schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
व्हॉट्सअॅप लिंकसह एक संदेश व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की देशात रेकॉर्डब्रेक लसीकरणाच्या आनंदात भारत सरकार जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन- आयडियाच्या ग्राहकांना तीन महिन्यांसाठी मोफत रिचार्ज देत आहे. असा दावा करण्यात आला आहे की ही ऑफर केवळ 15 ऑक्टोबरपर्यंत वैध आहे.
व्हाट्सअॅप ग्रुप्समध्ये अनेक प्रकारचे संदेश फाॅरवर्ड केले जातात यात रिचार्ज आणि डेटा संबंधी अमेक मोहक आश्वासने दिलेली असतात. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम केला आहे. महामारीमुळे लॉकडाऊनमध्ये अशा अनेक अफवा पसरवल्या गेल्या. न्यूज चेकरने यापूर्वीही अशा अफवा तपासल्या आहेत. कोरोना साथीला सामोरे जाण्यासाठी, सरकारकडून देशाच्या कानाकोपऱ्यात लसीकरण मोहीम राबविण्यात आली आणि रेकॉर्ड लसीकरण देखील नोंदवले गेले. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 11 ऑक्टोबरपर्यंत देशात 95 कोटीहून अधिक डोस दिले गेले आहेत. या रेकॉर्ड लसीकरणाबाबत हा नवीन दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हायरल दावा ट्विटरवरही शेअर करण्यात आला आहे.
संग्रहित ट्विट येथे पाहू शकता.
भारत सरकारने या टेलिकाॅम वापरकर्त्यांसाठी मोफत रिचार्ज करण्याची योजना सुुरु केली आहे का? याचा शोध घेण्यासाठी, आम्ही सर्वप्रथम, आम्ही फॉरवर्डसह शेअर केलेली लिंक उघडली. या दरम्यान असे आढळून आले की व्हायरल लिंकवर क्लिक केल्यावर कोणतेही वेब पेज उघडत नाही.
गुगलवर व्हायरल लिंक सर्च केल्यानंतर कोणताही परिणाम आढळून आला नाही, यामुळे व्हायरल दाव्यामध्ये काहीतरी गडबड असावी असा संशय निर्माण झाला.
दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी, आम्ही इतर काही कीवर्डच्या मदतीने गुगलवर पुन्हा शोध घेतला. या दरम्यान आम्हाला PIB Fact Check ची व्हायरल दाव्यासंबंधीची एक ट्विटरवर एक पोस्ट आढळून आली. पीआयबी फॅक्ट चेकने 4 ऑक्टोबर रोजी एका पोस्टद्वारे या ही लिंक बनावट असल्याचे म्हटले आहे.
पीआयबी फॅक्ट चेक द्वारे प्राप्त माहितीनुसार, ‘व्हायरल होणारा संदेश बनावट आहे, अशी कोणतीही घोषणा भारत सरकारने केलेली नाही.’
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हायरल दाव्याचा बारकाईने अभ्यास केल्यावर असे दिसून आले की भारत सरकार देशातील खासगी दूरसंचार वापरकर्त्यांना कोणतेही विनामूल्य रिचार्ज देत नाही.
PIB Fact Check
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा
Komal Singh
April 26, 2024
Prasad Prabhu
March 9, 2024
Prasad Prabhu
March 7, 2024
|