About: http://data.cimple.eu/claim-review/3e4d3ee76d0b270b9d68019a204ee4079c58883f3e5c9e70c6fc016a     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim काँग्रेसने आपल्या वर्गणी जमा करण्याच्या योजनेसाठी सोनिया गांधी यांच्या फोटोचा वापर क्यू-आर कोडसाठी केला आहे. Fact व्हायरल इमेज एडिटेड आहे. काँग्रेसने असा सोनिया गांधी यांचा फोटो असलेला क्यू-आर कोड जारी केलेला नाही. “काँग्रेसने जारी केला सोनिया गांधींच्या फोटोचा क्यू-आर कोड” असा दावा करणारा एक मेसेज सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेस पक्षाने 18 डिसेंबरपासून पक्षासाठी निधी गोळा करण्यासाठी “डोनेट फॉर देश” नावाची मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांचा चेहरा असलेला क्यू-आर कोडचा फोटो व्हायरल झाला आहे. हा क्यूआर कोड काँग्रेसने याच मोहिमेसाठी जारी केला आहे. असा दावा सोशल मीडिया युजर्स करीत आहेत. आम्हाला मूळ दावा फेसबुकवर पहायला मिळाला. “हे काय सोनिया गांधी QR कोडवर? कालपर्यंत जे डिजिटल इंडियाची चेष्टा करत होते आज तेच गाबडे डिजिटली भीक मागत आहेत. एक गंमत तुमच्या लक्षात आलीय का? नोटबंदी केल्यानंतर पाकिस्तान भिकेला लागलं आणि आमदाराकडे ३५० कोटी सापडल्यावर काँग्रेस!” असे या दाव्यात वाचायला मिळते. Fact Check/Verification व्हायरल पोस्ट मधील सोनिया गांधी यांचे चित्र असलेला भाग आणि इतर ठिकाणी काळजी पूर्वक पाहिले असता आम्हाला त्यामध्ये @memebhaimbbs असे लिहिलेले आढळले. यावरून सुगावा घेऊन आम्ही संबंधित खाते शोधले असता आम्हाला संबंधित X खाते सापडले. संबंधित खाते राजकीय विषयावरील मिम्स तयार करून पोस्ट करण्यासाठी प्रसिद्ध असल्याची माहिती मिळण्याबरोबरच आम्हाला व्हायरल पोस्टही याच खात्याने 18 डिसेंबर रोजी पोस्ट केलेली असल्याचे पाहायला मिळाले. आम्ही व्हायरल छायाचित्रावर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला मात्र चित्राचा मूळ स्रोत सापडला नाही. दरम्यान आम्ही किवर्ड वापरून सर्च केला असता, आम्हाला काँग्रेस पक्षाच्या अधिकृत X खात्यावरील QR कोडची मूळ प्रतिमा सापडली. 28 डिसेंबर 2023 रोजी इमेज शेअर करण्यात आली होती आणि त्याची कॅप्शन पुढीलप्रमाणे आहे, “महत्त्वपूर्ण सूचना 👇आज भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के स्थापना दिवस पर नागपुर की महारैली में कुर्सियों के पीछे एक बारकोड लगा है। उस बारकोड को स्कैन कर आप 138 रुपए, 1380 रुपए, 13800 रुपए, 138000 रुपए या उससे अधिक भारतीय राष्ट्रीय कांग्रेस को दान स्वरूप दे सकते हैं। इस रैली में आए सभी दानकर्ताओं में से चुने हुए पांच लोगों को श्री @RahulGandhi जी सर्टिफिकेट एवं रसीद प्रदान करेंगे। आइए, साथ मिलकर बदलाव का हिस्सा बनें। कांग्रेस को मजबूत करें, देश को मजबूत करें।” आम्हाला Economic Times चा एक YouTube व्हिडिओ देखील सापडला, ज्यामध्ये QR कोड प्रतिमा आहे, परंतु सोनिया गांधींचा चेहरा नाही. मूळ छायाचित्र आणि व्हायरल छायाचित्र यांची तुलना करता मूळ छायाचित्रात हाताचे चिन्ह असून व्हायरल छायाचित्रात एडिट करून सोनिया गांधी यांच्या चेहऱ्याचे चित्र घालण्यात आले असल्याचे आमच्या निदर्शनास आले. काँग्रेस पक्षाने आपल्या या मोहिमेसाठी donateinc.net या वेबसाईटची निर्मितीही केली असून त्यावरही सोनिया गांधी यांचा चेहरा असलेला क्यू-आर कोड पाहायला मिलला नाही. आम्ही यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयातही संपर्क साधला असता, तेथील संपर्क प्रमुखांनी व्हायरल छायाचित्र खोटे असल्याची माहिती आम्हाला दिली आहे. Conclusion अशाप्रकारे आमच्या तपासात, काँग्रेसने आपल्या वर्गणी जमा करण्याच्या योजनेसाठी सोनिया गांधी यांच्या फोटोचा वापर क्यू-आर कोडसाठी केला आहे. हा दावा एडिटेड फोटोचा वापर करून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षानेही याचा इन्कार केला आहे. Result: Altered Photo Our Sources Tweet made by @memebhaimbbs on December 18, 2023 Tweet made by Congress on December 28, 2023 Video published by The Economic Times on December 29, 2023 Conversation with PRO of Maharashtra Pradesh Congress Commitee Self Analysis कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 11 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software