Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
बंजरग दलाने पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन केले असल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेशात बजरंग दलाने शेतकरीविरोधी काळ्या कायद्याचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हटले, आता त्यांना सत्य कळले आहे, हा चौकीदार नाही.
सध्या पेट्रोल दरवाढीविरोधात आणि केंद्राने केलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात देशात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले जात आहे. मात्र भगवे झेंडे हातात घेऊन वा रे मोदी तेरा खेल सस्ती दारु महंगा तेल च्या घोषणा देताना या व्हिडिओत आंदोलनकारी दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात बजरंग दलाने खरंच आंदोलन केले आहे का हे काही किवर्डसच्या साहाय्याने शोधले असता आम्हाला अशी बातमी कुठेही आढळून आली नाही. हा व्हिडिओ बारकाईने पाहिला असता आंदोलक सुरवातीला हिंदीत घोषणा देत असल्याचे आढळते नंतर मराठीत ‘बेईमान जनता पार्टीचं करायचं काय खाली डोकं वरती पाय’ ही घोषणा देत असल्याचे आढळून आले. यावरुन हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचे स्पष्ट झाले.
महाराष्ट्रात बजरंग दलाने हा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आणि कृषि कायदयाला विरोध करत आंदोलन केले आहे का याचा ही आम्ही शोध घेतला मात्र आम्हाला याबदद्ल देखील माहिती आढळून आली नाही. यानंतर आम्ही व्हिडिओतील काही स्क्रीनशाॅट काढून Google reverse image search च्या साहाय्याने शोध घेतला असता गावा माझा न्यूज या युट्यूब चॅनलवर हिंगोलीत शिवसेनेने पेट्रोल-डिझेल दरवाढी संदर्भात आंदोलन केल्याची 5 फेब्रुवारीची बातमी आढळून आली. यात व्हायरल व्हिडिओतील काही फुटेज देखील दिसत आहे. या आंदोलनात शिवसेनेते आमदार,संतोष बांगर, सभापती फकिरराव बांगर यांच्यासह शिवसेनेते कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले असल्याचे म्हटले आहे.
याशिवाय आम्हाला Gor Culture News या यु्ट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ आढळून आला. यात देखील हे आंदोलन हिंगोलीत शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात करण्यात आल्याचे म्हटले आहे. शिवाय व्हायरल व्हिडिओतील फुटेज आणि यातील फुटेज एकच असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हिंगोलीतील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. व्हिडिओमध्ये दिसणारे लोक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, ते बजरंग दलाचे नाहीत.
यावरुन हे स्पष्ट होते की, हिंगोलीतील शिवसेनेने मोदी सरकारविरोधात केलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ उत्तरप्रदेशातील बजरंग दलाच्या नावाने व्हायरल होत आहे.
Gaon Majha News– https://www.youtube.com/watch?v=uaQu79fJRR0
Gor Culture News- https://www.youtube.com/watch?v=8SPrHiZMcIg
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.