About: http://data.cimple.eu/claim-review/f68e62cdd72541656b478e05205c676631e018a979f5d48070f388b5     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती म्हणून फिल्टर न करता येणारे पाणी गरम करून प्या. Fact प्रारंभी पुणे आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या नावे व्हायरल मेसेज अफवा आहे. महाराष्ट्रातील काही शहरात जीबीएस सिंड्रोमचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर उपाययोजना जारी करीत असताना पाणी गरम करून पिण्याचा सल्ला यंत्रणा देत आहेत. दरम्यान नागरिकांच्या भीतीत भर घालणारा एक मेसेज सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती म्हणून फिल्टर न करता येणारे पाणी गरम करून प्या असे आवाहन प्रारंभी पुणे आणि आता मुंबई महानगरपालिकेने केल्याचा दावा केला जात आहे. मात्र आमच्या तपासात संबंधित मेसेज खोटा असून अफवा असल्याचेच स्पष्ट झाले आहे. न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. “विशेष सुचना महानगरपालिकेतर्फे सर्वाना विनंती आहे की पाणी गरम करून प्यावे. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बिघाड झाल्याने येत्या ३ किंवा ४ दिवसात कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेतर्फे पाणी फिल्टर न करता सोडण्यात येणार आहे. कृपया ही माहिती आपल्या सर्व मित्र परिवाराला कळवावी आणि आपण पण काळजी घ्यावी.” असा मूळ मेसेज असून त्यामध्ये आता विविध शहरांच्या नावांची भर पडत असल्याचे आणि हा मेसेज व्हाट्सअपच्या माध्यमातूनही मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. Fact Check/ Verification तपासाची सुरुवात करताना आम्ही सर्वप्रथम व्हायरल मेसेजमध्ये म्हटल्याप्रमाणे कोणत्या शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बिघडले आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यासंदर्भातील काही बातम्या आम्हाला मिळाल्या नाहीत. दरम्यान आम्ही कोणत्या महानगरपालिकेने पाणी फिल्टर म्हणजेच शुद्धीकरण न करता सोडणार हे जाहीर केले आहे का? याचाही शोध घेतला. मात्र त्याबद्दल काहीच अधिकृत सापडले नाही. व्हायरल दाव्यांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका असा उल्लेख आढळल्याने आम्ही प्रथम मुंबई महानगरपालिकेचे सोशल मीडिया हँडल तपासले आणि त्यांच्या कोणत्याही हँडलवर अशी कोणतीही घोषणा नसल्याचे आढळले. पडताळणीसाठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत X हॅन्डल याठिकाणी पाहता येईल. त्यानंतर आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधला, त्यांनी आम्हाला कळवले की, “मुंबई आणि परिसरात कोठेही जलशुद्धीकरण प्रकल्पाचा फिल्टर बिघडल्याची घटना घडलेली नाही. व्हायरल मेसेज दिशाभूल करणारा आणि खोटा आहे.” यानंतर काही दाव्यांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका असा उल्लेख आढळल्याने याबद्दल आणखी तपास करताना आम्हाला @prasadpanseMT या X युजरने “पुणे महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मध्ये बिघाड झाल्याच्या व्हायरल मेसेज म्हणजे अफवा महापालिकेचे स्पष्टीकरण” अशा कॅप्शनखाली केलेली २९ जानेवारी २०२५ रोजीची एक पोस्ट आढळली. व्हायरल मेसेज ही अफवा असल्याचे स्पष्टीकरण पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली असे सांगणारी ही पोस्ट असल्याचे आणि पोस्ट करणारी व्यक्ती महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रिन्सिपल करस्पॉन्डेन्ट असल्याचे आमच्या निदर्शनास आले. यावरून सुगावा घेऊन पुणे महानगरपालिकेने यासंदर्भात कोठे अधिकृत भाष्य केले आहे का? याचा आम्ही शोध सुरु केला. आम्हाला पुणे महानगरपालिकेने आपल्या @PMCPune या अधिकृत X हॅण्डलवरून २९ जानेवारी २०२५ रोजी केलेली पोस्ट मिळाली. संबंधित व्हायरल मेसेज पॉईंट आऊट करीत, “या प्रकारच्या संदेशांना अफवा समजावे. सर्व पुणे महानगरपालिकेचे पाण्याच्या शुद्धीकरण प्रकल्पांचे गाळणी यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत आहेत.” अशी माहिती देऊन व्हायरल दाव्याचे खंडन करण्यात आलेले असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही या हँडलवर अधिक शोध घेताना जीबीएस सिंड्रोमच्या प्रादुर्भावाने उदभवणाऱ्या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी पुणे महानगरपालिकेने जारी केलेल्या सूचनांची माहिती आम्हाला मिळाली. यामध्ये शुद्ध पाणी प्या आणि शक्यतो ते गरम करून प्या… असा सल्ला आम्हाला आढळला. मात्र व्हायरल संदेशात म्हटल्याप्रमाणे जलशुद्धीकरण प्रकल्पातील फिल्टर खराब झाल्याने अशुद्ध पाणी किंवा फिल्टर न केलेले पाणी सोडले जाणार आहे, असा उल्लेख आम्हाला कोठेच आढळला नाही. अधिक तपासासाठी आम्ही पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागांशी संपर्क साधला असता, “व्हायरल मेसेज हा अफवेचा भाग असून त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये.” अशी माहिती आम्हाला मिळाली. जीबीएस सिंड्रोम पासून सावधगिरी बाळगण्यासाठी पुणे महानगरपालिकेने पाणी गरम करून प्या असे सांगितलेले आहे. मात्र जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या दुरुस्तीचा उल्लेख कुठेही आढळलेला नाही. Conclusion अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती म्हणून फिल्टर न करता येणारे पाणी गरम करून प्या हा मेसेज अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. Result: False Our Sources Tweet made by Journalist Prasad Panase on January 29, 2025 Tweet made by Pune City Corporation on January 29, 2025 Conversation with Health and Water Supply Department of Pune City Corporation Conversation with PRO Office, BMC (Brihanmumbai Municipal Corporation) Official handle of BMC (Brihanmumbai Municipal Corporation) कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 11 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software