Claim– नवी मुंबई वाशी जुहूगाव सेक्टर 11 येथे बाॅयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडले आहे.
Verifacation– नवी मुंबईतील वाशी जुहूगांव सेक्टर 11मध्ये बाॅयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस सापडल्याची पोस्ट फेसबुकवर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये ब्राॅयरल चिकन न खाण्याचे आवाहन केले आहे.
अशाच आणखी काही पोस्ट आम्हाला आढळून आल्या.
आम्ही व्हायरल दाव्यांची पडताळणी सुरु केली असता आम्हाला दैनिक सकाळची
एक बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे चिकन खाणा-याचीं संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे दर 30 टक्क्यांनी उतरले आहेत.
मात्र या बातमीत किंवा अन्य माध्यमांत कुठेही नवी मुंबईत किंवा इतर ठिकाणी ब्राॅयरल चिकनमध्ये कोरोना व्हायरस आढळल्याची माहिती दिलेली नाही. यानंतर आम्ही व्हायरल होत असलेल्या दाव्यासंदर्भात वाशी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस जुहूगावातील चिकन सेंटरमध्ये मिळाल्याचा मेसेज समाजमाध्यमांत वाशी पोलिस ठाण्याच्या नावाने व्हायरल झाला आहे. हा मेसेज खोटा असून यावर कोणीही विश्वास ठेवू नये.
याविषयी आणखी माहिती मिळवण्यासाठी आम्ही शोध सुरु ठेवला असता आम्हाला आज तक
या वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, केंद्रीय पशुपालन मंत्री गिरिराज सिंह यांनी कोरोना व्हायरसचा पोल्ट्रीशी काहीही संबंध नसल्याचा व भारतीय चिकन पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे.
यावरुन हेच सिद्ध होेते की नवी मुंबईत ब्राॅयरल चिकनमध्ये कोरोना व्हायरस आढळला नाहीं किंबहुना भारतात असा प्रकार आढळून आलेला नाही. सोशल मीडियात चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवून लोकांची दिशाभूल केली जात आहे.
Sources
Facebook Search
Google Search
Direct contact
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)