schema:text
| - Authors
Claim
प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेवर दगडफेक दाखविणारा व्हिडीओ.
Fact
हा व्हिडिओ जुलै २०२४ चा आहे आणि त्यात महाराष्ट्रातील जळगाव येथे भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनवर दगडफेकीची घटना दाखवण्यात आली आहे.
प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेवर दगडफेक असे सांगत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये चालत्या रेल्वेवर काही व्यक्ती दगडफेक करताना दिसून येत आहेत. महाकुंभ साठी जाणाऱ्या भाविकांवर हल्ला या आशयाने हा दावा केला जात आहे.
मूळ हिंदीमध्ये असलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले होते: “महाकुंभाला जाणाऱ्या तापी गंगा एक्सप्रेसमधील प्रवाशांवर हल्ला करण्यात आला. एसी डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या”
Fact Check/Verification
व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या मुख्य किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. दरम्यान व्हायरल व्हीडीओ प्रमाणेच समान दृश्ये असलेल्या सहा महिन्यापूर्वीचे मीडिया रिपोर्ट्स आम्हाला मिळाले.
यापैकी TV9 मराठीने १३ जुलै २०२४ रोजी केलेल्या व्हिडीओ न्यूजमध्ये व्हायरल व्हिडीओ दाखवीत “जळगावच्या अमळनेरमध्ये एक्स्प्रेसवर दगडफेकीची घटना” या हेडिंगखाली अज्ञातांनी भुसावळहुन नंदुरबारला जाणाऱ्या एक्सप्रेसवर ही दगडफेक केली असल्याची माहिती आम्हाला मिळाली.
Zee 24 तास ने १३ जुलै २०२४ रोजी केलेल्या व्हिडिओमध्येही ही घटना “जळगाव अमळनेरमध्ये चेन पुलिंग करून ट्रेनवर दगडफेक; व्हिडिओ व्हायरल” असेच स्पष्ट केले आहे. जळगाव जवळील अंमळनेर येथील धार टेकडीवर उरूस होता त्यातील प्रवासी जात असताना हा प्रकार घडला होता, अशी माहिती आम्हाला मिळाली.
अधिक तपास करताना आम्हाला १३ जुलै २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या फ्री प्रेस जर्नलच्या एका रिपोर्टमध्ये त्या घटनेची माहिती मिळावी. “महाराष्ट्र व्हायरल व्हिडिओ: जळगावमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक केली” अशा शीर्षकाखाली हा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओमधील स्क्रीनशॉट पाहता येईल.
“महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनवर अज्ञात हल्लेखोरांच्या गटाने दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला. रेल्वे रुळांवर जमाव जमला आणि त्यांनी ट्रेनवर दगडफेक करण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले.” असे तो रिपोर्ट सांगतो.
आम्हाला पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी १३ जुलै २०२४ रोजी शेअर केलेली एक X पोस्ट देखील सापडली, जी त्याच घटनेबाबत होती. Zee Business ने व्हायरल व्हिडीओसंदर्भात माहिती देणारे ट्विट केले असता याबद्दल रेल्वे प्रशासनाची भूमिका स्पष्ट करण्यात आली होती.
अधिक तपास करताना आम्हाला इंडियन एक्सप्रेसने १३ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध केलेला एक रिपोर्ट मिळाला. यामध्ये “रविवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील जळगाव स्थानकाजवळ उत्तर प्रदेशला जाणाऱ्या एका ट्रेनवर एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. सुरतमधील उधना रेल्वे स्थानकावरून तापी गंगा एक्सप्रेसने प्रवास करणारे प्रवासी महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला जात होते.” असा उल्लेख आढळला. दरम्यान व्हायरल व्हिडिओचा आणि या घटनेचा संबंध नसल्याचे दिसून आले. व्हायरल व्हिडीओ सहा महिने जुना आहे. संबंधित रिपोर्ट येथे वाचता येईल.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या रेल्वेवर दगडफेक दाखविणारा व्हिडीओ असे सांगत व्हायरल व्हिडिओ जुलै २०२४ चा आहे आणि त्यात महाराष्ट्रातील जळगाव येथे भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनवर दगडफेकीची घटना दाखवण्यात आली आहे, हे स्पष्ट झाले.
Result: False
Our Sources
News published by TV9 Marathi on July 13, 2024
News published by Zee 24 Taas on July 13, 2024
News published by Free Press Journal on July 13, 2024
Tweet published by DRM Mumbai Central on July 13, 2024
News published by Indian Express on January 13, 2025
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
|