॅन्डल शोधले असता त्यांनी केलेले एक रिट्विट आम्हाला सापडले. ११ सप्टेंबर २०२२ रोजी खाजिम देशमुख या युजरने केलेले ट्विट त्यांनी रिट्विट केले आहे. यात “या फोटोत आशिष शेलारांसोबत असणारे गृहस्थ याकूब मेमनचे बंधू नसून महाराष्ट्र भाजप सचिव @HyderAzam आहे. खूप लोकांनी रौफ मेमन म्हणून हा फोटो वायरल केला..!!” अशी कॅप्शन आम्हाला पाहायला मिळाली. यावरून हे स्पष्ट झाले की, आशिष शेलार यांना खजूर भरविणारी व्यक्ती याकूब मेमन यांचा भाऊ नसून हैदर आझम हे आहेत. २०२२ यावर्षी २ एप्रिल पासून रमजानच्या पार्श्वभूमीवरील उपवास रोजा सुरु झाले. या दरम्यान विविध ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. अशीच पार्टी हैदर आझम यांनी आपल्या घरी ठेवली असता आशिष शेलार तेथे उपस्थित राहिले. त्यावेळी घेतलेला हा फोटो असल्याचेही या तपासात स्पष्ट झाले. एकंदर प्रकरणात स्वतः आशिष शेलार यांनी काही भाष्य केले आहे का? हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेंव्हा आम्हाला शेलार यांनी १२ सप्टेंबर २०२२ रोजी केलेले एक ट्विट सापडले. त्यामध्ये “पेंग्विन सेना कुठले जुनेपुराणे संदर्भहिन फोटो शोधून समाज माध्यमात जी माझी बदनामी करीत आहे, त्या विरोधात हैदर आझम यांनी एफआयआर दाखल केलाय. गेली 25 वर्षे मुंबईला ज्यांनी लुटले त्यांचे गोरखधंदे उघड होऊ लागल्याने सैराट झालेत. होऊद्या, खोट्या पत्त्यांचे इमले चढवत रहा..ढासळणार आहेतच!” असे म्हटले आहे. यावरून खोट्या बदनामी प्रकरणी पोलिसात तक्रार झाल्याचे उघड झाले. १२ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ४.१९ वाजता आशिष शेलार यांनी याच प्रकरणात आणखी एक ट्विट केले. “आदित्य ठाकरेंच्या निकटच्या चार जणांवर गुन्हा दाखल: पेंग्विन सेना माझी बदनामी करीत आहे – आशिष शेलार” अशा कॅप्शन खाली हे ट्विट करण्यात आले असून या ट्विट ला मराठी दैनिक दिव्य मराठी ने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीची लिंक जोडण्यात आली आहे. दिव्य मराठीने दिलेल्या त्या वृत्तानुसार, “हैदर आझम यांचे भाऊ जावेद मोहम्मद फारुख आझम यांनी अनिल कोकीळ, नीलेश पारडे, विजय तेंडुलकर आणि आकाश बागुल यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. या सर्वांविरुद्ध भादंवि कलम 153 (ए), 426, 500, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” गोरेगाव (प.) येथील बांगूर नगर पोलीस ठाण्यात या चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. अशी माहिती आमच्या तपासात उघड झाली. Conclusion आमच्या तपासात भाजप नेते आशिष शेलार यांना इफ्तार पार्टी दरम्यान खजूर भरविणारी व्यक्ती याकूब मेमन याचा भाऊ नसून भाजप नेते हैदर आझम असल्याचे स्पष्ट झाले आहे. चुकीचे संदर्भ देऊन दिशाभूल आणि वैयक्तिक बदनामी करणारा हा दावा करण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. Result: False Our Sources Post made by hyderazamofficial Tweet made by Ashish Shelar News published by Divya Marathi
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 11 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software