About: http://data.cimple.eu/claim-review/366e55462538a543be98b821aa330a09a678e941ee5897a58ab2147f     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check Contact Us: checkthis@newschecker.in Fact checks doneFOLLOW US Fact Check याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर इंग्रजीने केले असून हा लेख वैभव भुजंग याने लिहिला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, ‘ॲफेलियन फेनोमेनन’मुळे ऑगस्टपर्यंत हवामान गतवर्षीच्या तुलनेत अधिक थंड राहिल. व्हायरल पोस्टमध्ये लिहिलंय,“उद्यापासून 22 ऑगस्टपर्यंत हवामान गतवर्षीच्या तुलनेत अधिक थंड राहील. याला अल्बेलियन घटना म्हणतात. ही उद्या सकाळी 5-27 वाजता सुरू होईल. Alphelion Phenomenon चे परिणाम आपण फक्त पाहणारच नाही तर अनुभवू देखील शकतो. ते ऑगस्ट २०२२ मध्ये संपेल. या काळात आपण पूर्वी कधीच नसलेल्या थंडीचा अनुभव घेऊ शकतो.. त्यामुळे आपले शरीर दुखते आणि घसा भरतो, ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होतो. म्हणून, जीवनसत्त्वे आणि इतर निरोगी अन्न उत्पादनांसह आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे चांगले आहे. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर 90,000,000 किमी आहे. पण या Alphelion Phenomenon दरम्यान, दोघांमधील अंतर वाढून 152,000,000 किमी होईल. म्हणजेच 66% वाढ. कृपया हे कुटुंब, मित्र आणि प्रियजनांमध्ये शेअर करा.” फेसबुकवर ही पोस्ट अनेक युजरने शेअर केली आहे. आम्हांला न्यूजचेकरच्या (+९१-९९९९४९९०४४) या व्हाट्स ॲप नंबरवर हा दावा तथ्य पडताळणी करण्यासाठी दोन युजरने पाठवला होता. Fact Check / Verification ‘ॲफेलियन फेनोमेनन’मुळे ऑगस्टपर्यंत हवामान गतवर्षीच्या तुलनेत अधिक थंड राहिल, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही ‘ॲफेलियन फेनोमेनन’ असं टाकून गुगलवर शोधले. तेव्हा आम्हांला आफ्रिका चेकचा २६ एप्रिल २०२२ रोजी प्रकाशित झालेला ‘Are you affected by ‘aphelion phenomenon’? Almost certainly not’ हा लेख मिळाला. त्या लेखानुसार, Britannica यांनी स्पष्ट करत सांगितले की एखाद्या वस्तूचा ॲफेलियन हा सूर्याभोवतीच्या त्याच्या कक्षेतील बिंदू असतो, जेव्हा तो सूर्यापासून सर्वात दूर असतो. याचे कारण म्हणजे त्यांची कक्षा पूर्णपणे वर्तुळाकार नसते. परिणामी, पृथ्वी कधी सूर्यापासून जवळ असते तर कधी दूर असते. सर्वात जवळचा बिंदू पृथ्वीचा परिधीय (Earth’s Perihelion) म्हणून ओळखला जातो. पेरिहेलियन आणि ॲफेलियन हे दोन्ही वर्षातून एकदा घडतात. २०२२ मध्ये पृथ्वीच्या ॲफेलियनमध्ये काही असामान्य नव्हते. त्यामुळे हिवाळ्यात प्रवेश करतांना ‘मागील थंड हवामानापेक्षा अधिक जास्त थंड हवामान’ अनुभवायला मिळणार नाही. यूएस नेव्हीने सांगितलंय की, २०२२ मध्ये पेरिहेलियन ४ जानेवारीला आणि ॲफेलियन ४ जुलैला होईल. त्या अहवालात पुढे म्हटले आहे की, सोशल मीडियावर ॲफेलियनसंबंधित केलेले दावे चुकीचे आहेत. त्यांनी दावा केलाय की,”पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचे अंतर ५ लाईट मिनिटे किंवा ९०,०००,००० किमी आहे.” पण नासाच्या (नॅशनल अॅरोनॉटिक्स अॅन्ड स्पेस अॅडमिनीस्ट्रेशन) म्हणण्यानुसार, पृथ्वी सूर्यापासून सुमारे १५० दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर अंदाजे प्रकाश व्हॅक्यूममधून आठ मिनिटांत किंवा आठ ‘लाईट मिनिटांत’ जाऊ शकतो. पण व्हायरल मेसेजमध्ये यापेक्षाही अधिक जास्तचा दावा केला आहे. त्यात असाही दावा केलाय की, ॲफेलियन होत असताना पृथ्वी सूर्यापासून १५२ दशलक्ष किलोमीटर दूर किंवा ‘६६%’ पुढे जाते. हा देखील दावा त्या बाबतीत चुकीचा आहे. ९० दशलक्षावरून १५२ दशलक्ष किलोमीटरपर्यंतची वाढ सुमारे ६९% होईल. परंतु पृथ्वीच्या पेरिहेलियन आणि ॲफेलियन आणि सूर्याच्या अंतरातील वास्तविक फरक १५२.