schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
‘दी काश्मीर फाईल्स’ चित्रपट रिलीज होऊन एक वर्ष उलटत आले तरीही या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर चर्चा होणे अध्याप थांबलेले नाही. सध्या पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेच्या झोतात आला आहे. यापूर्वी आपला चित्रपट ऑस्कर साठी शॉर्टलिस्ट झाल्याचा दिशाभूल करणारा दावा केलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीच आता घोषणा केली आहे की हा चित्रपट #दादासाहेबफाळकेपुरस्कार२०२३ मध्ये “उत्कृष्ट चित्रपट” ठरला आहे.
लगेचच, अभिनंदन करणाऱ्या पोस्टनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महापूर आला, युजर्सनी १९९० च्या काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरणावर आधारित या चित्रपटाचे कौतुक केले. तथापि, न्यूजचेकरला हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले.
२१ फेब्रुवारी २०२३ रोजी केलेल्या ट्विटमध्ये अग्निहोत्री म्हणतात की, “ANNOUNCEMENT: #TheKashmirFiles wins the ‘Best Film’ award at #DadaSahebPhalkeAwards2023. This award is dedicated to all the victims of terrorism and to all the people of India for your blessings.”
या ट्विट ची संग्रहित आवृत्ती आपण येथे पाहू शकता.
अग्निहोत्रींच्या दाव्यानंतर लगेचच, अनेक ट्विटर युजर्सनी त्यांनी शेयर केलेली पोस्ट रिट्विट करीत त्यांच्या दाव्याचे समर्थन केले. अनेकांनी चित्रपटाच्या इमेजीस वापरून अभिनंदन करण्यास सुरुवात केली. “काश्मीर फाईल्स ने दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३” अंतर्गत ‘उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जिंकला असून ‘अभिनंदन’ असे सांगणाऱ्या पोस्टचा पाऊस पडू लागला.
विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनीही ट्विट करीत या पुरस्काराबद्दल विशेष कौतुक केले.
Jagran, Mid-Day, Wion यासह काही मेनस्ट्रीम मीडियांनीही आपल्या बातम्यांमध्ये असे लिहिले की, अग्निहोत्रचा चित्रपट दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ मध्ये जिंकला.
“दादासाहेब फाळके पुरस्कार” या कि वॉर्ड सर्च वर गुगल ने आम्हाला आय अँड बी मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचानालयाच्या अधिकृत वेबसाईट कडे नेले. या पुरस्काराची माहिती देताना ही वेबसाईट सांगते की, “भारतीय सिनेमा क्षेत्रात १९१३ मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला पूर्ण लांबीचा सिनेमा तयार करून मोठे योगदान दिलेल्या दादासाहेब फाळके यांच्या नावे पुरस्कार देण्यास भारत सरकारने १९६९ साली सुरुवात केली. हा पुरस्कार सर्वप्रथम देविका राणी यांना देण्यात आला.”
“सिनेमाक्षेत्रातील या सर्वोच्च पुरस्कारासाठी व्यक्तीची निवड करताना भारतीय सिनेमाचा विकास आणि वृद्धीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेतली जाते.” असेही आम्हाला वाचायला मिळाले. यावरून हा पुरस्कार व्यक्तीला दिला जातो एकदा चित्रपट किंवा मालिकेला दिला जात नाही. हे आमच्या निदर्शनास आले.
त्यात म्हटले आहे की, “या पुरस्कारात स्वर्ण कमळ (गोल्डन लोटस) पदक (अग्निहोत्रांनी शेयर केलेल्या चित्रांमध्ये असल्याप्रमाणे), शाल आणि १० लाख रोख रक्कम यांचा समावेश असतो.”
नाही. आम्ही फिल्म फेस्टिव्हल्सच्या संचालनालयाच्या वेबसाइटवर स्कॅन केले, परंतु दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकणार्या यादीत किंवा कुठेही काश्मीर फाइल्सबद्दल कोणतीही घोषणा/सूचना/रिलीज सापडली नाहीत. वेबसाइटच्या गॅलरी विभागात माजी भारतीय राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व्यक्तींना तो वितरित करतानाची छायाचित्रे आम्हाला पाहायला मिळाली.
उल्लेखनीय म्हणजे, नॅशनल फिल्म अवॉर्ड्स आणि दादा साहेब फाळके पुरस्कार २०२० अर्थात ६८ वि मालिका ३० सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती. तेथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एक स्क्रोल, शाल आणि पदक विजेत्याकडे सोपविताना दिसतात. कार्यक्रमादरम्यान, दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना देण्यात आला. हेच खाली पाहिले जाऊ शकते.
आम्हाला ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांच्या यादीमध्ये ‘काश्मीर फाइल्स’ चा उल्लेख सापडला नाही.
