Fact Check: वाराणसीत गंगा आरतीदरम्यान शंखनादाचा जुना व्हिडिओ महाकुंभमेळ्याचा सांगून व्हायरल
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
- By: Umam Noor
- Published: Jan 31, 2025 at 05:28 PM
- Updated: Jan 31, 2025 at 05:33 PM
नवी दिल्ली (विश्वास न्यूज). प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्टेजवर उभी असलेली एक व्यक्ती शंख वाजवताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत वापरकर्ते दावा करत आहेत की, शंखनादाचा हा व्हिडिओ महाकुंभमेळ्याच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यानचा आहे.
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात व्हायरल होत असलेला व्हिडिओ सुमारे दोन वर्षे जुना असून वाराणसीचा असल्याचा आढळला आहे. जुना व्हिडिओला महाकुंभमेळ्याशी जोडून दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह पसरवला जात आहे.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
‘Wah Re Sindhi Wah’ या फेसबुक पेजने व्हायरल पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “2 मिनिटे 49 सेकंदांचा शंखनाद Shankh naad —— -2.49 कुंभमेळ्याच्या उद्घाटन समारंभात 2 मिनिटे 49 सेकंदांपर्यंत अविरतपणे शंख वाजवण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित झाला. ही प्राचीन हिंदू धर्माची शक्ती आहे.”
पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पाहता येईल.
तपास
आमचा तपास सुरू करताना आम्ही सर्वप्रथम व्हायरल होत असलेल्या व्हिडिओकडे बारकाईने पाहिले. या व्हिडिओमध्ये राष्ट्रपती द्रौपती मुर्मू और आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 54 सेकंदाच्या फ्रेममध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये VK न्यूज हे नावही लिहिलेले दिसत आहे.
या आधारावर आम्ही आमची चौकशी सुरू केली आणि गुगलवर VK न्यूजचा शोध घेतला. आम्हाला या नावाचा एक सत्यापित यूट्यूब चॅनल सापडला. 13 फेब्रुवारी 2023 रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, हा गंगा घाटाचा व्हिडिओ आहे.
आम्हाला 13 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रपतींच्या सत्यापित यूट्यूब चॅनलवर या प्रसंगाचा लाईव्ह व्हिडिओ सापडला. व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वाराणसीमध्ये गंगा आरतीला उपस्थित राहिल्या.
या प्रसंगाचा व्हिडिओ एएनआय च्या यूट्यूब चॅनलवर देखील पाहता येईल. 13 फेब्रुवारी 2023 रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गंगा आरती केल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणाशी संबंधित बातम्या टाईम्स ऑफ इंडिया आणि एएनआयच्या वेबसाइटवर वाचता येतील.
व्हायरल व्हिडिओच्या पुष्टीसाठी आम्ही गंगा सेवा निधीचे अध्यक्ष सुशांत मिश्रा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पुष्टी केली की, हा वाराणसीतील गंगा आरतीचा जुना व्हिडिओ आहे.
आता दिशाभूल करणारी पोस्ट शेअर करणाऱ्या फेसबुक पेजचे सोशल स्कॅनिंग करण्याची पाळी होती. आम्हाला आढळले की ‘Wah Re Sindhi Wah’ पेजला साडे आठ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
निष्कर्ष : विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात व्हायरल होत असलेला व्हिडिओ सुमारे दोन वर्षे जुना आणि वाराणसीचा असल्याचे आढळला. जुना व्हिडिओ महाकुंभमेळ्याशी जोडून दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह पसरवला जात आहे.
- Claim Review : शंखनादचा हा व्हिडिओ महाकुंभातील उद्घाटन सोहळ्यातील आहे.
- Claimed By : FB Page- Wah Re Sindhi Wah
- Fact Check : Misleading
Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!
Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.