About: http://data.cimple.eu/claim-review/179b3c3d7e633cfaf8e0ced45a9d3ffd3dc51a410e30097fc13b081b     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Coronavirus XBB व्हेरिएंटवर व्हायरल व्हाट्सअप फॉरवर्डला काही आधार नाही (हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम प्रशांत शर्मा यांनी केले आहे.) शेजारच्या चीन, जपान आणि यूएसमध्ये कोविड-19 रुग्णामधील वाढीमुळे कोविड-19 बद्दलच्या चुकीच्या माहितीतही वाढ झाली आहे. ‘XBB omicron variant’ संबंधी लक्षणे आणि सावधगिरीबद्दल युजर्सना चेतावणी देणारे व्हायरल व्हाट्सअप फॉरवर्ड करणे नव्याने सुरु झाले आहे. व्हायरल मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की “कोविड- ओमिक्रॉन एक्सबीबी हा नवीन व्हायरस डेल्टा प्रकारापेक्षा 5 पट जास्त विषाणूजन्य आहे आणि त्याचा मृत्यू दर जास्त आहे”. पुढे मेसेज सांगतो की, “नवीन XBB प्रकाराच्या लक्षणांमध्ये खोकला किंवा ताप यांचा समावेश नाही परंतु मर्यादित संख्येत सांधेदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, मानदुखी आणि न्यूमोनिया ही त्याची लक्षणे असतील.” संपूर्ण संदेश खाली पाहता आणि वाचता येईल. न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. Fact check/ Verification तपासात, न्यूजचेकरला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे एक ट्विट आढळले ज्यामध्ये व्हायरल संदेश बनावट असल्याचे स्पष्ट केले. “#COVID19 च्या XBB प्रकारासंबंधी काही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा संदेश फिरत आहे. संदेश #बनावट आणि #दिशाभूल करणारा आहे,” असे ट्विट सांगते. आम्हाला DIPR कथुआचे आणखी एक ट्विट देखील आढळले आहे ज्यात हा व्हायरल संदेश बनावट असल्याचे म्हटले आहे. XBB प्रकार प्रथम 13 ऑगस्ट 2022 रोजी आढळून आला आणि त्याची तीव्रता आणि पुनर्संक्रमण जोखीम यासंबंधीची नवीन उपलब्ध माहिती ऑक्टोबर 2022 च्या रिपोर्टमध्ये आहे. W.H.O. च्या तांत्रिक सल्लागार गटाने सिंगापूर, भारत आणि इतर काही देशांमधील प्रारंभिक पुरावे तपासले आणि असे आढळले की XBB प्रकारामुळे रोगाची तीव्रता वाढली आहे असे सूचित करणारा कोणताही पुरावा नाही. “पुढील अभ्यासाची गरज असताना, सध्याचा डेटा XBB* संसर्गासाठी रोगाच्या तीव्रतेमध्ये लक्षणीय फरक असल्याचे सूचित करत नाही,” असे त्यात लिहिले आहे. शिवाय, XBB व्हेरियंट हे ओमिक्रॉन व्हेरियंटचे सबलाइनेज आहे, जे अभ्यासानुसार, डेल्टा व्हेरियंटपेक्षा कमी गंभीर आहे. त्यामुळे डेल्टा व्हेरियंटपेक्षा पाचपट जास्त विषाणूजन्य असल्याचा दावा खरा नाही. न्यूजचेकरने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महामारीविज्ञान आणि संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख डॉ आर गंगखेडकर यांच्याशीही संपर्क साधला, ज्यांनी व्हायरल संदेशात तथ्य नसल्याची पुष्टी केली. “व्हायरल मेसेजमध्ये नमूद केलेल्या, XBB मध्ये इतर कोणत्याही ओमिक्रॉन प्रकाराप्रमाणेच लक्षणे आढळतात आणि या प्रकाराचे चांगले निदान झाले आहे. XBB प्रकारामुळे प्रभावित झालेल्या लोकांना ताप, खोकला आणि शरीरातील सौम्य वेदना होतात, ही सर्व लक्षणे सौम्य असतात. परंतु कोणत्याही प्रकारे हा प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा धोकादायक नाही. XBB प्रकारात हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे आणि हा आजार भारतासाठी नवीन नाही” डॉ. गंगखेडकर म्हणाले. “जेव्हा कोणताही जीनोम सिक्वेन्सिंग डेटा जाहीर केला जातो तेव्हा काही लोक त्यातून एक टर्म घेतात आणि सोशल मीडियावर बनावट बातम्यांद्वारे अनावश्यक भीती निर्माण करतात,” त्यांनी पुढे टिप्पणी केली. शिवाय, W.H.O वरील नव्या तपशिलाचा अभ्यास करता , त्यांचे संकेतस्थळ महामारी सुरू झाल्यापासून चिंतेचे प्रकार सक्रियपणे ट्रॅक करत आहे, आम्हाला आढळले की Omicron हा सध्याचा चिंतेचा विषय आहे, विशेषत: त्याचा B.1.1.529 हा व्हेरियंट काळजी करण्याचा विषय आहे. XBB नाही. Conclusion न्यूजचेकरला कोविड-19 च्या नवीन XBB प्रकाराबद्दल सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला व्हायरल मेसेज खोटा असल्याचे आढळले. Result: False Our Sources Tweet by Ministry of Health and Family Welfare, on December 22, 2022 Tweet by Information & PR, Kathua, on December 22, 2022 Press note by WHO on October 22, 2022 Conversation with Dr R Gangakhedkar, former head of epidemiology and communicable diseases at the Indian Council of Medical Research
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 11 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software