Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
रहदारीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास फक्त १०० रुपये दंड असून पोलिसांना यापेक्षा जास्त दंड घेण्याचा अधिकार नाही.
Fact
हा दावा खोटा आहे. मोटार वाहन अधिनियम कायदा १९८८ मध्ये २०१९ साली केलेल्या सुधारणानुसार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास भराव्या लागणाऱ्या दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड फक्त १०० रुपयेच आहे. पोलिसांना यापेक्षा जास्त दंड घेण्याचा अधिकार नाही. असा दावा सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात केला जात आहे.
न्यूजचेकरला तथ्य तपासण्यासाठी आमच्या WhatsApp टिपलाइनवर (+91-9999499044) समान दावा प्राप्त झाला.
व्हायरल मेसेज मधील मजकुराची सत्यता तपासण्यासाठी न्यूजचेकरने सर्वप्रथम किवर्ड सर्च च्या माध्यमातून रहदारीच्या नियमात काही बदल झाला आहे का? याचा शोध घेतला मात्र रहदारीच्या पोलिसांना फक्त १०० रुपयेच दंड घेण्याचा अधिकार आहे किंवा त्यापेक्षा जास्त दंड घेण्याचा अधिकार नाही. अशी कोणतीच माहिती आम्हाला मिळाली नाही.
आम्हाला “रहदारी नियमांविषयी पोलिसांना दंड भरण्यापेक्षा खटले भरण्याची सूचना करा. आम्ही खटले लढवून कोर्टात आपली बाजू सांगू शकतो. दरम्यान वाढीव दंड भरू नका.” असे आवाहन करणारा एक व्हिडीओ सापडला. माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केलेल्या या आवाहनाचा व्हिडीओ आपल्याला येथे पाहता येईल.
mymarathi.net फेसबुक पेजवर १६ जानेवारी २०१९ रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. पोलिसांना कायद्या प्रमाणे कुठला ही दंड घेण्याचा अधिकार नाही, असा कोणता कायदा आहे का? याची माहिती यात नसून रस्त्यावर दंड भरण्यापेक्षा कोर्टात जाऊन भरा असे आवाहन त्यात केलेले आम्हाला दिसून आले.
व्हायरल दाव्यामध्ये म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी फक्त १०० रुपये दंड आहे असा दावा खरा आहे का? याचा आम्ही शोध घेतला. आम्हाला इंडियन एक्सप्रेसने १३ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेला एक रिपोर्ट सापडला.
या रिपोर्टमध्ये वाहतूक अधिनियम कायद्यातील २०१९ मध्ये झालेल्या सुधारणेनुसार रहदारी नियम उल्लंघनाच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळा दंड असल्याची माहिती मिळाली. रस्ते वाहतूक नियम मोडल्यास ५०० रुपये, विनापरवाना वाहन चालविल्यास ५००० रुपये आणि एकदा परवाना रद्द झालेला असताना पुन्हा विनापरवाना वाहन चालविताना आढळल्यास १० हजार रुपयांपर्यंत दंड बजावला जाऊ शकतो. अशी माहिती आम्हाला मिळाली.
vikaspedia.in ने प्रसिद्ध केलेल्या विस्तृत लेखात वाहतुकीच्या नियमांच्या सर्वप्रकारच्या उल्लंघनाबद्दल असलेल्या कारवाईचे स्वरूप स्पष्टपणे लिहिण्यात आलेले आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०१९ मध्ये क्र ३११०(ई) अन्वये मोटार वाहन दुरुस्ती कायदा २०१९ लागू केल्या असून तरतुदी १ सप्टेंबर २०१९ पासून लागू करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आम्हाला मिळाली.
अशाप्रकारे आमच्या तपासात सर्व रहदारी उल्लंघन करण्याच्या गुन्ह्यांसाठी फक्त १०० रुपये दंड आहे, तसेच पोलिसांना यापेक्षा अधिक दंड स्वीकारण्याचा अधिकार नाही. असे सांगणारा व्हायरल दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Article published by The Indian Express on September 13, 2019
Article published by Vikaspedia
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in