schema:text
| - Fact Check: मालेगाव, शिवाजी नगर आणि भिवंडी (पूर्व) या तीनही जागा AIMIM ने जिंकल्याचा दावा दिशाभूल करणारा
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले. मालेगाव सेंट्रल मतदारसंघातून एआयएमआयएमचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल खलीक विजयी झाले आहेत, तर भिवंडी (पूर्व)मधून समाजवादी पक्षाचे (सपा) उमेदवार रईस कासम शेख विजयी झाले आहेत, तर शिवाजी नगरमधून भारतीय जनता पक्षाचे (बीजेपी) उमेदवार सिद्धार्थ अनिल शिरोळे विजयी झाले आहेत.
- By: Abhishek Parashar
- Published: Dec 13, 2024 at 06:33 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या निवडणुकीच्या निकालाशी संबंधित दावे अजूनही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. या संदर्भात, व्हायरल पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, मालेगाव, शिवाजी नगर आणि भिवंडी पूर्व या महाराष्ट्रातील तिन्ही जागांवर मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्याने या जागांवर बीजेपीप्रणित एनडीए आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना पराभवाचा सामना करावा लागला.
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले. मालेगाव सेंट्रल मतदारसंघातून एआयएमआयएमचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल खलीक विजयी झाले आहेत, तर भिवंडी (पूर्व)मधून समाजवादी पक्षाचे (सपा) उमेदवार रईस कासम शेख विजयी झाले आहेत, तर शिवाजी नगरमधून भारतीय जनता पक्षाचे (बीजेपी) उमेदवार सिद्धार्थ अनिल शिरोळे विजयी झाले आहेत.
काय आहे व्हायरल प्रकरण?
सोशल मीडिया वापरकर्ता ‘Adv Amey Athavale’ याने व्हायरल पोस्ट शेअर करताना लिहिले आहे, “जिथे मुस्लिम मतदारांची संख्या 51% पेक्षा जास्त आहे: मालेगाव, शिवाजी नगर आणि भिवंडी पूर्व. यामध्ये एनडीएचा पराभव झाला. यात काही आश्चर्य नाही. पण काँग्रेसचाही पराभव झाला. AIMIM विजयी झाली.
लक्षात ठेवा की, जोपर्यत ते बहुमतात नाहीत, तोपर्यंतच धर्मनिरपेक्षता जिवंत आहे”.
त्याच दाव्यासह इतर अनेक वापरकर्त्यांनी यास वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे.
तपास
महाराष्ट्रातील सर्व विधानसभा जागांसाठी (288) एकाच टप्प्यात मतदान झाले, ज्याचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी आले. निकालांनुसार, बीजेपी 132 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे आणि त्याच्या नेतृत्वाखालील आघाडीला (महायुती) सरकार स्थापन करण्यासाठी दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळाले आहे.
या निवडणुकांचे निकाल भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि आम्ही तिन्ही जागांचे निकाल तपासले आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात बीजेपी आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली होती, ज्यात बीजेपीचे उमेदवार सिद्धार्थ अनिल शिरोळे विजयी झाले. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी दत्ता बहिरट (काँग्रेस) यांचा 47,993 मतांनी पराभव केला. या जागेवर एआयएमआयएमचा उमेदवार नव्हता.
त्यानंतर आम्ही भिवंडी (पूर्व) मतदारसंघाचा निकाल तपासला. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, या मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस कासम शेख यांनी शिवसेने (शिंदे गट)च्या उमेदवाराचा 67,672 मतांनी पराभव केला.
तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. या मतदारसंघातून काँग्रेस आणि एआयएमआयएमने निवडणूक लढवली नाही.
तिसरा दावा मालेगाव संदर्भात करण्यात आला होता. मालेगाव सेंट्रल विधानसभा मतदारसंघातील एआयएमआयएमचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल खलीक यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी आसिफ शेख रशीद (इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्ब्ली ऑफ महाराष्ट्र) यांचा 162 मतांनी पराभव केला.
या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार शान ए हिंद निहाल अहमद आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजीज बेग हे होते, जे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिले.
त्याच वेळी, मालेगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार दादाजी दगडू भुसे (शिंदे गट) यांनी अपक्ष उमेदवार प्रमोद बंडुकाका पुरुषोत्तम बच्छाव यांचा 1,06,606 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात शिवसेना (उद्धव गट) आणि बहुजन समाज पक्ष तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघातून एआयएमआयएमचा एकही उमेदवार रिंगणात नव्हता.
आमच्या तपासणीतून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल पोस्टमध्ये केलेला दावा दिशाभूल करणारा आहे. व्हायरल पोस्टमध्ये केलेल्या दाव्याबाबत आम्ही मुंबई ब्युरोचे प्रमुख ओमप्रकाश तिवारी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी पुष्टी करताना सांगितले की, केवळ मालेगाव (सेंट्रल) मतदारसंघातून एआयएमआयएमचा उमेदवार विजयी झाला आहे.
भ्रामक दाव्यांसह व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या वापरकर्त्याच्या प्रोफाइलवरून एखाद्या विशिष्ट विचारसरणीने प्रेरित असलेली सामग्री शेअर केली जाते.
निष्कर्ष: महाराष्ट्रातील मालेगाव, शिवाजी नगर आणि भिवंडी (पूर्व) या तीनही विधानसभा जागांवर एआयएमआयएम जिंकल्याचा आणि बीजेपी आणि काँग्रेसने या तीन जागा गमावल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. मालेगाव सेंट्रल मतदारसंघातून एआयएमआयएमचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल खलीक विजयी झाले आहेत, तर भिवंडी (पूर्व)मधून समाजवादी पक्षाचे (सपा) उमेदवार रईस कासम शेख विजयी झाले आहेत, तर शिवाजी नगरमधून भारतीय जनता पक्षाचे (बीजेपी) उमेदवार सिद्धार्थ अनिल शिरोळे विजयी झाले आहेत.
- Claim Review : मालेगाव, शिवाजी नगर आणि भिवंडी पूर्व या महाराष्ट्रातील तिन्ही जागांवर मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्याने या जागांवर बीजेपीप्रणित एनडीए आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना पराभवाचा सामना करावा लागला.
- Claimed By : FB User-Adv Amey Athavale
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
|