schema:text
| - Fact Check: मुंबईत 21 मजली इमारत कोसळल्याचा दावा खोटा, व्हिडिओ डिजिटल पद्धतीने निर्मित
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात एक मोठी इमारत खाली कोसळताना दिसत आहे.
By: Jyoti Kumari
-
Published: Feb 13, 2025 at 04:56 PM
-
नई दिल्ली (विश्वास न्यूज)। सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात एक मोठी इमारत खाली कोसळताना दिसत आहे. काही वापरकर्ते हा व्हिडिओ शेअर करत दावा करत आहेत की, हा व्हिडिओ मुंबईचा आहे, जिथे एक 21 मजली इमारत कोसळली आहे.
विश्वास न्यूजला आपल्या तपासात व्हायरल झालेला व्हिडिओ खरा नसल्याचे निष्पन्न झाले आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ डिजिटल पद्धतीने तयार करण्यात आला आहे आणि त्यास वापरकर्ते खरा मानून फसव्या दाव्यासह शेअर करत आहेत.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
फेसबुक वापरकर्ता Sanwrmal Godara याने हा व्हिडिओ (संग्रहित लिंक) शेअर करत लिहिले आहे की, “मुंबईत कोसळली 21 मजली इमारत.”
mahesh.shakya.9822924 नावाच्या एका इन्स्टाग्राम यूजरनेही याच दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला आहे.
तपास
व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी आम्ही गुगलवर संबंधित कीवर्डसह शोध घेतला. आम्हाला या दाव्याशी संबंधित कोणतीही विश्वसनीय बातमी सापडली नाही. मुंबईत अशी घटना घडली असती, तर त्यासंदर्भातील बातम्या चर्चेत आल्या असत्या.
तपास पुढे नेत आम्ही व्हायरल व्हिडिओ बारकाईने पाहिला. व्हिडिओमध्ये दिसणारी इमारत खरी दिसत नाही आणि जेव्हा इमारत कोसळते तेव्हा धूर दिसत नाही किंवा कोणताही स्फोट होत नाही, ज्यामुळे हा व्हिडिओ खरा असल्याचा संशय येत आहे. आम्ही व्हिडिओचे स्क्रीन ग्रॅब घेतले आणि गुगल लेन्सने त्यांचा शोध घेतला. BrickBreak नावाच्या पर्ल या युट्यूब चॅनलवर व्हायरल झालेल्या व्हिडिओसारखेच व्हिडिओ आम्हाला सापडले. येथे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या इमारतीसारखे अनेक व्हिडिओ सापडले. चॅनलवर उपलब्ध माहितीनुसार, हे सर्व व्हिडिओ बनवण्यात आले आहेत.
आम्हाला TDC च्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओसारखेच अनेक व्हिडिओ आढळले.
व्हिडिओ Funny Story नावाच्या फेसबुक पेज वर आम्हाला हा व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ 7 डिसेंबर 2024 रोजी अपलोड करण्यात आला आहे. फेसबुक पेजच्या बायोमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हे पेज गेमिंग व्हिडिओ बनवते.
व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी आम्ही व्हिडिओ तज्ञ अरुण कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ पाठवला. हा व्हिडिओ संगणकावर तयार केलेला असल्याचे त्यांनी सांगितले. हे घराचे मॉडेल आहेत, परंतु वास्तविक नाहीत. ही इमारत बनावट आहे.
शेवटी आम्ही व्हिडिओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे प्रोफाइल स्कॅन केले. फेसबुकवर या वापरकर्त्याला 8 हजार लोक फॉलो करत असल्याचे समोर आले आहे. वापरकर्त्याने स्वत:ला राजस्थानचा रहिवासी असल्याचे सांगितले आहे.
याआधीही अनेक डिजीटल पद्धतीने तयार केलेले व्हिडिओ खरे समजून शेअर करण्यात आले आहेत. विश्वास न्यूजच्या वेबसाईटवर त्यांचा फॅक्ट चेक रिपोर्ट वाचता येईल.
निष्कर्ष : मुंबईत 21 मजली इमारत कोसळल्याच्या दाव्यासह व्हायरल झालेला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ डिजीटल पद्धतीने तयार करण्यात आला असून, तो खरा मानून लोक खोट्या दाव्यासह त्याला शेअर करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
Claim Review : मुंबईत कोसळली 21 मजली इमारत.
-
Claimed By : फेसबुकवापरकर्ता -SanwrmalGodara
-
Fact Check : False
-
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.
|