About: http://data.cimple.eu/claim-review/bca7a8bd1638fe176edc6e6c1a06e761235fe4a4ce57139f1ffb81bb     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors An Electronics & Communication engineer by training, Arjun switched to journalism to follow his passion. After completing a diploma in Broadcast Journalism at the India Today Media Institute, he has been debunking mis/disinformation for over three years. His areas of interest are politics and social media. Before joining Newschecker, he was working with the India Today Fact Check team. भाजपाच्या प्रवक्त्यांनी नुकतेच पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल टिप्पणी केली. त्याचा इस्मालिक देशांनी कडाडून विरोध केला. हाच मुद्दा लक्षात घेत सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात रस्त्यावर हजारो लोकांची गर्दी दिसत आहे. पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल टिप्पणी केली, या घटनेसंदर्भात व्हायरल व्हिडिओ जोडला जात आहे. त्यात म्हटले आहे की, पैगंबर मोहम्मद यांच्या सन्मानासाठी सौदी अरेबिया, इराण, कतार, कुवैत, लिबिया, ओमान, अफगाणिस्तान हे एकमेकांसोबत उभे आहे. या शीर्षकासह हा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर व्हायरल होत आहे. (या ट्विटची संग्रहित केलेली दुवा इथे पाहू शकता) काही दिवसांपूर्वी टीव्ही कार्यक्रमातील एका चर्चेत भाजपाच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल टिप्पणी केली. त्यानंतर भाजपाचे माजी मीडिया सेल हेड नवीन जिंदल यांनी देखील पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी ट्विटवरून केली. दोघांनी केलेल्या विधानाचा भारतात विरोध होत होता. पण काही इस्लामिक देशांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल टिप्पणी केली, या विधानाचा त्यांनी विरोध केला. वाद अजून वाढू नये, म्हणून भाजपाने दोघांचीही पार्टीतून हकालपट्टी केली. आतापर्यंत युएई, सौदी अरेबिया, कतारसहित अन्य काही इस्लामिक देशांनी या घटनेला विरोध दर्शवला आहे. याची तथ्य पडताळणी आधी हिंदीत केली आहे, तुम्ही ते इथे वाचू शकता. Fact Check / Verification पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल टिप्पणी केली, त्या संदर्भात शेअर केल्या जाणाऱ्या व्हिडिओची माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही त्या व्हिडिओतील एक की-फ्रेम गुगलच्या रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधली. तेव्हा आम्हांला ४ जानेवारी २०२१ रोजीची एक इन्स्टाग्राम पोस्ट मिळाली. ज्यात व्हायरल दिसत आहे. ही पोस्ट त्यावेळी एका पाकिस्तानी युजरने शेअर केली होती. त्या व्हिडिओसोबत #chelam #molanakhadimrizvi #khadimhussainrizvi असे काही हॅशटॅग वापरले होते. याविषयी अधिक माहिती घेतली असता असं लक्षात आले की, त्यावेळी अनेक पाकिस्तानी युजरने हा व्हिडिओ शेअर केला होता. एका व्यक्तीने लिहिले होते की, हा व्हिडिओ लाहोरमधील आहे आणि अल्लामा खादिम हुसैन रिजवी यांच्या चेहलूमचा आहे. चेहलूम ही एक अशी प्रथा आहे, जी व्यक्तीच्या मृत्यूनंतर ४० दिवसांनी साजरी केली जाते. आम्हांला अशा काही पाकिस्तानी वृत्त वाहिन्यांवर या संदर्भातील बातम्या मिळाल्या, ज्यात खादिम हुसैन रिजवी यांच्या चेहलूमबद्दल सांगितले आहे. या बातम्यांमध्ये व्हिडिओशी मिळते-जुळते फोटो दिसत आहे. खादिम हुसैन रिजवी हे पाकिस्तानच्या एका कट्टरपंथी संघटनेचे तहरीक ए लब्बाइकचे संस्थापक होते. त्यांचे नोव्हेंबर २०२० मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाच्या ४० दिवसानंतर लाहोरमध्ये एक मिरवणूक काढली होती. हा व्हिडिओ याच मिरवणुकीचा आहे. जानेवारी २०२१ मध्ये पाकिस्तानच्या काही अधिकृत यु ट्यूब वाहिन्यांनी या मिरवणुकीचा व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये देखील व्हायरल झालेल्या व्हिडिओचे काही दृश्य पाहिले जाऊ शकतात. Conclusion अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की पैगंबर मोहम्मद यांच्यावर नुकतीच टिप्पणी केलेल्या संदर्भातील हा व्हायरल व्हिडिओ नाही. व्हायरल व्हिडिओ दीड वर्षांपूर्वीचा असून तो पाकिस्तानचा आहे. (या तथ्य पडताळणीचे न्यूजचेकर मराठीने हिंदीतून अनुवाद केला आहे) Result : False Context/False Our Sources ४ जानेवारी २०२१ रोजी केलेली इन्स्टाग्राम पोस्ट ३ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित झालेली बागी टीव्हीची बातमी ४ जानेवारी २०२१ रोजी मेसेज टीव्हीने अपलोड केलेला यु ट्यूब व्हिडिओ कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. Authors An Electronics & Communication engineer by training, Arjun switched to journalism to follow his passion. After completing a diploma in Broadcast Journalism at the India Today Media Institute, he has been debunking mis/disinformation for over three years. His areas of interest are politics and social media. Before joining Newschecker, he was working with the India Today Fact Check team.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 2 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software