schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
बागेश्वर धाम सरकार श्री धीरेंद्र शास्त्री यांना अबुधाबीचा शेख स्वतः घ्यायला आला.
Fact
हा दावा खोटा आहे. बागेश्वर धामच्या वीरेंद्र शास्त्रींचे स्वागत इव्हेन्ट आयोजक डॉ. बु. अब्दुल्लाह यांनी केले होते.
बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांना अबुधाबीचा शेख स्वतः घ्यायला आला. असा दावा सध्या एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
“बागेश्वर धाम सरकार श्री धीरेंद्र शास्त्री यांना अबुधाबी चा शेख स्वतः घ्यायला आला स्वतः कार चालवत घेऊन आला, एवढेच नाही तर अबुधाबी मध्ये 22ते 26 सगळयांनी राम कथे ला यावे म्हणून सुट्टी पण जाहिर केली आणि तिथल्या शेख ला सुद्धा कपाळी गंध लावायला सांगितले ही आहे सनातन हिंदू धर्माची ताकद” असे हा दावा सांगतो.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
व्हायरल दाव्याच्या तपासणीसाठी आम्ही दाव्यातील व्हिडिओच्या काही की- फ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला IANS News च्या इंस्टाग्राम खात्यावर पोस्ट केलेला एक व्हिडीओ सापडला. ज्याच्या कॅप्शनमध्ये “धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर धाम सरकार) यांचे दुबईत आगमन झाले, तेथे त्यांचे स्वागत डॉ. बु अब्दुल्ला यांनी केले.” असे आम्हाला वाचायला मिळाले.
स्वागत करणाऱ्याचे नाव डॉ. बु अब्दुल्ला असल्याचे समजताच आम्ही या व्यक्तीचे खाते X आणि इंस्टाग्रामवर शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला X वर 27 मे 2024 रोजी शेयर केलेली एक पोस्ट सापडली. त्यामध्ये “दुबई येथे प्रथमच भारतातील प्रमुख आध्यात्मिक गुरू, बागेश्वर धाम पीठाचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांना डॉ. बु अब्दुल्ला यांच्या निमंत्रणावरून आणि बु अब्दुल्ला ग्रुपने आयोजित केलेल्या ‘इन पीस वी बिलीव्ह’ सांस्कृतिक संमेलन आणि अभिवादन कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.” अशी माहिती वाचायला मिळाली. यावरून बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे स्वागत त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या बु. अब्दुल्ला यांनीच केले असल्याची माहिती आम्हाला मिळाली.
Dr Bu Abdullah (Yaqoub Mousa) यांच्या इंस्टाग्राम खाते yaqoub.buabdullah.uae वरही व्हायरल व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले. याठिकाणी कोठेही अबुधाबीचे शेख मोहम्मद यांनी बागेश्वर धाम सरकारचे अबुधाबी विमानतळावर स्वागत केले, असे लिहिलेले किंवा दाखविलेले आढळले नाही.
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी स्वतः आपल्या इंस्टाग्राम खात्यावर आपल्या दुबई भेटीची माहिती पोस्ट केली असून डॉ. बु अब्दुल्लाह यांचा उल्लेख केला आहे.
यावरून व्हायरल दाव्यात म्हटल्याप्रमाणे दुबईचे अध्यक्ष शेख मोहमद यांनी बागेश्वर धाम सरकारचे स्वतः अबूधाबी विमानतळावर स्वागत केले असा अर्थ होतो, मात्र ही माहिती खोटी असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. “अबुधाबी मध्ये 22 ते 26 सगळयांनी राम कथे ला यावे म्हणून सुट्टी पण जाहिर केली” या दाव्याला पुष्टी देणारी कोणतीही माहिती आम्हाला मिळू शकलेली नाही.
बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांना अबुधाबीचा शेख स्वतः घ्यायला आला, हा दावा खोटा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात बागेश्वर धामच्या वीरेंद्र शास्त्रींचे स्वागत इव्हेन्ट आयोजक डॉ. बु. अब्दुल्लाह यांनी केले होते.
Our Sources
Video posted by IANS News on May 24, 2024
X post of Dr. Bu Abdullah on May 27, 2024
Video posted by Dr. Bu Abdullah on May 24, 2024
Video posted by Dhirendra Shastri on May 28, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
|