schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
आयआयटी खरगपूरमध्ये शिकत असताना अरविंद केजरीवाल 1987 मध्ये बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले होते.
Fact
हा दावा खोटा आहे. ऑनलाइन न्यूज पेपर क्लिप जनरेटरच्या मदतीने ‘द टेलिग्राफ’ वृत्तपत्राचे कटिंग तयार करण्यात आले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च 2024 रोजी ED ने कथित अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात अटक केली होती, त्यानंतर अरविंद केजरीवाल हेडलाइन्समध्ये राहिले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जात आहे ज्यात दावा केला जात आहे की, अरविंद केजरीवाल जेव्हा IIT खरगपूरमध्ये इंजिनिअरिंग करत होते तेव्हा त्यांना 1987 मध्ये बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले होते.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”अरविंद केजरीवाल* 1985 से 1989 तक आईआईटी खड़गपुर में इंजीनियरिंग कर रहे थे। वह दूसरे वर्ष की शुरुआत में जून 1987 में थे, तो उन्होंने स्थानीय लड़की के साथ बलात्कार किया मामला दर्ज किया गया और उन्हें जेल में डाल दिया गया। उसके लिए जेल कोई नई बात नहीं है। वह एक बड़ा झूठा है। ”
अशा अनेक सोशल मीडिया पोस्टचे संग्रहण इथे आणि इथे पाहता येईल.
हा दावा आम्हाला मराठी भाषेतून व्हाट्सअपवर व्हायरल झालेला आढळला.
तपासाच्या सुरुवातीला, आम्ही कीवर्डच्या मदतीने या दाव्याशी संबंधित रिपोर्ट शोधले, परंतु आम्हाला या दाव्याची पुष्टी करणारा कोणताही मीडिया रिपोर्ट सापडला नाही. उल्लेखनीय आहे की 2020 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीही हा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या वेळी न्यूजचेकरने केलेली तथ्य तपासणी येथे वाचता येईल.
वृत्तपत्राचे कटिंग काळजीपूर्वक पाहिल्यावर असे लक्षात येते की ‘द टेलिग्राफ’च्या कथित रिपोर्टमध्ये एका ठिकाणी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ असेही लिहिलेले आहे, (…वसतिगृहाच्या वॉर्डनने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले…) ज्यावरून त्याच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण होते.
तपासादरम्यान बारकाईने पाहणी केली असता वृत्तपत्राच्या कटिंगमध्ये अनेक विसंगती असल्याचे आढळून आले. उदाहरणार्थ, डेट लाईन चुकीची आहे आणि अनेक शब्दांमध्ये नेहमीपेक्षा जास्त स्पेस आहे. या कारणांमुळे ही क्लिप कोणत्यातरी टूलच्या साहाय्याने बनवण्यात आली असल्याचा संशय बळावतो.
आता आम्ही ऑनलाइन न्यूजपेपर क्लिप जनरेटरच्या मदतीने समान वर्तमानपत्र क्लिपिंग्ज तयार करण्याचा प्रयत्न केला. तिथे बनवलेली वृत्तपत्राची क्लिप हुबेहुब व्हायरल क्लिपसारखी दिसत होती. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ऑनलाइन न्यूजपेपर क्लिप जनरेटरच्या तिसऱ्या स्तंभातील सर्व शब्द सारखेच आहेत, ज्यामुळे हे स्पष्ट होते की व्हायरल क्लिप देखील ऑनलाइन न्यूजपेपर क्लिप जनरेटरच्या मदतीने तयार केली गेली आहे.
आमच्या तपासातून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलो की अरविंद केजरीवाल 1987 मध्ये बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले असल्याचा दावा खोटा आहे. दाव्यासोबत शेअर केलेल्या ‘द टेलिग्राफ’ वृत्तपत्रातील कटिंग ऑनलाइन वृत्तपत्र क्लिप जनरेटरच्या मदतीने तयार करण्यात आली आहे.
Sources
Website of Online Newspaper Clip Generator.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
|