schema:text
| - Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact checks doneFOLLOW US
Fact Check
Claim
कोलाजमध्ये असलेली दोन्ही छायाचित्रे ममता बॅनर्जी यांच्या नुकत्याच झालेल्या अपघातातील आहेत.
Fact
नाही, दोन्ही चित्रे एकमेकांशी संबंधित नाहीत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दोन छायाचित्रांचा कोलाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा कोलाज त्यांच्या नुकत्याच झालेल्या अपघाताशी जोडून शेअर केला जात आहे आणि असा दावा केला जात आहे की ती दुखापत खोटी आहे.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की दोन चित्रे एकमेकांशी संबंधित नाहीत. पहिले चित्र नुकत्याच झालेल्या अपघाताचे आहे, तर दुसरे चित्र जानेवारी 2024 मध्ये झालेल्या रस्ते अपघातानंतरचे आहे.
व्हायरल कोलाजमधील पहिला फोटो हा न्यूज एजन्सी एएनआयने केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट आहे, ज्यामध्ये ममता बॅनर्जी यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होताना दिसत आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात ममता बॅनर्जी यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला पट्टी केलेली आहे. दुसऱ्या चित्रात ABP Live चा लोगो देखील उजवीकडे वरच्या बाजूला आहे.
हा व्हायरल कोलाज सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये “चोट तो माथे के बीचों बीच लगी थी ये बैंडेज तो किनारे चिपका हुआ है, ये कौन सा जादू है?” असे म्हटलेले आहे.
व्हायरल दाव्यासह इतर पोस्ट येथे, येथे आणि येथे पाहता येतील.
व्हायरल कोलाजची तपासणी करण्यासाठी Newschecker ने पहिले चित्र तपासले. यावेळी, आम्हाला ANI च्या अधिकृत X खात्यावरून 14 मार्च रोजी केलेले ट्विट आढळले, ज्यामध्ये हे चित्र आहे.
यानंतर आम्ही ट्विटमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे कीवर्ड शोधले. आम्हाला दैनिक भास्करच्या वेबसाईटवर 15 मार्च रोजी प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. एएनआयच्या ट्विटमध्ये असलेले छायाचित्रही या रिपोर्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकातामधील कालीघाट येथील त्यांच्या घरात पडल्या होत्या. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर त्यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांच्या कपाळावर आणि नाकाला एकूण 4 टाके घालण्यात आले. या अपघातानंतर काही वेळातच तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांची जखमी छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. यामध्ये व्हायरल कोलाजमध्ये असलेल्या डाव्या बाजूच्या चित्राचा समावेश आहे.
त्याच रिपोर्टमध्ये, आम्हाला आणखी एक छायाचित्र देखील सापडले, जे व्हायरल कोलाजमध्ये समाविष्ट असलेल्या दुसऱ्या छायाचित्रासारखेच होते. या छायाचित्राबाबत दैनिक भास्करच्या वृत्तात असे लिहिले आहे की, 24 जानेवारी 2024 रोजी ममता बॅनर्जी रस्त्याने वर्धमान ते कोलकाता येथून प्रवास करीत होत्या. धुक्यामुळे अचानक ब्रेक लागल्याने ममता बॅनर्जी यांचे डोके कारला धडकले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.
तपासादरम्यान, आम्हाला 24 जानेवारी 2024 रोजी TV9 वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट देखील सापडला. रिपोर्टनुसार, वर्धमानहून कोलकाता येथे परतत असताना ममता बॅनर्जी यांचा अपघात झाला. यावेळी त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली. दुखापतीनंतर त्यांनी कोलकाता येथील राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, “अचानक एक कार सुमारे ताशी 200 किमी वेगाने आमच्या ताफ्यात घुसली. त्यानंतर माझ्या कारच्या ड्रायव्हरने ब्रेक दाबला आणि माझे डोके कारच्या डॅशबोर्डवर आदळले.” या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी यांच्या डोक्यावर पट्टी बांधलेली दिसत आहे जी व्हायरल झालेल्या छायाचित्रात आहे.
शोधल्यावर, आम्हाला ABP आनंदाच्या YouTube खात्यावर या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ देखील सापडला, जो 24 जानेवारी 2024 रोजी अपलोड करण्यात आला होता.
तपासादरम्यान, आम्हाला नुकत्याच झालेल्या अपघातानंतर ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ देखील सापडला, जो 18 मार्च 2024 रोजी त्यांच्या Facebook खात्यावर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये उपस्थित असलेल्या दृश्यांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या डोक्यावर वेगळ्या प्रकारची पट्टी पाहायला मिळते.
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल कोलाजमध्ये समाविष्ट केलेले दुसरे चित्र अलीकडील अपघाताचे नाही.
Our Sources
Tweet by ANI on 14th March 2024
Article Published by Dainik Bhaskar on 24th Jan 2024
Article Published by TV9 on 24th Jan 2024
Video Published by ABP Ananda on 24th Jan 2024
live by Mamta Banerjee’s Facebook page on 24th Jan 2024
live by Mamta Banerjee’s Facebook page on 18th March 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
|