schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
सोशल मीडियात एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात बुरख्यातील काही महिलांना साखळीने बांधले असून त्यांची बंदुकधारी लोकांकडून बोली लावली जात आहे. दावा केला जात आहे की, तालिबानींनी अफगाणिस्तानमधील महिलांचा लिलाव सुरु केला आहे.
अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परतल्यानंतर काही महिन्यांतच तालिबानने देश ताब्यात घेतला आहे. हे सर्व इतक्या लवकर घडले की संपूर्ण जग पाहत राहिले. तालिबान ही एक अशी संघटना आहे ज्याने पूर्वी 1996 ते 2001 दरम्यान अफगाणिस्तानवर राज्य केले होते. त्या काळात तालिबानच्या क्रूरतेचे साक्षीदार असलेल्या अफगाणिस्तानच्या लोकांना असुरक्षित वाटत आहे. ज्यांना तालिबान्यांनी त्यांच्या राजवटीत कैद केले होते महिलांना सर्वात जास्त काळजी वाटते. आता जेव्हा तालिबान्यांनी देश पुन्हा ताब्यात घेतला आहे, देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग पळून जाऊ इच्छित आहे. पळून गेल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले गेले आहेत. अशातच हा महिलांचा लिलाव केला जात असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ज्या लोकांनी 2 दिनार हिंद च्या मुली विकल्या होत्या आज त्यांच्याच मुली ते 100 रुपया ला विकत आहेत हे लोक किती नीच मानसिकता आहे या लोकांची आणि भारतातील हिंदु विरोधी लोक सनातन हिंदु संस्कृती मानणाऱ्याना हिंदु आतंकवादी म्हणता एकमेव हिंदु संस्कृती आहे की शत्रूच्या स्त्री ला पण आई व बहिणीच्या रुपात बघतात.”
हा व्हिडिओ अफगाणिस्तानचा आहे का जिथे महिलांना अशा प्रकारे विकले जात आहे याचा शोध घेण्यासाठी आम्ही तपास सुरू केला. प्रथम आम्ही InVid टूलच्या मदतीने व्हिडिओला काही कीफ्रेममध्ये विभाजित केलेआणि नंतर रिव्हर्स इमेज सर्च टूलच्या मदतीने गुगलवर शोध घेतला. या दरम्यान आम्हाला vk.com नावाच्या वेबसाइटवर व्हायरल व्हिडिओ सापडला, जिथे हा व्हिडिओ 2020 मध्ये अपलोड करण्यात आला आहे.
वरिल रिपोर्टवरुन स्पष्ट झाले की, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ आताचा नाही तर जुना आहे. त्यामुळे व्हिडिओचा अचूक तपशील मिळवण्यासाठी, आम्ही Google वर इतर कीफ्रेम्ससह काही कीवर्ड वापरले. तसेच मदतीने शोध सुरू केला. या प्रक्रियेत, आम्हाला 20 ऑक्टोबर 2014 रोजी बीबीसी न्यूज वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये व्हायरल व्हिडिओशी जुळणारा आणखी एक व्हिडिओ सापडला.
रिपोर्टनुसार, व्हायरल व्हिडिओ 14 ऑक्टोबर 2014 रोजी लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. कुर्दीश कार्यकर्त्यांनी लंडनच्या रस्त्यावर पथनाट्याद्वारे आयसिस करीत असलेल्या महिलांच्या लिलावाकडे लक्ष वेधण्यासाठी हे पथनाट्य आयोजित करण्यात आले होते.
BBC च्या वेबसाइटवर आढळून आलेल्या माहितीची माहितीची पुष्टी करण्यासाठी आम्ही Google वर अधिक बारकाईने शोध सुरू केला. या दरम्यान, आम्हाला ऑक्टोबर 2014 मध्ये news week.com नावाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला एक लेख आढळून आला. ज्यात व्हायरल व्हिडिओमधून काढलेले फोटो शेअर करण्यात आला आहे.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडिओ सध्याच्या अफगाणिस्तानातील परिस्थितीदरम्यानचा नाही तर कुर्दीश आंदोलनकर्त्या द्वारे लंडनध्ये 2014 साली केलेल्या पथनाट्याचा आहे. इस्लामिक स्टेटच्या महिलासोबतच्या हे पथनाट्य करण्यात आले होते.
BBC- https://www.bbc.com/news/blogs-trending-29691764
Newsweek- https://www.newsweek.com/kurdish-activists-stage-isis-slave-market-central-london-277696
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा
Vasudha Beri
November 21, 2024
Prasad Prabhu
August 24, 2024
Komal Singh
August 21, 2024
|