About: http://data.cimple.eu/claim-review/4f38e8a7dabc6b51ab621097cb735c2892772d9d202121098b1d262a     Goto   Sponge   NotDistinct   Permalink

An Entity of Type : schema:ClaimReview, within Data Space : data.cimple.eu associated with source document(s)

AttributesValues
rdf:type
http://data.cimple...lizedReviewRating
schema:url
schema:text
  • Authors Claim व्हायरल फोटोमध्ये १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या दिवशी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कारसेवकाच्या भूमिकेत एकत्र दिसत आहेत. Fact फोटो २००२ चा आहे आणि त्यात नागपूरचे ज्येष्ठ भाजप नेते भोजराज डुंबे असून एकनाथ शिंदे नाहीत. लोडशेडिंगच्या विरोधात MSEB विरुद्धच्या आंदोलनादरम्यान फडणवीस यांच्यासोबत ते सहभागी झालेले दिसतात. महाराष्ट्र राज्यात महायुती (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) मुख्यमंत्रीपदावरून निर्माण झालेल्या गदारोळात, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा असे सांगत एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. १९९२ मध्ये बाबरी मशीद विध्वंसाच्या दिवशी कारसेवक म्हणून हे दोघे उपस्थित होते, असा दावा करीत युजर्स हा फोटो शेयर करीत आहेत. पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते, या पोस्टने आतापर्यंत ८३४.८ हजार व्ह्यूज मिळविले आहेत. Fact Check/Verification न्यूजचेकरने रिव्हर्स इमेज सर्च केला, ज्यामुळे आम्हाला तोच फोटो शेअर केलेल्या ३ मे २०२२ रोजीच्या महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीकडे नेले. बातमीनुसार, ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली तेव्हा एकही शिवसैनिक अयोध्येत नसल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवण्यासाठी एका जुन्या आंदोलनाचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता. ३ मे २०२२ रोजीचा लोकसत्ताचा रिपोर्ट येथे पाहिला जाऊ शकतो, ज्यात देखील हा फोटो पाहावयास मिळतो. मात्र तो १९९२ च्या बाबरी घटनेतील असल्याचे नमूद नासूंबा कोणत्याही बातमीत फडणवीसांच्या शेजारी धावणारा माणूस एकनाथ शिंदे होता असे म्हटले नाही. न्यूजचेकरने फडणवीस यांचे सचिव शशांक दाभोळकर यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी हा व्हायरल दावा खोडून काढला आणि सांगितले की, फोटोमधील व्यक्ती जी फडणवीसांच्या शेजारी आहे, ते भोजराज डुंबे हे नागपूरचे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि हा फोटो भारनियमनाविरोधात पक्षाच्या २००२ मधील आंदोलनादरम्यान काढण्यात आला होता. त्यानंतर आम्ही डुंबे यांच्याशी संपर्क साधला, जे सध्या भाजपच्या नागपूर कार्यालयाचे प्रभारी आहेत आणि १९९० पासून पक्षात कार्यरत आहेत, त्यांनी फोटोमध्ये एकनाथ शिंदे नव्हे तर आपण स्वतः असल्याची पुष्टी केली. “फोटो २००२ मध्ये नागपुरात झालेल्या प्रचंड आंदोलनातील आहे. मी भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) नागपूरचा अध्यक्ष होतो आणि फडणवीस BJYM प्रदेश महामंत्री आणि प्रथमच आमदार झाले होते. आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. नागपूरच्या गड्डीगोदाम येथील एमएसईबीचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांच्या कार्यालयाला आम्ही घेराव घालत असताना हा फोटो काढण्यात आला होता. फोटोमध्ये एकनाथ शिंदे नाहीत,” डुंबे यांनी न्यूजचेकरला सांगितले. Conclusion अशाप्रकारे आमच्या तपासात देवेंद्र फडणवीस यांच्या २००२ मधील आंदोलनाचा फोटो चुकीचा दावा करून व्हायरल केला जात असल्याचे स्पष्ट झाले. फोटोत एकनाथ शिंदे असल्याचा दावाही खोटा असून प्रत्यक्षात ती व्यक्ती ज्येष्ठ भाजप नेते भोजराज डुंबे आहेत. Result: False Sources Maharashtra Times report, May 3, 2022 Conversation with Shashank Dabholkar, secretary to Devendra Fadnavis Conversation with Bhojraj Dumbe, BJP’s Nagpur office in-charge कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
schema:mentions
schema:reviewRating
schema:author
schema:datePublished
schema:inLanguage
  • Hindi
schema:itemReviewed
Faceted Search & Find service v1.16.115 as of Oct 09 2023


Alternative Linked Data Documents: ODE     Content Formats:   [cxml] [csv]     RDF   [text] [turtle] [ld+json] [rdf+json] [rdf+xml]     ODATA   [atom+xml] [odata+json]     Microdata   [microdata+json] [html]    About   
This material is Open Knowledge   W3C Semantic Web Technology [RDF Data] Valid XHTML + RDFa
OpenLink Virtuoso version 07.20.3238 as of Jul 16 2024, on Linux (x86_64-pc-linux-musl), Single-Server Edition (126 GB total memory, 5 GB memory in use)
Data on this page belongs to its respective rights holders.
Virtuoso Faceted Browser Copyright © 2009-2025 OpenLink Software