schema:text
| - Authors
Claim
महाकुंभासाठी प्रयागराज मार्गावर जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी बेदम मारहाण केली.
Fact
पश्चिम बंगालमधील व्हिडिओ चुकीच्या संदर्भात शेअर केला आहे.
पोलिस एका माणसाचा पाठलाग करत त्याला लाठीने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांचा दावा आहे की, प्रयागराजमध्ये महाकुंभासाठी जाणाऱ्या ट्रेनवर हल्ला करणाऱ्याला पोलीस “सेवा” देत असल्याचे दिसते आहे. अनेक युजर्सनी म्हटले आहे की, व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेश पोलिस दगडफेकीविरुद्ध ‘कारवाई’ करताना दिसत आहेत.
एक मिनिटापेक्षा जास्त लांबीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे ज्यामध्ये “महाकुंभाला जाणाऱ्या ट्रेनवर दगडफेक करणाऱ्याना पोलीस सेवा देत आहेत…” असे म्हटले आहे.
अशा पोस्ट येथे, येथे आणि येथे पाहता येतील.
Fact Check/ Verification
व्हायरल व्हिडिओच्या कीफ्रेम्सवर गुगल लेन्स सर्च केल्यावर आम्हाला २८ जानेवारी २०२५ रोजी @PI-YU-SH-100021680601018 द्वारे लिहिलेली फेसबुक पोस्ट मिळाली. तीच क्लिप घेऊन त्यात पश्चिम बंगालच्या बीरभूममधील सुरी येथील एका स्थानिक तरुणाने एका पोलिस कर्मचाऱ्याचा कॉलर ओढल्याचे म्हटले आहे.
याचा अंदाज घेत, आम्ही YouTube वर बंगाली भाषेत “सुरी पोलिस” आणि “कॉलर” हे कीवर्ड शोधले ज्यावरून TV9 बांगला द्वारे प्रकाशित केलेला २८ जानेवारी २०२५ रोजीचा एक व्हिडिओ रिपोर्ट मिळाला. व्हायरल व्हिडिओच्या काही तुकड्यांसह, त्यात असे म्हटले होते की “तृणमूल कार्यकर्त्याने पोलिसांची कॉलर पकडली! पोलिसांनी लाठ्याकाठ्यांनी त्याचा पाठलाग केला. (गुगलद्वारे बंगालीमधून भाषांतरित)”.
Republic Bangla च्या दुसऱ्या एका बातमीतही सुरी येथील घटना दर्शविण्यासाठी त्याच व्हिडिओमधील काही भाग दाखवण्यात आले आहेत.
या घटनेची सविस्तर माहिती देताना, द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, जिल्हा मुख्यालयाजवळ सरकारी जमिनीवरून सत्ताधारी पक्षाच्या दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षादरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या युवा नेते बाबू अन्सारी यांना अटक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याची कॉलर एका कार्यकर्त्याने ओढली होती.
अधिकाऱ्याची कॉलर हिसकावणाऱ्या व्यक्तीची ओळख अमीर अन्सारी अशी आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २० जणांना अटक केली आहे, ज्यात बाबू अन्सारी आणि अमीर अन्सारी यांचा समावेश आहे.
या घटनेवरील इतर बातम्या येथे आणि येथे पाहता येतील.
उल्लेखनीय म्हणजे, जानेवारीच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील जळगाव रेल्वे स्थानकाजवळ तापी गंगा एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली होती. यातून प्रयागराजमधील महाकुंभासाठी अनेक प्रवासी प्रवास करत असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसऱ्या एका घटनेत, हरपालपूर रेल्वे स्थानकावर महाकुंभ विशेष ट्रेनची वाट पाहणाऱ्या प्रवाशांनी डब्यांचे दरवाजे बंद असल्याचे पाहून गाडीवर दगडफेक केली. रेल्वेचे प्रवक्ते मनोज सिंह यांनी सांगितले की, प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांचा जमाव प्लॅटफॉर्मवर वाट पाहत होता. ट्रेन येताच त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाजे बंद असल्याचे त्यांना आढळले. प्रवाशांनी संताप व्यक्त केला आणि गोंधळ घातला, परंतु रेल्वे पोलिसांनी लवकरच घटनास्थळी पोहोचून प्रवाशांना शांत केले आणि त्यांना प्रवासासाठी पाठवले.
Conclusion
म्हणूनच, पश्चिम बंगालमधील एक असंबंधित व्हिडिओ महाकुंभासाठी प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिस मारहाण करताना असा खोटा दावा करून शेअर करण्यात आला आहे. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले.
Result: False
Sources
YouTube Video By TV9 Bangla, Dated January 28, 2025
YouTube Video By Republic Bangla, Dated January 28, 2025
Report By The Telegraph, Dated January 29, 2025
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी वसुधा बेरी यांनी केले असून येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
|