About: http://data.cimple.eu/claim-review/362a3feeac2cbe261aaa41826e05d3111dfc3188d222a51acca4d1ac     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim बांगलादेशातील इस्कॉनच्या गोशाळेवरील हल्याचा व्हिडीओ. Fact व्हिडिओ पंजाबच्या जालंधरमधील जमशेर डेअरी कॉम्प्लेक्समधील आहे. बांगलादेशातील इस्कॉनच्या गोशाळेवरील हल्याचा व्हिडीओ असे सांगत सोशल मीडिया युजर्स एक पोस्ट शेयर करीत आहेत. मात्र आम्हाला आढळले की व्हायरल व्हिडीओ पंजाबचा आहे. फेसबुकवर होत असलेल्या दाव्यांचे स्क्रिनशॉट खाली पाहता येतील. “बांगलादेश इस्कॉन मंदिराच्या गोशाळेवर हल्ला. हे पहायचे धाडस होणार नाही तुमचे पण पाहून घ्या कारण कदाचित काही वर्षांनी आपल्या डोळ्यासमोर हे पहावे लागेल.” अशा कॅप्शनखाली हा दावा शेयर केला जात आहे. Fact Check/ Verification न्यूजचेकरने व्हायरल व्हिडिओच्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज शोध चालवला, ज्यामुळे आम्हाला ‘journalist Faisal’ यांनी 19 नोव्हेंबर 2024 रोजी केलेल्या या X पोस्टकडे नेले. ज्यामध्ये असे क्रूर कृत्य करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाईची विनंती केली आहे. पोस्टमध्ये मात्र ही घटना कुठे घडली हे नमूद केलेले नाही. PETA इंडियाने पोस्टला उत्तर दिले की बीएनएसच्या संबंधित कलमांतर्गत सदर पोलिस स्टेशनमध्ये या कृत्याबद्दल एफआयआर नोंदवला गेला आहे. यातून एक संकेत घेऊन, संबंधित कीवर्ड शोधामुळे आम्हाला द ट्रिब्यूनच्या 20 नोव्हेंबर 2024 च्या घटनेबद्दलच्या बातमीकडे नेले, ज्याचे शीर्षक होते, “Outrage in Jalandhar over whipping of cows, video goes viral”. अर्थात “गायींना मारल्याने जालंधरमध्ये आक्रोश, व्हिडिओ व्हायरल”. “पशू क्रूरतेची एक त्रासदायक घटना एका गायीला क्रूर मारहाण दर्शविणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरात संताप पसरला आहे, ज्यामुळे शेवटी तिचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने ॲनिमल प्रोटेक्शन फाउंडेशनच्या सृष्ट बक्षी यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांच्या एका गटाने अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी करण्यास प्रवृत्त केले… जालंधरच्या पोलिस आयुक्तांना संबोधित केलेल्या तक्रारीत या घटनेवर जोर देण्यात आला आहे. हा प्रकार बेकायदेशीर गोहत्या आणि गोमांस व्यापारात गुंतलेल्या मोठ्या नेटवर्कचा भाग आहे, जो पंजाब गोहत्या प्रतिबंध कायदा, 1955 अंतर्गत दंडनीय आहे.” असे या बातमीत वाचायला मिळाले. त्यानंतर आम्ही जालंधरमधील ॲनिमल प्रोटेक्शन फाउंडेशनच्या युवी सिंग यांच्याशी बोललो, त्यांनी तक्रार दाखल केली होती. पंजाबमधील जालंधर येथील जमशेर डेअरी कॉम्प्लेक्स नावाच्या फार्म मध्ये एका बैलाला चार जणांनी मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, संघटनेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेत सहभागी असलेले सर्व हिंदू आहेत. त्यात कोणताही जातीय अँगल नाही. आम्ही पोलिस डीएसपींकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील एफआयआर आमच्या फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले. आम्हाला संस्थेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची प्रत 18 नोव्हेंबर 2024 रोजीच्या त्यांच्या फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये सापडली. Conclusion अशाप्रकारे आमच्या तपासात स्पष्ट झाले की, बांगलादेशातील इस्कॉनच्या गोशाळेवरील हल्ला असे सांगत व्हायरल व्हिडीओ पंजाबच्या जालंधरमधील जमशेर डेअरी कॉम्प्लेक्समधील आहे. Result: False Sources X Post by @faisalbaig3102 on November 20, 2024 X Post by @PetaIndia on November 20, 2024 News report by The Tribune on November 20, 2024 Facebook post by Animal Protection Foundation on November 18, 2024 Telephonic conversation with Yuvi Singh, Animal Protection Foundation (हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी सबलू थॉमस यांनी केले असून ते इथे वाचता येईल.) कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 2 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software