schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
अमेरिकन लोकांनी अभिनेत्री मिया खलिफाचे बँक खाते गोठवले आणि तिचे पैसे इस्रायलला पाठवले.
Fact
अमेरिकेने अभिनेत्री मिया खलिफाचे बँक खाते गोठवून इस्रायलला पैसे पाठवल्याचा दावा खोटा आहे.
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर मिया खलिफाने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ एक ट्विट केले होते, ज्यानंतर सोशल मीडियावर तिच्या नावाने अनेक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दरम्यान, एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, अभिनेत्री मिया खलिफाने तिची अर्धी रक्कम पॅलेस्टाईनला दान केली आहे, यामुळे अमेरिकन लोकांनी संतप्त होऊन मिया खलिफा यांचे बँक खाते गोठवले आणि उर्वरित पन्नास टक्के रक्कम इस्रायलला दान करीत पाठवून दिली आहे. मात्र, या दाव्यात कोणत्याही अमेरिकन एजन्सीचे नाव घेतलेले नाही.
मियां खलिफाबद्दलच्या या व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, आम्ही प्रथम Google वर काही संबंधित कीवर्ड शोधले. यादरम्यान आम्हाला कोणताही विश्वसनीय रिपोर्ट आढळला नाही की ज्याद्वारे या दाव्याची पुष्टी मिळू शकेल.
दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही मिया खलिफाचे सोशल मीडिया हँडल देखील तपासले. प्रक्रियेत, आम्हाला तिच्या X (पूर्वीचे ट्विटर) किंवा इंस्टाग्राम खात्यांवर अशा कोणत्याही घटनेचा उल्लेख आढळला नाही.
तपासादरम्यान, आम्हाला आढळले की मिया खलिफाशी संबंधित अशीच बनावट पोस्ट काही दिवसांपूर्वी न्यूजचेकरने तपासली होती, ज्यामध्ये पॉर्नहबने मिया खलिफाचे खाते गोठवले होते आणि तिची मिळकत इस्रायल एड फंडमध्ये दान केल्याचा दावा करण्यात आला होता. आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की हा दावा खोटा आहे. पॉर्नहबने आम्हाला ईमेलद्वारे सांगितले की व्हायरल झालेली बातमी खोटी आहे. फॅक्टचेक येथे वाचले जाऊ शकते.
प्लेबॉय या प्रौढ मासिकाने इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावरच्या मतावरून खलिफाशी संबंध तोडल्याचे एका शोधातून समोर आले. प्लेबॉयने या निर्णयाची घोषणा करताना म्हटले आहे की, “मियाने इस्रायलवरील हमासचे हल्ले आणि निरपराध पुरुष, स्त्रिया आणि बालकांच्या हत्येचा उत्सव साजरा करताना घृणास्पद आणि निंदनीय टिप्पण्या केल्या आहेत. प्लेबॉयमध्ये, आम्ही मुक्त अभिव्यक्ती आणि रचनात्मक राजकीय वादविवादाला प्रोत्साहन देतो, परंतु द्वेषयुक्त भाषणाबद्दल आमचे शून्य-सहिष्णुतेचे धोरण आहे. “आम्हाला आशा आहे की मियाला समजले असेल की तिच्या शब्द आणि कृतींचे हे परिणाम आहेत.”
याव्यतिरिक्त, कॅनेडियन ब्रॉडकास्टर आणि पॉडकास्ट होस्ट टॉड शापिरो यांनी देखील सोशल मीडियावरील खलिफाच्या विधानानंतर खलिफासोबतचे त्यांचे व्यावसायिक व्यवहार संपवले, ज्यानंतर खलिफा यांनी ट्विट केले की “पॅलेस्टाईनला पाठिंबा दिल्याने माझ्या व्यवसायाच्या संधी बंद होत आहेत” परंतु मला स्वतःवर जास्त राग येतो की मी तसे केले नाही. मी ज्यूंसोबत व्यवसाय सुरू करणार आहे हे आधी तपासा.”
अशा प्रकारे, आमच्या तपासातून हे स्पष्ट झाले आहे की अमेरिकेने मिया खलिफाचे खाते गोठवले आहे आणि पन्नास टक्के पैसे इस्रायलला पाठवले आहेत हा व्हायरल दावा खोटा आहे.
Our Sources
Report on Variety.com, dated October 10, 2023
Tweet by Mia Khalifa, dated October 9, 2023
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम पंकज मेनन यांनी केले असून, ते येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Komal Singh
October 7, 2024
Kushel HM
January 23, 2024
Runjay Kumar
November 15, 2023
|