schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
मुस्लिम जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली, तलवारीने त्याचा गळा कापला.
Fact
व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची संपादित दृश्ये आहेत जी एकमेकांशी संबंधित नाहीत आणि सत्य नाहीत.
एका तरुणाला मुस्लीम गटाकडून मारहाण आणि चाकूने ठार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हॉट्सअपवर आढळलेल्या या व्हिडिओमध्ये दुचाकीवर आलेल्या तरुणाला जमावा कडून बेदम मारहाण केली जाते आणि त्याला एका गेटच्या आतील परिसरात नेले जाते, त्यानंतर त्याला बांधून त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली जाते. या व्हिडीओमध्ये हिंदीत एक वाक्य लिहिलेले पाहायला मिळते, “कसाई अपना हो या पराया कसाई ही रेहता है, ओ किसीको कटने से पहिले ये नही देखता की वो बकरा है या इंसान”
जेव्हा वस्तुस्थिती तपासण्यासाठी व्हिडिओ तपासला गेला तेव्हा असे आढळून आले की दोन स्वतंत्र व्हिडिओ एकामध्ये एकत्र केले गेले आहेत. याव्यतिरिक्त, व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्स मिळवून रिव्हर्स इमेज शोध घेण्यात आला आणि 5 मे 2021 रोजी प्रसिद्ध झालेले अमर उजाला चे हे वृत्त सापडले.
या वृत्तानुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील सिक्री गावात घडली असून, अनुज नावाच्या लाइनमनला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे. सिक्री गावातील विजेच्या समस्येबाबत अनुज आला होता, त्याला एका घराची वीज जोडणी बदलण्यास सांगण्यात आले, त्याने नकार दिला, त्याचे रूपांतर वादात झाले आणि एका गटाने त्याला मारहाण केली. अशी माहिती उपलब्ध झाली.
हा व्हिडिओ ट्विटरवर देखील आढळला आणि Brijeshyadav945 या युजरने तो पश्चिम बंगालचा असल्याचा दावा करत शेअर केला होता. मात्र मुझफ्फरनगर पोलिसांनी याला उत्तर देत उत्तर प्रदेशातील ही घटना असल्याचे सांगितले आणि याप्रकरणी 10-12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशीही माहिती दिली.
मान कापल्याचा व्हिडिओही तपासण्यात आला. यासंदर्भात गुगलवर कीवर्ड सर्च केले असता 6 फेब्रुवारी 2018 रोजी news.com AU ने प्रसिद्ध केलेला रिपोर्ट सापडला. या रिपोर्टनुसार, शिरच्छेदाची घटना उत्तर अमेरिकेतील व्हेनेझुएला येथे घडली. व्हिडिओमध्ये दिसणार्या तरुणाचे ड्रग्ज माफिया टोळीशी वैर होते आणि माफिया टोळीने त्याला पकडून अज्ञात परिसरात त्याची मान कापून हत्या केली.
या घटनेचा व्हिडिओ बनवून इंटरनेटवर शेअर केल्याचे सांगण्यात आले आहे. 6 फेब्रुवारी 2018 रोजी द सननेही या घटने संदर्भात वृत्तांकन केले आहे.
आमच्या तपासात जमावाने केलेल्या हत्येचा व्हिडिओ खोटा आहे. मारहाण आणि हत्येचे दोन व्हिडिओ एकत्र जोडण्यात आले असून एकच घटना म्हणून व्हायरल करण्यात आले आहेत. पहिला व्हिडिओ वीजे समस्येशी संबंधित आहे आणि दुसरा व्हिडिओ व्हेनेझुएलातील एका घटनेचा आहे.
Our Sources
Report by Amarujala , Dated May 5, 2021
Report by News.com.au , Dated, February 6, 2018
Report by The Sun , Dated, February 6, 2018
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Runjay Kumar
January 22, 2025
Prasad Prabhu
January 21, 2025
Runjay Kumar
December 14, 2024
|