१ दशलक्ष आणि १४७.३ दशलक्ष किलोमीटरचा फरक आहे. म्हणजे फक्त ३.३% ची वाढ आहे. अजून शोधल्यावर न्यूजचेकरला University of Southern Maine चा ‘How much does aphelion affect our weather? We’re at aphelion in the summer. Would Our summers be warmer if we were at perihelion, instead?’ या शीर्षकाचा एक अहवाल सापडला. Steven C. Rockport यांच्या अहवालानुसार, ॲफेलियनचा आपल्या हवामानावर परिणाम होतो, पण एखाद्याला वाटेल त्या पद्धतीने नाही. सुरवातीला ही गोष्ट स्पष्ट करायला हवी की, पृथ्वीची कक्षा पूर्णपणे गोलाकार नाही. जर तसे असते तर पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर कधीही बदलले नसते. हे थोडेसे लांबलचक वर्तुळ आहे, त्यामुळे त्याचे अंतर वर्षभर सतत बदलत राहते. त्याचे किमान अंतर (पेरिहेलियन) पासून ते जानेवारीच्या सुरवातीला ॲफेलियनपर्यंत पोहोचते. हे जुलैच्या सुरवातीला पोहोचते. पृथ्वी अपरिहार्यपणे ॲफेलियनपेक्षा पेरिहेलियनमध्ये जास्त गरम असते, असं आपण गृहीत धरू शकतो. आपल्याला मिळणाऱ्या सूर्याच्या ऊर्जेतील फरक पेरिहेलियन आणि ॲफेलियनमध्ये फारसा फरक नसतो. पेरिहेलियन आणि ॲफेलियनमध्ये फक्त तीन दशलक्ष मैलांचे अंतर आहे. पृथ्वीच्या सरासरी ९३ दशलक्ष मैल हा सूर्यकेंद्री अंतराचा एक छोटाशा अंश आहे. त्या अहवालात पुढे असंही म्हटलंय की, दक्षिण गोलार्धात उन्हाळा थोडा जास्त उष्ण असेल, असे वाटू शकते. पण दक्षिण गोलार्धात प्रामुख्याने पाणी आहे (जमीन आणि पाण्याचे प्रमाण ४/११ आहे) पाण्याच्या उष्णतेची क्षमता जमिनीपेक्षा जास्त असते. याचा अर्थ त्याला जमिनीच्या गरजेपेक्षा उष्ण तापमान वाढवण्याची ऊर्जा जास्त लागते. ॲफेलियनचा आपल्या हवामानावर ज्या प्रकारे परिणाम होतो, तो हा कालावधी आहे. उन्हाळ्यात पृथ्वी सूर्यापासून दूर असते. म्हणून त्याचा परिभ्रमण वेग सर्वात कमी असतो. हिवाळा सुमारे ८९ दिवस तर उन्हाळा साधारण ९२ दिवसांचा असतो. जास्त भूभाग आणि कमी पाणी यामुळे उत्तम गोलार्धात उष्ण उन्हाळा आणि थंड उन्हाळा असे दोन्हीही अनुभवायला मिळतात. हे घटक हवामानाच्या नमुन्यावर परिणाम करतात. ते सूर्यापासून पृथ्वीचे अंतर नाही. Conclusion अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की ‘ॲफेलियन फेनोमेनन’मुळे ऑगस्टपर्यंत हवामान गतवर्षीच्या तुलनेत अधिक थंड राहिल, हा दावा चुकीचा आहे. Result : False Our Sources २६ एप्रिल २०२२ रोजी Are you affected by ‘aphelion phenomenon’? Almost certainly not’ हा प्रकाशित झालेला लेख University of Southern Maine यांचा How much does aphelion affect our weather? We’re at aphelion in the summer. Would Our summers be warmer if we were at perihelion, instead हा प्रकाशित झालेला लेख कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 3 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software