schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Crime
Claim
इस्रायलवर हल्ला करण्यासाठी मोटार फिट ग्लायडरमधून उतरलेले हमासचे सैनिक.
Fact
हा व्हिडिओ इजिप्तची (Egypt) राजधानी कैरो (Cairo) येथील आहे.
पॅराशूटने उतरणाऱ्या लोकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्यात दावा केला जात आहे की “हे दृश्य इस्रायलचे आहे, जिथे हमासचे सैनिक मोटर फिट केलेल्या ग्लायडरमधून उतरले आणि उद्यानांमध्ये उत्सव साजरा करत असलेल्या इस्रायली नागरिकांवर गोळीबार सुरू केला”.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की हा व्हिडिओ आखाती देश इजिप्तची (Egypt) राजधानी कैरो (Cairo) येथील आहे आणि त्यात दिसणारे ठिकाण अल-नसर स्पोर्ट्स क्लब आहे.
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये आयोजित संगीत महोत्सवावर मोठा हल्ला झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी पॅलेस्टिनी संघटना हमासने घेतली होती, ज्याला अमेरिका आणि इंग्लंडसह अनेक देशांनी दहशतवादी संघटना घोषित केले आहे. या हल्ल्यात शेकडो प्रेक्षकांना जीव गमवावा लागला. यानंतर इस्रायलने हमासच्या अनेक लष्करी तळांवर हल्लेही केले. या संघर्षात आतापर्यंत 4000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे 25 सेकंदांचा आहे. व्हिडिओमध्ये अनेक पॅराशूट क्रीडा मैदानात उतरताना दिसत आहेत. पॅराशूट लँडिंग दरम्यान, तेथे उपस्थित लोक ते पाहण्यासाठी धावताना दिसतात.
हा व्हिडीओ फेसबुकवर मोठ्या कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे, ज्यात लिहिले आहे की, “धोका डोके वर काढत होता, बंदुकांसह सशस्त्र दहशतवादी मोटर फिट ग्लायडर्सवरून खाली उतरत होते पण इस्त्रायली नागरिक उद्यानांमध्ये उत्सव साजरा करत होते, असे वाटत होते की काही खेळ चालू आहे. ते शिट्ट्या वाजवत व्हिडिओ बनवत होते, AK47 चा आवाज सुरू झाला तेव्हा त्यांना एक मिनिट काहीच समजले नाही.
व्हायरल व्हिडिओ तपासण्यासाठी, Newschecker ने प्रथम व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. आम्हाला एक व्यक्तीच्या टी-शर्टवर El-NASR SC लिहिलेले आढळले.
जेव्हा आम्ही Google वर वरील शब्द शोधले तेव्हा आम्हाला El-NASR SC चे Facebook अकाउंट सापडले. फेसबुक अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार, हा इजिप्तची राजधानी कैरो येथील स्पोर्ट्स क्लब आहे.
यानंतर, आम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी दृश्ये फेसबुक पेजवर उपस्थित असलेल्या काही व्हिडिओंशी जुळवली. आम्ही दोन्ही व्हिडिओंमध्ये एकाच इमारतीची दृश्ये पाहायला मिळाली.
तपासादरम्यान या क्लबबाबत बनवलेले काही व्हिडिओही यूट्यूबवर शोधण्यात आले. या प्रक्रियेत, आम्हाला 21 डिसेंबर 2021 रोजी Lulua life नावाच्या YouTube खात्यावरून अपलोड केलेला व्हिडिओ आढळला. या व्हिडिओच्या सुमारे 2 मिनिटे 20 सेकंदावर, आम्हाला व्हायरल व्हिडिओसारखे दृश्य आढळले, जे तुम्ही खाली पाहू शकता.
शोध घेतल्यावर, आम्हाला Google Map वर El-NASR SC च्या आजूबाजूच्या परिसराची चित्रे देखील सापडली, जी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेल्या दृश्यांशी जुळतात.
आमच्या आतापर्यंतच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडिओ इजिप्तच्या El-NASR क्लबचा आहे. आम्ही आमच्या तपासणीत El-NASR क्लबशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचा प्रतिसाद आल्यावर है लेख अपडेट केला जाईल.
तपासात, आम्ही अरबी कॅप्शनच्या मदतीने TikTok वर व्हायरल झालेल्या व्हिडिओशी संबंधित व्हिडिओ शोधले, कारण अरेबियासह इतर अनेक खंडातील लोक देखील TikTok वापरतात. भारतात TikTok वर बंदी असल्याने, आम्ही VPN च्या मदतीने त्याचा वापर केला.
यादरम्यान, आम्हाला 28 आणि 29 सप्टेंबर 2023 रोजी eslamre1 नावाच्या टिक टॉक यूजरने अपलोड केलेले दोन व्हिडिओ आढळले. या व्हिडिओमध्ये, El-NASR SC च्या मैदानावर पॅराशूट लँडिंगची दृश्ये आहेत. या व्हिडिओंसोबतच्या कैप्शनमध्ये अरबीत El-NASR क्लब लिहिलेले आहे.
अलीकडेच आम्ही पॅराशूट लँडिंगचा एक व्हिडिओ तपासला होता. यावेळी, अरेबिक फॅक्ट चेकिंग आउटलेट tafnied.com चे मुख्य संपादक Hossam Alwakil यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, इजिप्शियन मिलिटरी अकादमीच्या 117 व्या बॅचच्या पदवीदान समारंभाच्या आधीच्या तयारीची ही दृश्ये आहेत. 13 ऑक्टोबर रोजी मिलिटरी कॉलेजच्या 117 व्या बॅचचा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता.
आमच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडिओ इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाशी संबंधित नाही, तर हा व्हिडिओ इजिप्तची राजधानी कैरो येथील El-NASR SPORTS CLUB मधील आहे.
Our Sources
El-NASR SC Facebook Account: Video Published on 20th November 2021
El-NASR SC Google Maps Photo
Lulua life YouTube Account: Video Published on 21th December 2021
eslamre1 Tik tok Account: Video Published on 28th and 29th September 2023
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम रुंजय कुमार यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
April 20, 2024
Runjay Kumar
October 17, 2023
Saurabh Pandey
October 13, 2023
|