About: http://data.cimple.eu/claim-review/48fc1a0ccaf27ac7743c267669c8049f3b25083f475b4a40b84b86b8     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check Contact Us: checkthis@newschecker.in Fact checks doneFOLLOW US Fact Check Claim छायाचित्रात केरळमध्ये ISIS चे एकसारखे टी-शर्ट घातलेल्या स्थानिक मुस्लिम पुरुषांचा समूह दिसत आहे. Fact व्हायरल झालेले छायाचित्र तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील असल्याची पुष्टी बातम्यांनी दिली आहे आणि ही घटना २०१४ मध्ये घडली होती. टी-शर्टचे वाटप करणाऱ्या मौलवीला नंतर अटक करण्यात आली. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाभोवती सोशल मीडियाच्या वाढत्या गदारोळात, एकसारखे काळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेल्या तरुणांचा एक गट दर्शविणारा फोटो, ज्यामध्ये “ISIS” असे शब्द आणि दहशतवादी संघटनेचा लोगो आहे, हे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. फोटो शेअर करणार्या युजर्सनी आरोप केला आहे की तो केरळचा आहे आणि या राज्यात व्यापक कट्टरतावाद आणि आयएसआयएसला पाठिंबा मिळत असल्याच्या दाव्याला हा फोटो पुरावा आहे. हे छायाचित्र ट्विटरवर फिरत आहे, युजर्सनी असा दावा केला आहे की, “This is a picture from Kerala, local Muzlim youth wearing ISIS t-shirt and posing with the ISIS hand signal that there is only ONE God, THEIR God! And yet, people have the nerve to say that #LoveJihad is myth. #TheKeralaStory is REAL!” अशा पोस्ट इथे, इथे, इथे आणि इथे पाहता येतील. सुदीप्तो सेन दिग्दर्शित, ‘द केरळ स्टोरी’ लव्ह जिहादच्या कथित प्रथेवर प्रकाश टाकते, जिथे तरुण स्त्रियांना कथितपणे धर्म बदलून विवाह करवून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जाते आणि नंतर त्यांना आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत सामील केले जाते. वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळण्यात आल्या आणि केरळमध्ये प्रचंड विरोध होऊनही हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर वैचारिक प्रतिवाद निर्माण करण्याव्यतिरिक्त, चित्रपटाने बरेच राजकीय लक्षही वेधले आहे. पंतप्रधान मोदींनी “दहशतवादाचे कुरूप सत्य दाखविल्याबद्दल” चित्रपटाचे कौतुक केले, तर केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारले आणि हा “संघ परिवाराचा प्रचार” असल्याचे म्हटले. तिरुअनंतपुरममधील काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर राज्याच्या वास्तवाची “तीव्र अतिशयोक्ती” आणि “विकृती” केल्याचा आरोप केला आहे. “ISIS” या कीवर्डसह व्हायरल छायाचित्रावरील Google रिव्हर्स इमेज सर्चमुळे आम्हाला 4 ऑगस्ट 2014 रोजी द हिंदूच्या रिपोर्टकडे नेले, ज्याचे शीर्षक होते, ‘Muslim youths sporting ISIS T-shirts cause a flutter.’ व्हायरल छायाचित्र प्रदर्शित करताना, रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे की, “26 मुस्लिम तरुणांच्या गटाने ISIS (इस्लामिक स्टेट इन इराक आणि अल-शम्स) चे चिन्ह असलेले काळे टी-शर्ट घालून छायाचित्रासाठी पोझ दिल्याने गोंधळ उडाला. ईदच्या दिवशी रामनाथपुरम जिल्ह्यातील थोंडी या किनारपट्टीवरील मशीद जवळ हा प्रकार घडला. रामनाथपुरम हा तामिळनाडूमधील जिल्हा आहे. डेक्कन हेराल्डने या घटनेबाबत दिलेल्या वृत्तात पुढे म्हटले आहे की, ISIS चे चिन्ह असलेले टी-शर्ट वाटल्याच्या आरोपावरून दोन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. पुढे, “पोलिसांनी असेही सांगितले की 24 तरुणांना सोडून देण्यात आले कारण त्यांचा कोणत्याही संघटनेशी संबंध नाही. त्यांना “टी-शर्ट मिळाले”. त्यापैकी काहींनी टी-शर्टसाठी 200 रुपये दिले होते, असे पोलिसांनी सांगितले. वृत्तानुसार, रामनाथपुरम पोलिसांनी तिरुपूरस्थित इमामलाही अटक केली होती, ज्याने कथितपणे टी-शर्ट खरेदी केले होते आणि इस्लामिक स्टेट इन इराक आणि अल शम्स (आयएसआयएस) च्या समर्थनार्थ नारे छापले होते आणि ते थोंडी येथील मुस्लिम तरुणांना पाठवले होते. 2014 मध्ये, तमिळनाडूच्या रामनाथपुरममध्ये ISIS टी-शर्टमध्ये पुरुषांचा एक गट दर्शविलेल्या छायाचित्रावर इतर अनेक वृत्त आउटलेटने देखील रिपोर्ट दिला होता. असे रिपोर्ट येथे, येथे आणि येथे पाहिले जाऊ शकतात. केरळच्या वायनाडमधील मतदान केंद्राबाहेर ISIS चे टी-शर्ट घातलेले पुरुष दाखवल्याचा दावा करणारा हाच फोटो 2019 मध्ये व्हायरल झाला होता. अनेक सोशल मीडिया युजर्सनी फोटो शेअर करत आरोप केला होता की, “केरळमधील वायनाडमध्ये 23 एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतरचा हा फोटो आहे. ISIS चे टी-शर्ट घातलेले लोक स्पष्ट दिसत आहेत. काँग्रेसला मतदान करणे म्हणजे भारताला इस्लामिक राज्य बनवणे.” याप्रकारच्या पोस्ट तुम्हाला इथे, इथे आणि इथे पाहता येतील. केरळमध्ये ISIS टी-शर्ट घातलेल्या स्थानिक मुस्लिम पुरुषांचा समूह असे सांगत तामिळनाडूमधील 2014 चे छायाचित्र खोटेपणाने शेअर केले गेले. Sources Report By The Hindu, Dated August 4, 2014 Official Website Of Ramanathapuram District Report by Deccan Herald, Dated August 5, 2014 कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in Runjay Kumar December 14, 2024 Runjay Kumar September 23, 2024 Prasad Prabhu September 18, 2024
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 3 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software