About: http://data.cimple.eu/claim-review/4cd6381229b59fa170b09f201970fd9c9e6a57cb6b80896ca3398c62     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून असा दावा करण्यात आला आहे की 2022 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने कॉर्पोरेट टॅक्स 18% वरून 15% पर्यंत कमी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाविषयी ट्विट करुन म्हटले आहे की,”महागाईवाढ कमी करण्यासाठी आणि रोजगार वाढीसाठी या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा नाही. कॉर्पोरेट टॅक्स 18% वरून 15% पर्यंत कमी केला मात्र, प्राप्तिकराची मर्यादा वाढवणं आणि कराचा दर कमी करण्याबाबत कोणतीही घोषणा नसल्यानं मध्यमवर्गीय नोकरदारांची,सामान्य करदात्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे.” ट्विट येथे आणि संग्रहित ट्विट इथे पहा. Zee 24 तासने देखील याबबात वृत्त दिले आहे. यात म्हटले आहे की,अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्यांना सांगितले की, ITR मधील त्रुटी सुधारण्यासाठी दोन वर्षांपर्यंतचा कालावधी दिला जाईल. तसेच कॉर्पोरेट टॅक्स 18% वरून 15% पर्यंत कमी करण्यात आला आहे. महाराष्ट्र टाईम्सने देखील हेच वृत्त प्रकाशित केले असून यात म्हटले आहे की, नोकरदार वर्गाला निराश केले असले तरी अर्थमंत्र्यांनी कॉर्पोरेट विश्वाला खुश केले आहे. कॉर्पोरेट टॅक्स 18% वरून 15% पर्यंत कमी केला त्याच बरोबर कॉर्पोरेट टॅक्सवरील सरचार्ज १२ वरून ७ टक्क्यांवर आणला आहे. करा संदर्भातील अन्य एक घोषणा म्हणजे, क्रिप्टोच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार. क्रिप्टोमधील गुंतवणूक केल्या काही दिवसांमध्ये चर्चेत आली आहे. यामधील गुंतवणूक देखील वाढली आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलाय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी संसदेत 2022-23 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. देशातील सर्वसामान्य नागरिकांना अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र आयकर दरात कोणताही बदल न झाल्याने नोकरदारांची निराशा झाली. अर्थसंकल्पादरम्यान, अर्थमंत्र्यांनी पुढील 25 वर्षांसाठी पायाभरणी करण्याबद्दल बोलले. यासोबतच क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या कमाईवर 30 टक्के कर लावण्याची तरतूदही 2022-23 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पात देशाला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात स्वावलंबी बनविण्यावर भर देण्यासाठी मोबाईल फोन चार्जर, मोबाईल फोन कॅमेरा लेन्स, ट्रान्सफॉर्मरसह इलेक्ट्रॉनिक्स स्मार्ट मीटरवरील कस्टम ड्युटी दरात सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. . दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून असा दावा करण्यात आला आहे की, 2022 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने कॉर्पोरेट टॅक्स 18% वरून 15% पर्यंत कमी केला आहे. Fact Check/Verification केंद्र सरकारने अर्थसंकल्प 2022 मध्ये कॉर्पोरेट टॅक्स 18% वरून 15% पर्यंत कमी केल्याचा दावा करून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टची सत्यता तपासण्यासाठी आम्ही काही कीवर्डच्या मदतीने अर्थसंकल्प 2022-23 चे संपूर्ण भाषण शोधण्यास सुरुवात केली. या दरम्यान, आम्हाला 01 फेब्रुवारी 2022 रोजीच्या अर्थसंकल्पीय भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ दूरदर्शनच्या यूट्यूब चॅनेलवर आढळून आला. दूरदर्शन नॅशनलच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला अर्थसंकल्पीय भाषणाचा व्हिडिओ पाहिल्यास लक्षात येते ते 1:08 व्या मिनिटाला अर्थमंत्री सीतारामण म्हणतात-“Currently, cooperative societies are required to pay Alternative Minimum Tax at the rate of 18 and one half per cent. However, companies pay the same at the rate of fifteen per cent. To provide a level playing field between co-operative societies and companies, I, propose to reduce this rate for the cooperative societies also to 15% ज्याचा मराठी अनुवाद आहे- “सध्या सहकारी संस्थांना 18% दराने पर्यायी किमान कर भरणे बंधनकारक आहे. तथापि, कंपन्या 15% दराने पैसे देतात. सहकारी संस्था आणि कंपन्यांमध्ये समानता प्रदान करण्यासाठी, मी सहकारी संस्थांसाठी देखील हा दर 15% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव देत आहे.” या दरम्यान निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट टॅक्स 18% वरून 15% पर्यंत कमी केल्याचा उल्लेख कुठेही केलेला नाही. आमच्या तपासणीदरम्यान, आम्ही अर्थ मंत्रालयाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पाची प्रत देखील वाचण्यास सुरुवात केली. 2022-23 च्या अर्थसंकल्पाच्या प्रतीच्या पृष्ठ 26 वर, आम्हाला सहकारी संस्थांवरील कराचा उल्लेख आढळला. त्यानुसार, सहकारी संस्था आणि कंपन्यांमध्ये समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी, सहकारी संस्थांसाठी देखील पर्यायी किमान कराचा दर 15% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. 2022 च्या अर्थसंकल्पात, केंद्र सरकारने कॉर्पोरेट टॅक्स 18% वरून 15% पर्यंत कमी केला आहे, या दाव्याची PIB (प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) द्वारे देखील चौकशी केली गेली आहे. पीआयबीच्या तपासात हा व्हायरल दावा खोटा असल्याचे आढऑळून आले आहे. Conclusion अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, केंद्र सरकारने 2022 च्या अर्थसंकल्पात कॉर्पोरेट कर कॉर्पोरेट टॅक्स 18% वरून 15% पर्यंत कमी केल्याचा सोशल मीडियावर शेअर केलेला दावा दिशाभूल करणारा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 च्या अर्थसंकल्पात कॉर्पोरेट कर 18% वरून 15% पर्यंत कमी करण्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. Result: Misleading/Partly False Our Sources Doordarshan National Youtube Channel कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा Authors After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 5 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software