schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
बेंजामिन नेतान्याहू आपल्या मुलाला हमासविरुद्ध युद्ध लढण्यासाठी सैन्यात पाठवतानाचे छायाचित्र. पोस्टची संग्रहण लिंक येथे पाहता येईल.
असाच दावा आम्हाला मराठीतही आढळला.
न्यूजचेकरने व्हायरल इमेजवर रिव्हर्स इमेज शोध घेतला ज्यामुळे आम्हाला 2014 पासून समान व्हायरल इमेज असलेले अनेक रिपोर्ट सापडले.
30 डिसेंबर 2014 रोजी प्रकाशित जेरुसलेम पोस्टमधील एक रिपोर्ट, तीच प्रतिमा दर्शवितो, आणि स्पष्ट करतो की नेतन्याहू यांचा मुलगा अवनर डिसेंबर 2014 मध्ये IDF मध्ये भरती झाला होता. कॅप्शनमध्ये दावा केला आहे की “पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आपल्या मुलाला सैन्यात पाठवताना.”
1 डिसेंबर 2014 रोजी प्रकाशित झालेल्या टाइम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टमध्ये हीच प्रतिमा होती. त्याच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की “पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांची पत्नी सारा, 01 डिसेंबर 2014 रोजी जेरुसलेमच्या अम्युनिशन हिलवर त्यांचा मुलगा अवनरसोबत दिसले. (फोटो क्रेडिट: कोबी गिडॉन/जीपीओ)”.
याविषयी रिपोर्टमध्ये अधिक तपशीलवार माहिती देण्यात आली आहे, नेतान्याहूचा मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत सैन्यात भरती होण्यासाठी आला होता.
अशा प्रकारे, आम्हाला आढळले आहे की नेतान्याहू आपल्या मुलाला सैन्यात पाठवताना दाखवणारी प्रतिमा अलीकडील नाही आणि 2014 ची आहे.
Our Sources
Report published by The Jerusalem Post, dated December 31, 2014
Report published by Times of Israel, dated December 1, 2014
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम पंकज मेनन यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Runjay Kumar
November 15, 2023
Pankaj Menon
November 10, 2023
Prasad Prabhu
October 21, 2023
|