Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
टिकटाॅक स्टार समीर गायकवाड याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या प्रेयसीने देखील आत्महत्या केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.समीर गायकवाड पाठोपाठ त्याच्या प्रेयसीने आत्महत्या केली, त्यांच्या खऱ्या प्रेमाला सलाम अशा आशयाचा मेसेज सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
समीर गायकवाड नामक टिकटाॅक स्टार ने 21 फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर त्याला श्रद्धांजली वाहणा-या अनेक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या. मात्र त्यानंतर लगेचच त्याच्या प्रेयसीने देखील आत्महत्या केल्याची पोस्ट व्हायरल झाली. आमच्या एका वाचकाने ही पोस्ट आमच्या व्हाट्सअॅप नंबरवर तपासणी पाठविली आहे.
टिकटाॅक स्टार समीर गायकवाड (sameer Gaikwad)याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या प्रेयसीने देखील आत्महत्या केली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला समीर गायकवाडच्या बातमी माध्यमांत आढळून आली.
महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीत म्हटले आहे की, टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने रविवारी पुण्यातील आपल्या घरात आत्महत्या केली. संध्याकाळी समीरचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेला आढळून आला. प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
टिव्ही 9 मराठीेने देखील टिकटाॅक स्टार समीर गायकवाडच्या आत्महत्येची बातमी दिली आहे.पुणे शहरातील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत टिकटॉक स्टार समीर मनीष गायकवाड (वय 22) रहात होता. तिथे त्याने रविवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला साडीच्या मदतीने गळफास लावला, अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.असे बातमीत म्हटले आहे.
या दोन्ही बातम्यांत आणि इतर कुठेही आम्हाला समीर गायकवाडच्या प्रेयसीने आत्महत्या केल्याची बातमी आढळून आली नाही. मात्र व्हायरल फोटोत समीरसोबत दिसणारी तरुणी त्याची प्रेयसी आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र सदर तरुणी ही त्याची प्रेयसी नसून ती देखील फेमस टिकटाॅक स्टार असल्याची माहिती मिळाली, ती अनेक टिकटाॅक व्हिडिओमध्ये समीर सोबत आहे. सदर तरुणीने तिचा आणि समीरचा फोटो चुकीच्या दाव्याने शेअर करुन नये असे आवाहन करणारी पोस्ट देखील केली आहे. आम्हाला समीर गायकवाडच्या प्रेयसीने आत्महत्या केल्याची अधिकृत माहिती मिळाली नाही. त्यामुळे व्हायरल होत असलेली पोस्ट चुकीची असल्याचे आढळून आले.
यावरुन हे स्पष्ट होते की, टिकटाॅक स्टार समीर गायकवाड याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या प्रेयसीने आत्महत्या केल्याचा दावा चुकीचा आहे. व्हायरल पोस्टमधील फोटोत समीर सोबत दिसणारी तरुणी त्याची प्रेयसी नाही.
Maharashtra Times- https://maharashtratimes.com/crime-news/tiktok-star-sameer-gaikwad-committed-suicide-in-pune-wagholi/articleshow/81146289.cms
TV9 Marathi- https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/tiktok-star-sameer-gaikwad-died-by-suicide-in-pune-404768.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.