Claim– मुलाने आईला खोलीत डांबले आणि पत्नीसोबत शाहीन बाग आंदोलनात 1000 रुपये आणि एका बाटली साठी गेला.
Verification–
CongressMuktBharat या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात एक वृद्ध महिलेला एका खोलीत बंद केल्याचे दिसत आहे. काही लोक खोलीचे कुलुप तोडून आत प्रवेश करताच एक महिला तिच्याजवळ जाते आणि गळ्यात पडून मोठ्याने रडताना दिसत आहे . ट्विटमध्ये दावा करण्यात येत आहे की या महिलेचा मुलगा केवळ एक हजार रुपए आणि एक बाटली मिळते म्हणून हिंदुत्वाचा द्वेष करण्यासाठी आपल्या आईला घरात बंद करुन पत्नीसह शाहीन बाग आंदोलनात गेला. वृद्ध महिलेच्या मुलीने तिची सुटका केली.
आम्ही वायरल होत असलेल्या दाव्याची पडताळणी करण्याचे ठरवले. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमधून काही स्क्रिनशाॅट्स काढले आणि गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला.
याशिवाय आम्हाला झी न्यूज
ची बातमी मिळाली ज्यात व्हायरल व्हिडिओतील वृद्ध महिलेचा फोटो होता. या बातमीत म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये एक व्यक्तीने पत्नीसह फिरण्यास जाताना आपल्या वृद्ध आईला तब्बल दहा दिवस खोलीत बंद केले. वृद्ध महिलेच्या विवाहित महिलेला याची माहिती मिळताच ती घरी पोहचली आणि शेजा-यांच्या मदतीने खोलीचे कुलूप तोडले.
प्रसिद्ध हिंदी वृत्तवाहिनी आज तक
च्या वेबसाईटवर देखील ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. यात म्हटले आहे की ती वृद्ध महिला 10 दिवस उपाशी होती, घरातील डब्यातील मिरच्या खाऊन दिवस काढत होती.
यावरुनचे हेच स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओतील वृद्ध महिलेला शाहीन बाग आंदोलनात जाण्यासाठी मुलगा आणि सुनेने खोलीत डांबले नव्हते तर उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये मुलाने पत्नीसोबत फिरण्यासाठी आपल्या आईला खोलीत दहा दिवस डांबले होते. या व्हिडिओचा किंवा घटनेचा शाहीन बाग आंदोलनाशी संबंध नाही. सोशल मीडियात चुकीच्या दाव्याने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Sources
Twitter Advanced Search
Google Reverse Image
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)