अग्निहोत्री यांनी पुरस्काराची माहिती देताना शेयर केलेल्या व्हायरल चित्रांचे बारकाईने निरीक्षण केल्यावर आम्हाला ट्रॉफीवर “International Film Festival Award 2023” असा मजकूर मिळाला. तसेच कार्यक्रमात पाठीमागे लावण्यात आलेल्या बॅनर मध्येही आम्हाला “Dadasaheb Phalke International Film Festival Award 2023.” असे वाचायला मिळाले.
तसेच आम्हाला व्यासपीठाच्या मागील भागावर जेथे अग्निहोत्री पुरस्कार स्वीकारत आहेत तेथेही “Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2023” असा उल्लेख आढळला. याबद्दलचा व्हिडीओ स्वतः अग्निहोत्री यांनीच शेयर केला आहे.
यामधून क्ल्यु घेऊन आम्ही गुगलवर “Dadasaheb Phalke IFF” बद्दल शोधले. ज्यामुळे आम्हाला फिल्म फेस्टिव्हलची अधिकृत वेबसाइट पाहायला मिळाली. वेबसाइटमध्ये अग्निहोत्रीने पोस्ट केलेल्या प्रतिमांमध्ये पाहिल्याप्रमाणे त्याच ट्रॉफीसह फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांच्या छायाचित्रांची मालिका घालण्यात आली आहे.
आम्ही डीपीआयएफएफच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सबद्दल पुढे स्कॅन केले आणि २१ फेब्रुवारी २०२३ रोजी केलेले एक ट्विट आम्हाला सापडले, “दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जिंकल्याबद्दल काश्मीर फाइल्सचे अभिनंदन.” असा मजकूर तेथे वाचायला मिळाला.
वेबसाइटमध्ये म्हटले आहे की, “दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (डीपीआयएफएफ) ची स्थापना २०१२ मध्ये झाली आणि २०१६ पासून सुरुवात झाली. भारतीय सिनेक्षेत्राचे जनक दादासाहेब फाळके म्हणून ओळखल्या जाणार्या श्री. धुन्डिराज गोविंद फाळके यांचा वारसा पुढे नेण्यासाठी या संस्थेची स्थापना केली गेली. महत्वाकांक्षी, तरुण, स्वतंत्र आणि व्यावसायिक चित्रपट निर्मात्यांचे कार्य अभ्यासून दखल घेण्याच्या उद्देशाने हा भारताचा एकमेव स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव काम करीत आहे.”
“दादासाहेब फाळके यांच्या आजीवन प्रयत्नांचा सन्मान करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणूनच या महोत्सवाने नव्या चित्रपट प्रकल्पांना मान्यता देणे आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम या क्षेत्रातील सर्जनशीलतेचा सन्मान करतो.” असेही आम्हाला वाचायला मिळाले.
२२ फेब्रुवारी २०२३ रोजी अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळवला आहे हे जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी, प्रिंट आणि रिपब्लिक वर्ल्डमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या शेयर केल्या आहेत. या दोन्ही बातम्यात अग्निहोत्री याच्या त्याच दिशाभूल करणाऱ्या ट्विट चा हवाला देऊन असे म्हटले आहे की, काश्मीर फाईल्स चित्रपटाने दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवला आहे.
ट्वीटच्या संग्रहित आवृत्त्या येथे आणि येथे पाहिल्या जाऊ शकतात.
दादासाहेब फाळके यांचे नाव एकाद्या पुरस्काराला देणे ही बाब सामान्य आहे. मात्र अग्निहोत्री यांच्यासारख्या प्रकरणात चित्रपट व्यवसायाशी संबंधित चुकीची माहिती देण्याचे ते एक कारण बनू शकते. २०१८ मध्ये केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे सदस्य वाणी त्रिपाठी टिकू यांनी यासंदर्भात भाष्य करून स्पष्टीकरण दिले होते. @MIB_India मार्फत फक्त एकमेव दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. दुसऱ्या कुणीही या नावाचा उपयोग करणे हा या प्रतिष्ठित पुरस्काराचा अपमान आणि नियमभंग आहे. असे त्यांनी म्हटले होते.
आम्ही असा निष्कर्ष काढू शकतो की विवेक अग्निहोत्रींच्या काश्मीर फाईल्स ला दादासाहेब फाळके २०२३ पुरस्कार नव्हे तर दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या दिशाभूल करणाऱ्या ट्विट मुळे माध्यमांची दिशाभूल केली आणि एकंदर गोंधळ झाला आहे.
Sources
Official Website Of Directorate of Film Festivals
Official Website Of Dadasaheb Phalke International Film Festival
Self Analysis
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad Prabhu
January 12, 2023
Sandesh Thorve
March 26, 2022
Sandesh Thorve
April 1, 2022
|