About: http://data.cimple.eu/claim-review/1ea79c818564f01c296f6c2070ff067bb6922d50c0bfb47cdb66e07a     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim मोदींच्या नेतृत्वात अबकी बार ४०० पार हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मान्य केले आहे. Fact मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील भाषणाचा अर्धा व्हिडीओ व्हायरल करून संदर्भ बदलून खोटा दावा केला जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही मोदींची जादू मान्य केली. मोदींच्या नेतृत्वात अबकी बार ४०० पार हे खर्गेंनी मान्य केले आहे. असा दावा केला जात आहे. महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत X खात्यावरून हा दावा करण्यात आला आहे. या पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल. “मोदीजींची जादू… इंडि अलायन्स म्हणजे खायला कहार भूईला भार काँग्रेस अध्यक्ष खर्गेंनीही केलं मान्य मोदीजींच्या नेतृत्त्वात अब कि बार ४०० पार” असे हा दावा सांगतो. Fact Check/ Verification व्हायरल दाव्यासोबत एक मिनिटांचा व्हिडीओ जोडण्यात आलेला आहे. यामध्ये स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बोलताना दिसत आहेत. “आपल्याकडे इतके बहुमत आहे. पहिला ३३०, ३३४ होते, आता ४०० पार होत आहे….” यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर हसू फुटते आणि सत्ताधारी बाकावरील माणसे बाक वाजवू लागतात. यावेळी पुन्हा खर्गे बोलतात, ” अरे चारसो, अरे तुम्ही निवडून या, माझा दावा आहे हे लोक उभे राहून निवडून तर येउदेत, मग समजेल, हे लोक मोदींच्या कृपेने आले आहेत आणि टाळ्या वाजवत आहेत. हे लोक मोदींच्या कृपेने आले आहेत. आम्ही आमदारकी असो खासदारकी असो स्वतःच्या जीवावर आहोत हे सर्वजण मोदींच्या आशीर्वादाने आले आहेत.” असे ऐकायला मिळते आणि व्हिडीओ थांबतो. आम्ही संबंधित व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण केले. त्यावर आम्हाला ‘संसद टीव्ही LIVE’ असा उल्लेख आढळला. उपलब्ध कॅप्शन वरून सदर भाषण राज्यसभेत केले जात असल्याचे, त्यावेळी पीठासीन सभापती जगदीप धनकर असल्याचे आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडला जात असल्याचे निदर्शनास आले. यावरून काही कीवर्डसच्या माध्यमातून शोधले असता, आम्हाला संसद TV ने २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसारित केलेला हा युट्युब चॅनेलवरील व्हिडीओ सापडला. सदर व्हिडीओ अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाचा आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीपासूनच मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणाची सुरुवात आहे. ४५ मिनिटानंतर ते आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करतात. त्यानंतर महिला आरक्षणाबद्दल बोलताना “आपल्याकडे इतके बहुमत आहे. पहिला ३३०, ३३४ होते, आता ४०० पार होत आहे….” हा मुद्दा येतो. सत्ताधाऱ्यांनी याबद्दल कौतुक केल्यानंतर व ढोल वाजविल्यानंतर राज्यसभेचे सभापती जगदीप जगदीप धनकर सत्ताधरी पक्षाची प्रशंसा केल्याबद्दल आपले अभिनंदन होत असल्याचे “आपल्या वक्तव्याची प्रशंसा केली जात आहे.” असे सांगतात. ४७ मिनिटानंतर पुन्हा खर्गे म्हणतात की, ” हे कौतुक करणारे आपला आपण ढोल वाजवीत असून एवढे यायचे असतील तर ही कामे का होत नाहीत? यावेळी त्यांचे १०० सुद्धा पार होणार नाहीत. इंडिया आघाडी सशक्त आहे.” हा व्हिडीओ खर्गे यांनी केलेल्या तब्बल १ तास ३३ मिनिटे आणि १७ सेकंदाचे संपूर्ण भाषण दाखवितो. आणखी शोध घेताना खर्गे यांच्या वक्तव्याबद्दल The Economic Times ने २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केला व्हिडीओ रिपोर्ट सापडला. यामध्ये २ मिनिटे ४० सेकंदानंतर खर्गे यांनी केलेले ” हे कौतुक करणारे आपला आपण ढोल वाजवीत असून एवढे यायचे असतील तर ही कामे का होत नाहीत? यावेळी त्यांचे १०० सुद्धा पार होणार नाहीत. इंडिया आघाडी सशक्त आहे.” हे मूळ विधान पाहता येईल. यावरून व्हायरल व्हिडीओ अर्धवट असल्याचे आणि खर्गे यांनी मोदींच्या नेतृत्वाला मान्य केल्याचे चुकीच्या संदर्भाने सांगत पसरविला जात असल्याचे दिसून येते. Conclusion अशाप्रकारे आमच्या तपासात, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील भाषणाचा अर्धा व्हिडीओ व्हायरल करून संदर्भ बदलून खोटा दावा केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. Result: Missing Context Our Sources Video published by Sansad TV on February 2, 2024 Video published by The Economic Times on February 2, 2024 Google Search कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 11 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software