About: http://data.cimple.eu/claim-review/0b7cd226e5fd63c21fcfb09c0f5485dafba145c7233ffde7ab42c197     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim FASTag मधून पैसे काढण्याची नवी पद्धत आली असून त्याद्वारे वाहनचालकांची लूट सुरु आहे. Fact हा दावा खोटा आहे. व्हायरल व्हिडीओ स्क्रिप्टेड असून अशी लूट होणे असंभव असल्याचे NETC ने स्पष्ट केले आहे. FASTags स्कॅन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून वाहन मालकांकडून पैसे लुटण्याची नवीन पद्धत आली आहे असा आरोप करणाऱ्या व्हिडिओमुळे अनेक सोशल मीडिया युजर्स चिंता व्यक्त करत आहेत. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सॲपवर फिरत असलेल्या या व्हिडिओने चिंता निर्माण केली असून संबंधित व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. चिंताग्रस्त युजर्सनी एनईसीटी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. न्यूजचेकरला आढळले आहे की दावा खोटा आहे आणि व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे. व्हायरल व्हिडिओत एक मुलगा कारची विंडशील्ड साफ करत असताना आणि वाहन मालकाने त्याला थांबवल्यानंतर त्याच्या मनगटावरील ‘ॲपल घड्याळ’ बद्दल विचारताना दाखविण्यात आले आहे. असे घडताच तो मुलगा पळू लागतो. तेव्हा कारमधील एकजण त्याचा पाठलाग करतो. मुलगा पळून जाण्यात यशस्वी होत असताना, ड्रायव्हरच्या सीटवर बसलेली व्यक्ती नवीन “घोटाळ्या” बद्दल स्पष्टीकरण देते, ज्यामध्ये, ट्रॅफिक सिग्नलमध्ये कार साफ करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारे मुलांना या घड्याळांसह FASTags वर स्वाइप करण्यासाठी नियुक्त करतात. “जेव्हा हे उपकरण कारच्या विंडशील्डवर FASTag वर हलवले जाते, तेव्हा ते स्कॅन करते आणि पेटीएम खात्यातून पैसे काढते,” असे तो माणूस स्पष्ट करतो. न्यूजचेकरला आमच्या व्हॉट्सॲप टिपलाइन नंबरवर (+91-9999499044) हा व्हिडिओ प्राप्त झाला असून तथ्य तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. FASTag म्हणजे काय? NETC वेबसाइटनुसार, FASTag वाहनाच्या विंडस्क्रीनवर चिकटवलेला असेल आणि ग्राहकाला NETC FASTag शी लिंक असलेल्या खात्यातून थेट टोल पेमेंट करण्यास सक्षम करेल. यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञान वापरले जाईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या वर्षी जाहीर केले होते की, 15-16 फेब्रुवारी 2021 च्या मध्यरात्रीपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझातील सर्व लेन “फी प्लाझाच्या फास्टॅग लेन” म्हणून घोषित केल्या जातील. Fact Check/ Verification Facebook वर “FASTag” साठी एक साधा कीवर्ड शोध घेतला असता, आम्हाला फेसबुकवरील “BakLol Video” या व्हेरीफाईड पेजच्या 24 जून 2022 रोजी केलेली एक पोस्ट मिळाली. ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओ आहे. त्याचे शीर्षक “जर तुमच्याकडे FASTAG असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा” असे आहे. पेज पूर्णपणे स्कॅन केल्यावर, न्यूजचेकरला आढळले की ते स्क्रिप्टेड सामग्री पोस्ट करते. पृष्ठाच्या ‘About’ विभागात, “तुमच्यासाठी फेसबुकवर सर्वात मजेदार व्हिडिओ” असे, तर ‘Intro’ मध्ये, “आम्ही मनोरंजन करण्यात आनंदी होतो!” असे म्हटले आहे. आमच्या पुढे असे लक्षात आले की व्हायरल क्लिपमध्ये दिसणारे दोन पुरुष एकापेक्षा जास्त व्हिडिओंमध्ये सहभागी असून त्यांनी येथे अभिनय केला आहे. BakLol व्हिडिओच्या अधिकृत YouTube चॅनेलवरील वर्णनाने याची पुष्टी केली आहे. “हे मनोरंजनासाठी आहे, हसत राहा, मजा करा आणि आनंद घ्या… पहात राहा, शेअर करत रहा, टॅग करत रहा”, असे त्यात लिहिले आहे. व्हिडिओच्या पुष्टीकरणासाठी न्यूजचेकरने BakLol व्हिडिओशी देखील संपर्क साधला, ज्यांनी स्पष्ट केले की “व्हिडिओ केवळ सामाजिक जागरूकतेसाठी आहे”, आणि तो स्क्रिप्टेड असल्याची पुष्टी केली. तपास सुरू ठेवत, न्यूजचेकरने व्हायरल व्हिडिओ शेअर केलेल्या विविध पोस्टच्या कॉमेंट विभागांमधून स्कॅन केले आणि FASTag NETC द्वारे असे ट्विट आढळले की असा घोटाळा शक्य नाही. “NETC FASTag व्यवहार फक्त registered merchants (टोल आणि पार्किंग प्लाझा ऑपरेटर) द्वारे सुरू केला जाऊ शकतो जे NPCI द्वारे फक्त संबंधित Geo Locations वरून ऑनबोर्ड केलेले आहेत. कोणतेही अनधिकृत उपकरण NETC FASTag वर कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकत नाही. हे पूर्णपणे सुरक्षित आहे,” FASTag NETC ने केलेल्या ट्विटची संग्रहित आवृत्ती येथे आढळू शकते. पेटीएमने 25 जून 2022 रोजी केलेल्या ट्विटमध्ये देखील हेच स्पष्टीकरण जारी केले आहे. “पेटीएम फास्टॅगबद्दल एक व्हिडिओ चुकीची माहिती पसरवत आहे ज्यामध्ये स्मार्टवॉच FASTag स्कॅनिंग करीत असल्याचे चुकीचे दाखवले आहे. NETC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, FASTag पेमेंट केवळ authorized merchants द्वारे केले जाऊ शकतात, चाचणीच्या अनेक फेऱ्यांनंतर ऑनबोर्ड केले जाऊ शकतात. पेटीएम फास्टॅग पूर्णपणे सुरक्षित आहे,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याची संग्रहित आवृत्ती येथे आढळू शकते. Conclusion नवीन ‘फास्टॅग स्कॅम’चा आरोप करणारा व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आणि तथ्य नसलेला आहे. Result: False Sources Facebook Post By BakLol Video, Dated June 24, 2022 Conversation With BakLol Video Via E-Mail on June 25, 2022 Tweet By @FASTag_NETC On June 24, 2022 Tweet By @Paytm On June 25, 2022 (हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम वसुधा बेरी यांनी केले असून, ते इथे पाहता येईल.) कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 3 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software