schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Coronavirus
राज्यात 15 डिसेंबर ते 31 जानेवारी पर्यंत कलम 144 लागू करण्यात येणार असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाल आहे. कोरोनाच्या ओमीक्रॅन व्हेरिएंटचे काही रुग्ण राज्यात आढळून आल्यानंतर काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. याच दरम्यान हा दावा व्हायरल झाल आहे.
आमच्या एका वाचकाने हा व्हाट्सअॅपवर इंग्रजीत शेअर होत असलेला मेसेज आमच्याकडे पडताळणीसाठी पाठविलेला आहे.
मराठी अनुवाद– ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश जारी, व्यापारी दुकानदाराची वेळ सकाळी 9 ते रात्री 8, दुकानदार व्यापारी आणि ग्राहकांनी मास्क घालणे बंधनकारक, मास्क नसताना पकडल्यास पोलिसांना कारवाईची सूट. कदाचित रात्रीचा कर्फ्यू सकाळी 9:00 ते पहाटे 5:00 पर्यंत सुरू राहील. 15 डिसेंबर 2021 ते 31 जानेवारी 2022
पर्यंत कलम 144 लागू आहे. जय महाराष्ट्र
फेसबुकवर देखील हा दावा शेअर केला जात असल्याचे आम्चया पडताळणीत आढळले आहे.
फेसबुक पोस्ट इथे पहा.
राज्यात 15 डिसेंबर ते 31 जानेवारी पर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे का तसेच राज्यात दुकानांची वेळ सकाळी 9 ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्यात आली आहे का? शिवाय ग्राहकांनी मास्क न लावल्यास दुकानदारांना दंड ठोठविण्यात येणार आहे का? याबाबत सत्यता पडळणी सुरू केली असता आम्हाला दैनिक लोकमतची 29 नोव्हेंबर रोजीची बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की, कोरोनाच्या नव्या ओमीक्राॅन व्हेरिएंटचे रुग्ण राज्यात आढळल्यानंतर नवीन निर्बंध घालण्यात आले आहेत. याच ग्राहकांनी मास्क लावलेला नसेल तर दुकानदारांना 10 हजार रुपयांचा दंड होणार आहे. मात्र सरकारच्या निर्णय पुणे व्यापारी संघाने तसेच राज्यातील अनेक व्यापारी संघांंनी विरोध केलेला आहे.
या संदर्भात आम्ही पुणे व्यापारी संघाचे सचिव महेंद्र पिताळिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ग्राहकांना मास्क नसल्याच दुकानदारांना 10 हजार रुपये दंड होणार असल्याचे वृत्त खरे आहे, आम्ही जगजागृती करत आहोतच पण ग्राहकांना मास्क न लावल्यास दुकानांदारावर कारवाई करणे चुकीचे आहे. सरकारने या आदेशचा पुनर्विचार करावा. दुकानाच्या वेळासंदर्भातील व्हायरल दाव्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सरकारने रात्री आठ वाजता दुकान बंद करण्याचे आदेश दिलेले नाहीत. सध्या पुण्यात रात्री 11 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे.
15 डिसेंबर पासून 31 जानेवारी 2022 पर्यंत राज्यात कलम 144 लागू करणयात येण्यात असेल्या दाव्याबाबत आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असता आम्हाला सांगण्यात आले की मुख्यमंत्र्यांनी असा आदेश आज दिलेला नाही. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निवासी जिल्हाधिकारी निर्णय घेत असतात.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी आम्ही पुणे शहर सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 144 कलम लागू करण्याबाबत सरकारडून आदेश येत असतो तसेच स्थानिक पातळीवर देखील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन हे कलम लागू करण्यात येते. मात्र सध्या ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा सरकारने आम्हाला आदेश दिलेला नाही.
तसेच पुण्यातील आणि मुंबईतील शाळा 15 व 16 डिसेंबरपासून सुरु होण्याबाबतच्या बातम्या देखील आम्हाला आढळून आल्या. मात्र मुंबईत 16 ते 31 डिसेंबरपर्यंत ख्रिसम्रस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काही निर्बंध लावण्यात आले असल्याची बातमी आढळून आली. मात्र या बातमीत ही 31 जानेवारीप
अशाप्रकारे, आमच्या पडताळणीत आढळले की, राज्यातील दुकानांची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत करण्यात आलेली नाही. तसेच 31 जानेवारी 2022 पर्यंत राज्यात 144 कलम लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले नाहीत.
Lokmat: https://www.lokmat.com/pune/pune-chamber-commerce-opposes-10-thousand-fine-decision-shopkeepers-if-customer-does-not-wear-mask-a727/
Zee24 tass: https://zeenews.india.com/marathi/photos/mumbai-school-reopen/596430
Direct contact
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad Prabhu
February 24, 2024
Prasad Prabhu
February 21, 2024
Prasad Prabhu
January 25, 2024
|