schema:text
| - अमेरिका ऑस्ट्रेलिया, यु. के समवेत 18 देशांच्या मान्यतेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक कोरोना नियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले
दाव्याचे संक्षिप्त विवरण-
सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म शेअरचॅट वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की,अमेरिका आॅस्ट्रेलिया, यु. के समवेत 18 देशांच्या मान्यतेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागतिक कोरोना नियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
Verification–
शेअरचॅट वर व्हायरल होत असलेल्या या पोस्ट संदर्भात आम्ही शोध घेण्यास सुरुवात केली असता याच आशयाची आणखी एक पोस्ट आढळून आली. यात मात्र पंतप्रधान मोदी यांना अध्यक्ष करावे अशी सूचना करण्यात आल्याचे म्हटले आहे.
आम्ही गूगलमध्ये काही कीवर्ड्सच्या आधारे या दोन्ही पोस्टच्या संदर्भात शोध सुरु केला. यादरम्यान आम्हाला महाराष्ट्र भाजपाचे जनरल सेक्रेटरी अतुल भातखळकर यांचे एक ट्विट आढळून आले. यात त्यांनी WION या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या बातमीची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. या बातमीत म्हटले आहे की अमेरिका आॅस्ट्रेलिया, यु. के समवेत 18 देश कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक टास्क फोर्स बनविण्यास तयार आहेत.
याशिवाय आणखी एक ट्विट आढळून आले.
या बातमीचा व्हिडिओ ट्विटर शिवाय फेसबुक वर देखील मोठ्या प्रमाणात शेअर झाला आहे.
े.
आम्ही गूगलमध्ये WION या बातमी विषयी काही किवर्ड्सच्या मदतीने शोध घेतला असता यूटयूबवर हा व्हिडिओ आढळून आला. ही क्लिप WION वृत्तवाहिन्याच्या एका कार्यक्रमाचा भाग आहे. यात जगातील प्रमुख नेतृत्वांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली तसेच आॅस्ट्रेलियाने मोदींच्या G-20 लिकंअपचे स्वागत केले आहे असे लिहिले आहे.
ही व्हिडिओ क्लिप बारकाईने एेकली असता यात पंतप्रधान मोदींची अमेरिका यु. के समवेत 18 देशांनी टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी निवड केल्याचे अॅंकरने म्हटलेले नाही. तर ती म्हणते की, भारत
असा देश ठरला आहे की या टास्क फोर्स एक दिशा देऊ शकतो. कारण मोदींनी ही महामारी थांबवण्यासाठी अनेक देशांनी मिळून जाॅईंट अॅक्शन प्लॅन तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सर्व सार्क (भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेशन भुतान मालदीव नेपाळ, श्रीलंका) देशांनी भारताचे या प्रस्तावाचे स्वागत केले होते आणि म्हटले होते की, यह भयानक महामारीचा सामना करण्यासाठी आम्ही भारताच्या संपर्कात राहू. अॅंकरने पुढे म्हटले आहे की, ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी देखील मोदींसोबत आंतरराष्ट्रीय प्रयत्नांसाठी सोबत राहू असे सांगितले आहे. त्यांनी मोदींच्या जी-20 देशांना एकत्र करण्याच्या कल्पनेची प्रशंसा केली आहे. यात कुठेही अमेरिकेचा उल्लेख नाही.
या बातमीत कुठेही मोदींना कोविड-19 च्या टास्क फोर्सचे अध्यक्ष केले असल्याचा उल्लेख केेलेला नाही. तसेच आम्हाला मोदींनी सार्क देशांना केलेल्या आवाहनाचे ट्विट देखील आढळून आले.
याशिवाय आम्ही अमेरिकने मोदींना टास्क फोर्सचे अध्यक्ष करावे अशी सूचना केली आहे का हे पडताळून पाहिले असता इकाॅनाॅमिक टाईम्सची
बातमी आढळून आली यात दोन्ही देशांचे कोरोनाचा सामना करण्याचे एकत्र धोरण असल्याचे म्हटले आहे.पण मोदींना टास्क फोर्सचे अध्यक्ष करण्याचा यात उल्लेख नाही.
यावरुन हेच स्पष्ट होते की, एका इंग्रजी वृतवाहिनीच्या बातमीची व्हिडिओ क्लिप चुकीच्या दाव्यानिशी सोशल मीडियात व्हायरल झाली. यातून पंतप्रधा नरेंद्र मोदी यांना कोविड-19 नियंत्रणाच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष केल्याची अफवा सोशल मीडियात शेअर झाली.
Source
Sharechat
Facebook
Twitter
Google
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
|