schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
साहित्य संमेलनाची सुरुवात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत कुराणातील आयत वाचून करण्यात आली असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड तसेच तेथील लोक दुवा मागत असल्याचे फोटोत दिसत आहे.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, या महाराष्ट्र सरकारने नवी प्रथा सुरू केली आहे, पूर्वी साहित्य संमेलनाची सुरुवात सरस्वती वंदनेने व्हायची, आता साहित्य संमेलनाची सुरुवात कुराणामधील आयतांच्या वाचनाने होते.
नुकतेच नाशिकमध्ये 94वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. याच दरम्यान हा दावा व्हायरल झाला आहे.
व्हायरल ट्विट इथे आणि संग्रहित ट्विट इथे पाहू शकता.
संग्रहित ट्विट इथे पाहू शकता.
फेसबुकवर देखील हा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
साहित्य संमेलनाची सुरुवात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत कुराणातील आयत वाचून करण्यात आली असल्याचा दावा खरा आहे का? हे घेण्यासाठी आम्ही शोध सुरु केला असता आम्हाला नाशिक येथे 3 ते पाच संप्टेंबर दरम्यान संपन्न झालेल्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाची बातमी esakal.com वर आढळून आली. यात म्हटले आहे की, 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे उद्घाटनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत संमेलन अध्यक्षांची खुर्ची रिकामीच होती. त्या खुर्चीवर डॉक्टर जयंत नारळीकरांचे रेखाचित्र ठेवण्यात आले होते.
दरम्यान, संमेलनाचे मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. संमेलनाच्या उद्घाटनावेळी कादंबरीकार विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, जावेद अख्तर, मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार श्रीनिवास पाटील, नागनाथ कोतापल्ले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील होते. याशिवाय डॉ.दादा गोरे, रामचंद्र काळुंखे, कुंडलिक अतकरे, राजमाता शुभांगिनिराजे गायकवाड, विश्वास ठाकूर, जयप्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते.
या बातमीत कुठेही सरस्वती वंदना एवेजी कुराण वाचन केल्याचा तसेच राष्ट्रवादीच्या खासदार तसेच राज्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित असल्याचा उल्लेख आढळून आला नाही.
याशिवाय डिएनए मराठी या युट्यूब चॅनलवर देखील साहित्य संमेलनाच्या ग्रंथडिंदीचा व्हिडिओ आढळून आला. यातही कुठेही कुराणमधील आयताचे वाचन केलयाचे आढळून आले नाही.
खासदार सुप्रिया सुळे व मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या व्हायरल फोटोबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही सुप्रिया सुळे यांच्या खाजगी सचिव रश्मी कामतेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की खासदार सुप्रिया सुळे नाशिकमधील साहित्य समेंलनाला उपस्थित नव्हत्या.सदर फोटो मुंबईतील सायन येथील शमीन खान यांचा मुलगा समीर खान याच्या 4 डिसेंबर रोजीच्या निकाच्यावेळीचा आहे.
या संदर्भात आम्ही सुप्रिया सुळे यांच्या पेसबुक पेजला भेट दिली असता आम्ही 4 डिसेंबर 2021 रोजीचे या निकाहाचे फेसबुक लाईव्ह आढळून आले आहेत. ज्यात खासदार सुळे आणि मंत्री आव्हाड उपस्थित असल्याचे दिसत आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट इथे पहा.
अशाप्रकारे, आमच्या तपासणीत हे स्पष्ट झाले की, खासदार सुप्रिया सुळे व जितेंद्र आव्हाड यांचा समीर खान यांच्या निकाह वेळीचा फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला आहे.
DNA Marathi-https://www.youtube.com/watch?v=UbVEKoceKW4&t=2469s
esakal.com – https://www.esakal.com/maharashtra/marathi-sahitya-sammelan-2021-inaugration-jayant-narlikar-sketch-in-chair-ssy93
Supriya sule facebook – https://www.facebook.com/watch/live/?ref=watch_permalink&v=3083285855282863
Direct contact
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad Prabhu
November 23, 2024
Vasudha Beri
November 20, 2024
Prasad Prabhu
November 20, 2024
|