schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
व्हिडिओमध्ये निर्यातीसाठी अदानी बंदरावर गायींनी भरलेले अनेक ट्रक दिसत आहेत.
Fact
इराकच्या उम्म कासर पोर्टवरील व्हिडिओ अदानी पोर्टचे व्हिज्युअल म्हणून खोटेपणाने शेअर केले जात आहेत.
एका बंदरावर गुरांनी भरलेले अनेक ट्रक दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. ज्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे त्यांचा दावा आहे की त्यात गौतम अदानी यांच्या समूहाच्या मालकीच्या अदानी बंदरातून निर्यात करण्यासाठी गायी आणल्या होत्या. न्यूजचेकरला हा दावा खोटा असल्याचे आढळले. हा व्हिडीओ प्रत्यक्षात इराकमधील बंदराचा आहे.
अशा पोस्ट इथे, इथे आणि इथे बघता येतील.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडिओचे बारकाईने विश्लेषण केल्यावर, आम्ही पुरुषांना लांब पांढऱ्या पोशाखात पाहिले – असा पोशाख भारतात सामान्यतः परिधान केला जात नाही.
पुढे, आम्हाला व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या ट्रकवर ‘मर्सिडीज बेंझ’ चा लोगो दिसला. विशेष म्हणजे मर्सिडीज बेंझचे ट्रक भारतीय बाजारपेठेत विकले जात नाहीत. Daimler ही मर्सिडीज बेंझ समूहाची कंपनी ‘भारत बेंझ’ या नावाने ट्रक विकते. भारत बेंझ आणि मर्सिडीज बेंझचे लोगो वेगळे आहेत.
व्हायरल व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज शोधामुळे आम्हाला 19 एप्रिल, 2024 रोजी Hamed ELhagary या युजरच्या फेसबुक पोस्टवर नेले. त्यात अदानी बंदरातून गायींची निर्यात होत असल्याचे दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेअर केले जाणारे व्हायरल व्हिडिओतील फुटेज होते.
‘मीट मार्केट’ (अरबीमधून भाषांतरित) ची आणखी एक फेसबुक पोस्ट “ईद-अल-अधाची तयारी (अरबीमधून भाषांतरित)” या मथळ्यासह व्हायरल फुटेज सह असल्याचे पाहायला मिळाले.
आम्हाला Al Mayadeen नावाच्या चॅनेलद्वारे इराकचे उम्म कासर पोर्ट दाखवणारा YouTube व्हिडिओ सापडला. व्हायरल फुटेजसह YouTube व्हिडिओमध्ये दर्शविलेल्या पोर्टच्या व्हिज्युअलची तुलना केल्यावर, आम्हाला दोन्हीमध्ये अनेक समानता आढळली. तेच खाली पाहिले जाऊ शकते.
त्यामुळे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की इराकमधील बंदरावर गुरांनी भरलेले ट्रक दाखविणारा व्हिडिओ अदानी बंदरातून गायींची निर्यात होत असल्याचे दाखवण्यासाठी खोटेपणाने शेअर करण्यात आले आहे.
Sources
Facebook Post By Hamed ELhagary, Dated April 19, 2024
YouTube Video By Al Mayadeen Channel, Dated January 12, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
|