schema:text
| - Copyright © 2022 NC Media Pvt. Ltd. All Rights Reserved.
Coronavirus
भारताच्या नावाने व्हायरल झाला पाकिस्तानातील मुलाच्या हत्येचा फोटो, वाचा काय आहे सत्य ?
Written By Yash Kshirsagar
Apr 24, 2020
Claim–
लाॅकडाऊनमध्ये उपासमारीने एका पित्याने आपल्या मुलाचा गळफास देऊन खून केला. भुक कोरोना पेक्षा जास्त घातक आहे.
सोशल मीडियामध्ये एक फोटो व्हायरल होत आहे. यात एक छोटा मुलगा घरात फासावर लटकलेला दिसत आहे.व त्याच्या शेजारी एक व्यक्ती उभा आहे. या फोटो विषयी दावा करण्यात येत आहे की लाॅकडाउन मध्ये या एका पित्याने अन्न नसल्याने आपल्याला मुलाची फास देऊन हत्या केली. ट्विटरवर एक यूजरने हा फोटो शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कांग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना टॅग करुन म्हटले आहे की, भुक ही कोरोना व्हायरसपेक्षा जास्त घातक असते.
Verification–
आम्ही या संदर्भात पडताळणी केली. गूगलमध्ये काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला पण ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना टॅग केले असल्याने भारतातील कोणत्या राज्यातील हे प्रकरण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण या फोटो संदर्भातील बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने या फोटोचा शोध घेतला असता याबाबत
आम्हाला याबाबत एक ट्विट आढळून आले यात हा फोटो भारतातीलच असल्याचा दावा करण्यात आला आहे शिवाय यात ही पीएम मोदी आणि राहुल गांधी यांना टॅग करण्यात आले आहे.
#भूख, कोरोना से ज़्यादा खतरनाक है साहब @PMOIndia @RahulGandhi @007AliSohrab pic.twitter.com/Pu8sfvGsT8
— AbuZar KhAn (@AbuZar_KhAn02) April 21, 2020
यासंदर्भात शोध पुढे चालू ठेवला असता आम्हाला फेसबुक वर हा फोटो अनेक पोस्टमध्ये आढळून आला. फेसबुकवर ब-याच पोस्ट या पश्चो आणि उर्दूमध्ये आढळून आल्या. साजिया हया नावाच्या फेसबुक पेज वर ही पोस्ट पश्तो भाषेत लिहिल्याचे आढळून आले. मात्र हा फोटो नेमका कुठला आहे आम्हाला समजले नाही.
याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी शोध सुरुच ठेवला आणखी एक उर्दू पोस्ट मिळाली यात म्हटले आहे की रफिकबाद येथे एका व्यक्तीने पत्नी आणि नातेवाईंकाच्या भांडणात आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा बळी घेतला.
हाच दावा करणारी आढळून आली या फोटोत आरोपी पिता देखील दिसत आहे.
याशिवाय या पित्याला अटक केल्याची बातमी देखील blog.siasat.pk या वेबसाईटवर मिळाली यात म्हटले आहे की पाकिस्तामधील रफिकबाद येथील लियाकत हुसेन या इसमाने पत्नीशी झालेल्या भांडणातून आपल्या दोन वर्षीय मुलाची गळफास देऊन हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की हा फोटो भारतातील नाही तर पाकिस्तानमधील आहे, पित्याने लाॅकडाऊनमध्ये उपासमारीमुळे नाही तर पत्नीशी झालेल्या भांडणातून आपल्या मुलाचा गळफास देऊन खून केला आहे. सोशल मीडियात हा फोटो भारतातील असल्याचा भ्रामक दावा करण्यात येत आहे.
Source
Twitter Advanced Search
Facebook Search
Google Reverse Image
Result- False connection/Incorrect Tiitle
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा 9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Related articles
Coronavirus
या शवपेट्या इटलीमध्ये कोरोना विषाणुच्या संक्रमणाने मृत्यू झालेल्या लोकांच्या नाहीत, वाचा सत्य
Newschecker Team
March 25, 2020
Coronavirus
जास्त प्रमाणात क्षारयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने कोरोनाचे रुग्ण बरे होतात? जाणून घ्या सत्य
Newschecker Team
May 2, 2020
Marathi
हा फोटो इंडोनेशिया किंवा रवांडामधील लाॅकडाऊन दरम्यानचा नाही, जाणून घ्या सत्य
Newschecker Team
April 23, 2020
|