About: http://data.cimple.eu/claim-review/1941666fc77bc0d86c27ec9bb8fec025ac60a575cb08ae2615671bbd     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात असा दावा केलाय की, पंजाबमध्ये ‘आप’च्या विजयानंतर पंजाब पोलिसातील एक अधिकारी दारूच्या नशेत आढळून आला आहे. नुकत्याच पंजाब विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यात आम आदमी पार्टीने मोठा विजय मिळवला. सूबेमध्ये विधानसभेच्या ११७ जागा होत्या. ज्यात आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी ९२ जागा जिंकल्या. आम आदमी पार्टीने पंजाब विधानसभेसाठी भगवंत मान हा नवीन चेहरा मुख्यमंत्री पदासाठी घोषित केला. काल त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आधी भगवंत मान यांच्यावर दारूच्या नशेत असल्याचे आरोप लागले होते. २०१९ मध्ये पंजाबमधील बरनालातील एका रॅलीत भगवंत मान यांनी दारू सोडण्याची घोषणा केली होती. त्यातच दुसरीकडे सोशल मीडियावर विरोधी पक्षाचे नेते कायमच भगवंत मान यांची दारू पिण्याबाबत मस्करी करत असतात. भगवंत मान मुख्यमंत्री झाल्यावर सोशल मीडियावर अनेक दावे व्हायरल होत आहे. न्यूजचेकरद्वारे भगवंत मान यांच्याशी निगडित भ्रामक दावे तुम्ही इथे (१, २) वाचू शकता. यातच आता सोशल मीडियावर युजरने हा व्हिडिओ शेअर केला. त्यात पंजाबमध्ये ‘आप’च्या विजयानंतर पंजाब पोलिसातील एक अधिकारी दारूच्या नशेत आढळून आला. Fact Check / Verification या सदर व्हिडिओचा तपास घेण्यासाठी आम्ही यु ट्यूबवर ‘drunk punjab cop’ हा कीवर्ड टाकला. इथे आम्हांला माहिती मिळाली की, तोच व्हिडिओ २०१७ पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. दैनिक सवेरा नावाच्या यु ट्यूब वाहिनीने २ एप्रिल २०१७ रोजी ही व्हायरल क्लिप अपलोड केली होती. त्यांनी हा व्हिडिओ ‘Watch Viral video : Punjab Police in drunken look’ या शीर्षकासोबत शेअर केला आहे. पण त्या वाहिनीने व्हिडिओत दिसणारा तो पोलीस अधिकारी कोण आहे, याबाबत कुठलीच माहिती नाही. याच बरोबर आम्हांला माहिती मिळाली की, Daily Post India नावाच्या यु ट्यूब वाहिनीने १ ऑगस्ट २०१७ रोजी एक व्हिडिओ प्रकाशित केला होता. या व्यतिरिक्त Pratik Chib, Virul Videos आणि Gopal Chouhan नावाच्या यु ट्यूब वाहिनीवरती हा व्हायरल व्हिडिओ आढळून आला. Conclusion या पद्धतीने आमच्या तपासात ही गोष्ट स्पष्ट झाली की, हा व्हायरल व्हिडिओ पंजाबमधील ‘आप’च्या विजयानंतरचा नाही. हा व्हायरल व्हिडिओ २०१७ पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे. पण नेमका हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, ते आम्हांला समजू शकले नाही. आम्हांला जर व्हिडिओशी संबंधित काही माहिती मिळाली तर आम्ही लेख अपडेट करू. Result : False Context / False कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 2 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software