Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
10-15 दिवस पिंपळाच्या पानांचे सेवन केल्यास हार्ट ब्लॉकेजची समस्या 99% दूर होते.
Fact
पिंपळाच्या पानांमुळे हृदयातील अडथळे दूर होतात हा दावा चुकीचा आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जात आहे ज्यात दावा केला जात आहे की 10-15 दिवस पिंपळाच्या पानांचे सेवन केल्याने 99% हार्ट ब्लॉकेजची समस्या दूर होते.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्डच्या मदतीने शोध घेतला. आम्हाला रिसर्च गेट वेबसाइटवर 2020 मध्ये प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. पिंपळाच्या पानांचा आणि सालाचा वापर हृदयाशी संबंधित आजारांवर गुणकारी असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे, परंतु हृदयाच्या अडथळ्याच्या समस्येपासून 99 टक्क्यांपर्यंत आराम मिळतो असे कुठेही लिहिलेले नाही. या व्यतिरिक्त, आम्हाला Google शोध दरम्यान असे कोणतेही वैज्ञानिक संशोधन किंवा चाचणी सापडली नाही, ज्यामुळे या दाव्याची पुष्टी होऊ शकेल.
तपासादरम्यान, आम्ही बनारस हिंदू विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागांतर्गत कायचिकित्सा विभागाचे डॉ. विजय कुमार श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला. पिंपळाच्या पानांमुळे हार्ट ब्लॉकेजची समस्या पूर्णपणे दूर होऊ शकते या दाव्याचे त्यांनी खंडन केले. ते म्हणाले, “आमच्या ठिकाणी पिंपळाला पवित्र स्थान दिले गेले आहे. पण आयुर्वेदात असा उल्लेख नाही की पीपळाची पाने हार्ट ब्लॉकेजवर प्रभावी उपचार आहेत. हृदयाशी संबंधित कोणत्याही समस्यांबाबत डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानंतरच औषध सेवन करावे.”
हा दावा गेल्या अनेक वर्षांपासून व्हायरल होत आहे. न्यूज 24 सह अनेक माध्यम संस्थांनी देखील या दाव्याचा तपास केला आहे आणि त्याला दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे.
आमच्या तपासणीत हे स्पष्ट झाले की पिंपळाच्या पानांमुळे हृदयातील अडथळे दूर होतात हा दावा खोटा आहे.
Our Sources
Report Published at Research Gate in 2020
Conversation with Dr. ViVek Srivastava
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in