schema:text
| - Fact Check: रितेश देशमुख यांच्या नावाने आरएसएसवर टीका करणारे ट्विट बनावट आहे
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले. आरएसएस प्रमुख आणि संघावर टीका करणारे रितेश देशमुख यांच्या नावाने व्हायरल झालेले हे ट्विट बनावट आणि तयार करण्यात आले आहे. रितेश देशमुख हे, अधिकृतपणे X वर ‘@Riteishd’ हँडलसह उपस्थित आहेत आणि त्यांच्या प्रोफाइलवरून असे काहीही पोस्ट करण्यात आलेले नाही. ही पोस्ट त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या विडंबनात्मक खात्यावरून (पॅरोडी अकाऊंट) करण्यात आली आहे, ज्याला X वर सहा हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.
- By: Abhishek Parashar
- Published: Dec 23, 2024 at 06:32 PM
- Updated: Dec 23, 2024 at 06:42 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि मोहन भागवत यांच्यावर केलेल्या टीकेवर आधारित बॉलिवूडचे अभिनेता रितेश देशमुख यांच्या नावाने एका कथित एक्स-पोस्टचा (ट्विट) स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रितेश देशमुख यांच्या नावाने ही पोस्ट अशा वेळी व्हायरल होत आहे, जेव्हा त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा भाऊ आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार धीरज देशमुख यांचा प्रचार केला होता.
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळून आले. आरएसएस प्रमुख आणि संघावर टीका करणारे रितेश देशमुख यांच्या नावाने व्हायरल झालेले हे ट्विट बनावट आणि तयार करण्यात आले आहे. रितेश देशमुख हे, अधिकृतपणे X वर ‘@Riteishd’ हँडलसह उपस्थित आहेत आणि त्यांच्या प्रोफाइलवरून असे काहीही पोस्ट करण्यात आलेले नाही. ही पोस्ट त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या विडंबनात्मक खात्यावरून (पॅरोडी अकाऊंट) करण्यात आली आहे, ज्याला X वर सहा हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.
काय आहे व्हायरल प्रकरण?
‘Sameer Khan‘ या सोशल मीडिया वापरकर्त्याने दोनशेहून अधिक लोकांनी लाईक केलेल्या वायरल पोस्टला (संग्रहित लिंक) शेअर केले आहे.
तपास
व्हायरल पोस्टमध्ये दिसत असलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसणारे हँडल हे, ‘@Deshmukh_0’ आहे, जे रितेश देशमुख यांच्या अधिकृत हँडल, ‘@Riteishd’ पेक्षा वेगळे आहे.
रितेश देशमुख यांच्या मूळ आणि अधिकृत हँडलवर आम्हाला अशी कोणतीही राजकीय पोस्ट सापडली नाही.
त्यानंतर आम्ही व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये दिसणाऱ्या ट्विटच्या हँडल तपास केला. या शोधात, आम्हाला हे हँडल, एक्सवर आढळले, ज्याच्या बायोमध्ये सरळपणे आणि स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे की, ते रितेश देशमुख यांच्या नावावर बनविलेले विडंबनात्मक खाते आहे.
जानेवारी 2024 पासून हे खाते एक्सवर आहे आणि त्याचे सहा हजारांहून अधिक फॉलोअर आहेत. या विडंबनात्मक खात्याचे हँडल हे, ‘@Deshmukh_0’ आहे, तर रितेश देशमुख यांचे अधिकृत खात्याचे हँडल हे, ‘@Riteishd’ आहे.
आमच्या तपासातून स्पष्ट झाले आहे की, आरएसएस आणि संघावर टीका केल्याच्या दाव्यासह व्हायरल होत असलेले रितेश देशमुख यांचे ट्विट किंवा एक्स-पोस्टचा स्क्रीनशॉट हा, त्यांच्या नावाने सुरू असलेल्या विडंबनात्मक खात्याचा आहे.
ही बाब उल्लेखनीय आहे की, नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र निवडणुकीत रितेश देशमुख यांनी त्यांचे भाऊ आणि काँग्रेसचे उमेदवार, धीरज देशमुख यांचा प्रचार केला होता. जागरण डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, धीरज देशमुख हे, लातूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते.
व्हायरल झालेल्या पोस्टबाबत आम्ही चित्रपट समीक्षक आणि मनोरंजन पत्रकार, पराग छापेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पुष्टी करताना सांगितले, “व्हायरल पोस्टमध्ये दिसणारा स्क्रीनशॉट हा, रितेश देशमुख यांच्या अधिकृत हँडलचा नाही.”
व्हायरल पोस्ट शेअर करणारा वापरकर्ता हा, फेसबुकवर रवीश कुमारच्या नावाने तयार केलेल्या फॅन क्लब पेजचा मॉडरेटर आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका आणि इतर पोटनिवडणुकांशी संबंधित इतर व्हायरल दाव्यांचे फॅक्ट चेक रिपोर्ट, विश्वास न्यूजच्या निवडणूक विभागात वाचता येतील.
निष्कर्ष: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केल्याचा दावा करणाऱ्या रितेश देशमुख यांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या ट्विट किंवा एक्सचा स्क्रीनशॉट बनावट आहे. ही त्यांच्या नावावर बनवलेल्या विडंबनात्मक खात्यावरून करण्यात आलेली पोस्ट आहे, ज्याला रितेश देशमुख यांची सोशल मीडिया पोस्ट असल्याचे समजून वापरकर्ते शेअर करत आहेत.
- Claim Review : RSS वर टीका करताना रितेश देशमुख यांनी ट्विट केले.
- Claimed By : FB User-Sameer Khan
- Fact Check : False
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
|